राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम आलेल्या पी टी निशाचे पोलीस उपनिरीक्षक पदी निवड ही ठळक बातमी वाचून ठाकूर सरांना खूप आनंद झाला. त्यांच्या डोळ्यातून आनंदाचे दोन अश्रू नकळत टपकले. या बातमीने त्यांना सहा सात वर्षांपूर्वीचा काळ आठवला. ज्यावेळी ते एका प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. निशा त्यावेळी चौथ्या वर्गात होती. काळी सावळी, वर्गाच्या मानाने जराशी उंच आणि सडपातळ शरीरयष्टी असलेली मुलगी म्हणजे निशा. घरची परिस्थिती खूपच बेताची. आई-वडील दोघे ही शेतात मजुरी करायचे आणि घरातील चार लेकरांची पोटे भरायची. त्यात निशा दुसऱ्या क्रमांकावरची मुलगी. पायात चप्पल नको ना अंगावर चांगले कपडे अशी तिची विदारक स्थिती होती. ती अभ्यासात जेमतेमच