काळ आला होता पण वेळ नाही आली होती - 5

  • 6.3k
  • 2.2k

काळ आला होता पण वेळ नाही आली होती भाग 5 रात्रीचे साडेआठ वाजले होते. दरवाज्यावर थाप आली मी समजून गेलो कार्तिक भाऊच असेल.म्हणून मी उठून दरवाजा जवळ गेलो.कडी उघडली तर समोर एक वयोवृद्ध मनुष्य उभा होता. त्याची दाढी खूप वाढली होती आणि पांढरीशुभ्र होती. तसेच डोक्यावरील केस जटे प्रमाणे बांधले गेले होते.वृद्ध असून सुद्धा त्याच्या चेहर्‍यावर विलक्षण तेज होते. पण त्यांना या आधी गावात पाहिले नव्हते. कोण हा व्यक्ती?इतक्या रात्री माझ्याकडे का आला? असे प्रश्न त्याला पाहताच मला पडले. मी काही विचारणार तोच तो वृद्ध व्यक्ती उद्गारला. " भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. येणारे काही दिवस खूप