अदृश्य - 4

  • 12.2k
  • 5.7k

अदृश्य भाग ४केस संपली,पण विभा बैचेन होत होती,तिने तिच्या मैत्रिणीला फोन केला,सायली तिच्या घरी आली.सायली म्हणाली की विभा काय झालंय?,आता तर सगळं तुझ्या मनासारखं झालं ना.विभा म्हणाली" नाही,१ महिना उलटून गेलाय अजून सेहेम आली नाही मला भेटायला.ती कधीच एवढा वेळ नाही लावत ".सायली म्हणाली "विभा,मी किती समजावू तुला,तू तुझ्या गोळ्या घेणे बंद का केलेत?".सायली मनोचिकित्सक होती,आणि विभा ची मैत्रीण होती.विभा या शहरात जेव्हा सेहेम ला सोडून आली होती तेव्हा सायली नेच तिला सांभाळलं होत.नंतर सायली सेहेम ची हि खूप छान मैत्रीण झाली.विभा ला मानसिक आजार होता,म्हणून तिला अटॅक हि येत होते,त्या साठीच ती गोळ्या घ्यायची.विभा एक हि केस जिंकली नव्हती