वरवंटा

  • 9.2k
  • 2.4k

" वरवंटा... "" सखे...ऐ सखे.. कुठं मेलीस? " तो आजही फुल्ल दारू पिऊन आला होता. झुलत झुलतच घरात घुसला अन् आरडाओरडा- गोंधळ करू लागला. दुर्गा नुकतीच शाळेतून आली होती. ती बापासमोर आली," आई, रानात गेलीय. रोजंदारीच्या कामावर.. आली नाही अजून.. "" अजून नाही आली? मी आलो अन् ती कस्काय नाही आली? " तोल सावरत तो बाजावर बसला," कशाला मरायला जाती ही कामावर... म्या हाय ना कमावता मरद.. ऐ काट्टे.. पानी आण मला.. " त्याला जरा जास्तच चढली होती. बसल्या बसल्याही त्याचा झोक जाऊ लागला. तो कुणीकडेही कलंडू लागला. दुर्गानं तांब्यात पाणी आणलं. बापाच्या हातात दिलं. त्याने ते घटाघटा घशात ओतलं.