जाई!

  • 4.5k
  • 1
  • 1.5k

श्रावणात घन निळा बरसलारिमझिम रेशिमधारा !उलगडला झाडांतुन अवचितहिरवा मोरपिसारा ! ‘पाडगावकरांचे गीत, ते ही लता दिदींच्या आवाजात ऐकण्याचा आनंदच वेगळा ना?'"वर्षा झालं का तुझं? निघायच का?" घनश्यामने रेडीओचा आवाज कमी करत हाक दिली. बाहेर मुसळधार पाऊस फेर धरुन तांडव करत होता.’'आज काय झालय काय याला? वर्षभराच एकदाच पडून घेतोय वाटत.' त्याच्या मनात विचार आला. "वर्षा झालं का गं? " त्याने परत आतल्या दिशेने पाहत विचारले. पण काहीच उत्तर मिळाले नाही.'हिचा आपला नेहमीचा उशीर. एवढ्या दिवसांनंतरही काही बदल झालेला नाही. आहे तशीच आहे.' म्हणत घना किचनकडे वळणार तेवढ्यात टेलिफोनची रिंग वाजली."हॅलो!" "घना तात्या बोलतोय." पलिकडून चाचपडत्या आवाजात. "हा, तात्या बोला ना!