अंतःपुर - 12

(22)
  • 10.2k
  • 1
  • 5k

१२. संग्राम (रँग्नारॉक)...हिमांशूला इंटेरोगेशन रूममध्ये बसवले गेले होते. त्याचे दोन्ही हात समोरील टेबलच्या दोन टोकांना इंचभर साखळी असलेल्या बेड्यांना बांधले होते. हिमांशू वाट पाहत होता... पुढं काय होतंय याची... कोण प्रवेशणार...? काय विचारणार...? पण काही का विचारेनात हिमांशू उत्तरं ठरवून बसला होता...!आता त्याच्या डोक्यातील विचलन थंड झालं... तो कोणातरी येण्याची वाटच पहात होता...आणि जो प्रवेशाला; तो शक्ती! शक्तीला पाहून हिमांशूने मनमस्तिष्क मध्ये बांधलेले सारे इमले क्षणांत धाराशाही झाले!त्याने स्वतःला कितीही तयार केलं असलं, तरी त्याला ही अपेक्षा नक्कीच नव्हती की शक्ती आत येईल...!"सरप्राईज! सरप्राईज!" शक्ती त्याच्यासमोर बसत म्हणाला!"तू?" कोरड्या चेहऱ्याने हिमांशू उद्गारला."डॅनियलचा मोबाईल अनट्रेसेंबल आहे. नम्याला माहीत असलेल्या ठिकाणी तो असण्याची शक्यता