लक्ष्मी - 1

(13)
  • 31.5k
  • 22.7k

शिरपूर नावाचं गाव आणि त्या गावात मोहन आपल्या आई सोबत राहत होता. दहावीची परीक्षा सुरू असतानाच त्याचे वडील वारले. अगदी लहानसे घर आणि दोन एकर जमीन एवढंच काय ते त्यांनी मागे ठेवून गेले. ज्यावेळी मोहन चा जन्म झाला होता त्यावेळी त्याच्या बाने सर्व गावाला जेवू घातलं होतं. तो गरीब होता पण खूप कष्टाळू होता. गावातील सर्व लोकांची तो कामे करायचा. समोर येईल ते काम करून आपलं घर चालवायचा. त्याला कशाची लाज लज्जा किंवा शरम अजिबात वाटत नव्हती. मोहनची आई देखील मोल मजुरी करायची आणि संसाराला हातभार लावायची. गावात कुणाशी त्यांचा भांडण, तंटा, वादविवाद असे काहीच नव्हते त्यामुळे सर्वचजण त्यांच्याशी प्रेमाने