काही दिवसा नंतर अनिल पुन्हा एकदा डॉक्टरांला भेटायला गेला. "कसे आहात आत्ता, काही फरक जाणवतोय का? डॉक्टरने स्मित हास्य देत विचारले "ठीक आहे डॉक्टर पण पूर्ण पणे नाही, काही आजारा बद्दल ऐकलं, किंवा कुणी मेल की त्या आजारांची किंवा मरणाची भीती परत जागी होते, हो पहिल्या पेक्षा खूप कमी आहे, पण आहे" "हे बघा तुमचा आजार काही साधा सर्दी खोकला नाही की लगेच ठीक होईल, याच्या साठी थोडा वेळ, संयम आणि परिश्रम द्यावा लागेल". "तरी किती दिवस लागतील डॉक्टर? अनिलने बारीक स्वरात विचारल "माणसाला शर्ट घट्ट झालं म्हणून दुकानात जाऊन शर्ट नाही बदलायचंय, इथे पूर्ण माणूसच बदलायचा आहे, वेळ तर