jaal aala hota pan wel nahi aali hoti - 5 books and stories free download online pdf in Marathi

काळ आला होता पण वेळ नाही आली होती - 5

काळ आला होता पण वेळ नाही आली होती भाग 5
रात्रीचे साडेआठ वाजले होते. दरवाज्यावर थाप आली मी समजून गेलो कार्तिक भाऊच असेल.म्हणून मी उठून दरवाजा जवळ गेलो.कडी उघडली तर समोर एक वयोवृद्ध मनुष्य उभा होता. त्याची दाढी खूप वाढली होती आणि पांढरीशुभ्र होती. तसेच डोक्यावरील केस जटे प्रमाणे बांधले गेले होते.वृद्ध असून सुद्धा त्याच्या चेहर्‍यावर विलक्षण तेज होते. पण त्यांना या आधी गावात पाहिले नव्हते. कोण हा व्यक्ती?इतक्या रात्री माझ्याकडे का आला? असे प्रश्न त्याला पाहताच मला पडले. मी काही विचारणार तोच तो वृद्ध व्यक्ती उद्गारला.
" भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. येणारे काही दिवस खूप संकटाचे आहे. घाबरू नको धीर ठेव सर्व ठीक होईल. पर ही तुझी परीक्षा आहे ती तुला द्यावीच लागणार आहे. तुझ्या सर्व प्रश्नांचे उत्तर त्या महादेवाच्या गडावर तुला भेटेल.ये ऊद्या तिथे," बम बोले,जय शिव शंकर," हर हर महादेव."
मी= कोण तुम्ही? काय म्हणताय बाबा?मले काय समजलं ना य? तु मी मले कसं वळखता? या आदी म्या तुमाले बगितलं पण नाय गावात?माया मनात प्रश्न हाय हे तुमाले कसं माईत ?
वृद्ध व्यक्ती = सर्व समजेल, सर्व कळेल तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तर त्या गडावर मिळेल. सावध राहा तो तुमच्या मागावर आहे." अलख निरंजन " म्हणून ते वेगाने निघून गेले.
(दाराजवळ आलेल्या कार्तिकने ते बघितले )
कार्तिक =अरे ह्यो कोणा हुता भाऊ ?म्हातारा असून बि लई फुरताइन गायब झाला.काय म्हणत हूता?तुमच्या वळखीचा हुता वाटतं.
मी=नाय हो म्या या आदी कदी पायला पर नाय याला. पण काय माग लागलं? काय तो सावज राय म्हणे? अन माया सग्र्या प्रस्नाच उत्तर गडावर हाय म्हणे. काय बोलला? काय नाय? काई समजल नाय. बर तु मी कायले बाहेर उभे हा या आत मदी चाला बसु आत नी.
कार्तिक= व्हय चला( मग दोघेही घरात आलो व एका खोलीत जिथे एका कोपर्‍याला एक बेड मधात एक टेबल व त्याला लागून एक सोपा होता तिथे आलो सोफ्यावर बसत मी कार्तिक ला बसण्यास सांगितले.)
मी=या बसा भाऊ.
कार्तिक=जेवण झालं वय तुमच(सोफ्यावर बसत कार्तिकने मला विचारले)
मी=नाय हो तुमी येणार हुते तर म्हणलं सोबत जेऊ तुमच्या पसंतची अंड्याची भाजी बनवलं हाय आईन.
कार्तिक=अर वा म्या पर तुमच्या आवडीची मवाची बाटली आणली हाय. मामाकडे गेलो हुतो तर त्यांनी आवरजून तुमच्या साठी दिली.
मी=अर् वा तुमि लयं येळेवर कामाची वस्तू आणली तस पर डोक्यावर लयं ताण हाय. मले तिची गरजच भासत हुती. थांबा म्या गिलास आणतो घेवूया एक एक गिलास.(असे म्हणून आतून दोन गिलास आणि खाण्यासाठी चिवडा घेऊन आलो)
घ्या बनवा चिवडा पर आणला तोंडी लावायला.
(कार्तिक ने एक ग्लास आपल्या हातात घेऊन आणि दुसरा ग्लास माझ्यासमोर वाढवत मला विचारले)
कार्तिक=तुमि सांगितलं नाय तो इसम कोण हुत तर ? काय बोलला तुमाले? काय नाय समजलं तुमाले?
मी=अरे व्हय कोड्यातच टाकून गेला बगा. उद्या मले महादेवाच्या गडावर ये म्हणे. तिथं माया साऱ्या प्रसनाचं उत्तर भेटलं म्हणे. कोण तरी माग लागलं. हुशार राले सांगितलं. पर मले काई बी समजलं नाय. आता उद्या गडावरच जाले पायजे तवा समजलं काय प्रकरण हाय ते.
कार्तिक=कसलं कोड? कसले प्रस्न? तुमाले पडले मले बी सांगा जमलं तर म्या काई सांगु शकतो. अन् रायली गोष्ट त्या गडावर जाची तर तिथं त कोणाची जाचि हिम्मत व्हत नाई जो बी गेला वापस नाय आला. तिथं म्हणते साक्षात महादेव तप करत हाय म्हणते कितीतरी ईदेशी आले त्याच्यावर चडाई कराले पर सारे हारून परत गेले. यक बी चडू नाई शकल शिवाय कोणत जनावर बी फटकत नाई त्या गडाच्या आसपास. मांग यक सन्यासी गेला हुत म्हणे पर तो आजपर्यंत वापस नाय आला मंते लोक. मेला की काय? यकाद्या दरीत का कोण जाणे? अन् बाराई महिने तिथं बर्फ पडत रायते तिथं जाण आपल्या सारख्या साद्या माणसाचं काम नाई.
मी= व्हय मले बी माईत हाय कार्तिक भाऊ पर इलाज नाई हाय माया प्रस्नाचे उत्तर मले वाटते तिथंच भेटणं. सारखं मले काई तरी ईपरीत घडण असच वाटतं. तस पण गेल्या काई दिवसापासून आपल्या सोबत जे काई होत हाय ते ईचार कराले भाग पाडत हाय.
कार्तिक=काय ईचार पडला तुमालें ते सांगा तरी? कोणते प्रस्न पडले तूमालें? जमलं तर म्या काई सांगु शकतो.
मी= व्हय त्यासाठीच त तुमालें बोलावलं हाय. ज्या दिवशी पासून आपण थ्या पिंपळाच्या झाडाखाली बसून परत आलो हावोत त्या दिवशी पासुन आपला यक यक साथी कम हूत हाय. अन त्या दिवशी आपण जे आयकल व्हत ते आज पुना नित्याच्या मयती जवड पायल पन अन आयकल पन. थेच भयानक हसन तोच आवाज शिवाय आज त जे काई दिसलं ते म्या या आदी कदीच पायल नाई.
पयले ईशाल्या मग राहुल्या अन आता नित्या यायच्या मरण्यात काई ना काई कारण हाय. ह्यो फकस्त योगायोग तर नाई होवु शकत. एक म्या हे मानु शकतो की त्यादिवशी आपण जंगलात हूतो, त अचानक झालेल्या वाघाच्या हल्ल्यांन ईशाल मेला पर त्यानंतर त रहुल्या अन त्या सोबत अस काई व्हईल असं वाटलं नाई व्हत. अन त्या दिवशी जो वाघ आपण पायला तुमालें वाटतें आपल्या जंगलात असा वाघ असाल म्हणुन. म्या तर तवा परत इतका मोठा वाघ कदींच पायला नवता. अन् कोनाले दिसला असं आयकल बी नाय पर त्या दिवशी पासुन जे काई व्हत हाय थे काई मले समजत नाई हाय. आता तुमीच सांगा माया गोष्टी तुमालें पटते का?
कार्तिक:-व्हय तुमचं मनन बराबर हाय. ह्यो काई सादी गोष्ट नाई.यक यक करुन तिघे मेले ते पर यका पाठो पाठ यांच्यात काई ना काई घोळ हाय. त्या दिवशी आपण जे आयकल ते आज आपण पायल पण हे बी गोष्ट तुमची बराबर हाय. अन रायली गोष्ट त्या दिसीच्या वाघाची तर मले बी वाटत नाय की तो साधासुधा वाघ असल म्हणून कारण ईशाल्या असताना कोणत्या वाघाची हिम्मत नाई व्हती समोर याची. जंगलातल्या वाघाची त त्याले चांगली जाण होती.शिवाय त्या दिवशी म्या पहिल्यांदाच त्या वाघाल पाहून ईशल्या ले ईचारात पडतानी पायलं मनुन म्या घाबरून पळू लागलो. पर त्या गोष्टीचा मले लई पस्तावा आहे.जर म्या पळालो नसतो तर ईशाल्या आज जिता असता.कारण त्याले अशा येळेला का कराच हे चांगल ठाव व्हत. कितीतरी येळा आमी जंगलातून वाघ समोर असतांना बी सुखरूप घरी आलो हुतो.पर राहुल्या आणि नीत्याच्या मरणा मुळ मले असं वाटत हाय की नक्की काय ना काय घोळ हाय.
मी :- तुमाले का वाटते ? का असु शकते? कोण असु शकते याच्या माग? का बरं असं व्हत असल?
कार्तिक:-तस पक्क त नाई सांगु शकत पर मले वाटते त्या दिशी आपण यामराजले नाई नाई थे बोललो. त्याले आपण हुकी दिली अन मनुन थो आता आपल्या माग लागला असल असं मले तरी वाटते. म्या लई गोष्टी वाचल्या हाय अस्या. शिवाय आपण जे हासन आयकल अन जे सावली नित्याच्या सरणावर पायली थे काळाची व्हती असं म्या खात्रीनं सांगु शकतो. म्या लयं ठिकाणी ते वाचलं बी हाय परत पुरणा मंदी बी तेच लिवल हाय व्हय न व्हय हे तेच सावट हाय.
मी:- व्हय बरोबर बोलले तुमि मले बी तसच काई वाटत हाय. आपल्या दोगाशिवाय ते कोणाले आयकु नाय आल आन दिसलं बी नाय. पर याच्यातून बाहेर निगाचा काई त उपाय तुमाले माईत असन. काई ना काई त असन जे आपल्याले वाचवू शकत असल.
कार्तिक:- नाई भाऊ यकदा का काळ मांग लागला त मग माणसाचं मरण पक्क हाय. असा काई उपाय मले तरी अजुन नाई सापडला कुठ. जर असं काई दिसलं त म्या तुमाले सांगिन.
मी:- असं नगा बोलू भाऊ काई ना काई त मार्ग असन मले सवताची परवा नाई . तिन मित्र त म्या खोवले हायेत आता अजुन नाई. मांग मले जे करा लागलं थे म्या करीन पर आता कोनाले काई नाई होवु देणार.
कार्तिक:- अव भाऊ साहेब नियतीच्या समोर कुणाची नाई चालत देवालेबी तिच्या समोर वाका लागते. इधात्यान जे ठरवलं हाय ते ना तुमी बदलू सकत ना मी. कस्याले उगीच आटापिटा करता तिथं जाऊन. उलट उद्या मराचे आज मराल असं व्हईल तिथं जाण म्हणजे मुरत्यू ले सामोरी जान झालं. मनुन सांगतो आयका माज जास्त ईचार नगा करू जे होईन थे पाऊ सामोर.
मी:- नाई भाऊ जरी हे नियतीनं ठरवलं अस न तरी म्या हे होवु देणार नाई. माया जीव गेला तरी चालन पर आता अजुन कोनाले मी काई होवु देणार नाई. उद्याच कुच करतो थ्या गडावर.
कार्तिक:- बरं जर तुमची हेच इच्छा हाय त म्या बी येतो सोबत. काई नाई त बुडत्याले काडीचा आधार व्हईल. का कोण जाणे माई तुमाले गरज पडू शकते.
मी :- नाई भाऊ तुमी गावातच रहा आन मुक्यावर नजर ठेवा मले असं वाटत हाय का आता त्याचाच नंबर हाय. मनुन म्या येतं पर्यंत तुमि त्याले कुठ बी जाऊ नगा देवु. त्याच्या डोक्यावर राहुल्याच्या खुनाचा बदला घ्याचा खुमार हाय पर सत्य आपल्याले माईत हाय. थो काई शांत बसणार नाई मनुन म्या परत येत परयंत तुमि सावध रावा. तुमची इतकी मदत पायजे फक्त का गेट वरचा चवकिदार तुमच्या वडखीचा हाय त त्याची परवानगी काडून द्या म्हणजे झाल.
कार्तिक:- बरं बरं ठीक हाय जशी तुमची मर्जी म्या काळजी घेईल. उद्या तुमाले परवानगी बी काडुन देतो त्याचं टेनसन नको घ्या. म्या करतो बराबर पण तुमी बी आपली काळजी घेजा पुर्ण तयारिन जावा.
मी:- व्हय व्हय माय टेनसन नको घ्या म्या आपल्या तयारीन जाईन पुर्ण. आन महादेवाची किरपा हाय आपल्या वर त्यांनच बलावल हाय त माया राखण बी तोच करल. पर तो चवकिदार मानल का?
कार्तिक:- मानल मंजे रावाच हाय का नाई त्याले गावात आपल्याले नाई मनाची त्याची ताकत नाई हाय. बर निगतो घराला आई वाट बगत असल येतो जगलो तर नक्की भेटू.
मी:- ईसरले का भाऊ तुमिच मंता न की जगलो तर भेटु नाई त भेटा साठी नक्की जगु.
कार्तिक:- व्हय व्हय (हसत हसत घरी जातात)
माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती कारण त्या गडाविषयी मी कितीतरी दा ऐकले होते.सतत असं वाटायचं की एकदा तरी आपण प्रयत्न करावा तिथे जाण्याचा. काय रहस्य आहे तिथले ?ते जाणून घ्यावे.त स पण मला त्या गोष्टीची आवड होती एखाद्या जागेबद्दल जाणून घ्यायची माझी नेहमीची इच्छा असायची आणि त्या गडाबद्दल बऱ्याच गोष्टी मला आकर्षित करीत होत्या.
कारण आजपर्यंत कोणीच त्या गडाच्या शिखरावर पोहोचले नव्हते.पुष्कळ विदेशी पर्वत रोहिने प्रयत्न केला पण जेव्हा ते वर चढायचा प्रयत्न करायचे तेव्हा एक भीती त्यांच्या मनात निर्माण व्हायची. नानाप्रकारचे भयानक आवाज त्यांना ऐकू यायचे. शिवाय ते ठिकाण बर्फाच्छादित असल्यामुळे केव्हा पण तिथे बर्फाचे भयानक वादळ सुरू व्हायचे. त्यामुळे वर जाणे तर सोडा नीट उभे राहणे पण नाही जमायच. खूप वर्ष आधी एक बौद्ध संन्यासी गेले होते म्हणे पण त्यांना परत येताना कोणी पाहिले नव्हते. कदाचित ते तिथेच कुठेतरी गडप झाले अशी सर्वांची मत होती. शिवाय शासनाने तिथे चढाई करण्यास पाबंदी पण लावली होती.त्यामुळे मला त्या गडावर जाणे थोडे अवघड होते. पण तरी मनाशी निश्चय केला की काही पण करून आपण त्या गडावर जायच तेव्हाच आपल्याला काय तो मार्ग मिळेल.
दुसऱ्या दिवशी सर्व तयारी करून आपली बॅग खांद्यावर ठेवून मी निघालो त्या गडाच्या दिशेने.गावापासून त्याचे अंतर किमान वीस ते पंचवीस किलोमीटर असेल. रस्त्यात घनदाट जंगल होते आणि तिथूनच त्या गडाकडे जाण्याचा मार्ग होता.
गावाच्या उत्तर दिशेला तो गड होता.जिथे गावाची सीमा होती तिथे महादेवाचे एक छोटे मंदिर होते. तिथे पोहोचल्यावर मी आधी महादेवाचे दर्शन घेतले आणि माझ्या कार्यात मला यश देण्याची प्रार्थना केली.अचानक जोराचा वारा सुटला आणि मंदिरातील घंटा नाद आपोआप होऊ लागला तिथले वातावरण अगदी प्रसन्न होऊ लागले हा इशारा होता कदाचित त्या ईश्वराचा जो सदैव माझ्या पाठीशी होता.
जंगलाच्या सीमेवरच एक वन अधिकारी नेमलेला होता. आणि जर आत जायचे असल्यास त्याची परवानगी लागायची.दुसरा कोणता मार्ग नसल्याने नाईलाज होता.पण कार्तिक भाऊची ओळखी त्यांच्यासोबत चांगली आहे हे मला ठाऊक होते. त्यामुळे मला काही त्रास होणार नाही याची खात्री होती.
गेटजवळ आल्यावर त्याने मला विचारले," कोण र तू ?कशाला आला इथं ?काय काम आहे?
मी त्याला म्हणालो;"अव घाटकर साहेब म्या कार्तिक भाऊ चा मित्र जरा काम आहे तुमच्याकड.
चवकिदार:- अच्छा अच्छा कार्तिकचा मित्र व्हय आत ये(म्हणून त्याने गेट उघडले यदाकदा गावकरी काड्या किंवा चारा आणायला तिथे जात असे म्हणून त्यांच्यासाठी ही काही नवीन बाब नव्हती.)
काय काम काढल मायाकडे चारा आणायला जायचं हाय का? की काड्या आणायला जायचं हाय?
मी:- नाय हो साहेब चारा आन काड्या तर भरपूर हाय घरी. माज थोडं येगडं काम हाय. असं आयकलं हाय की गडाजवळच्या तलावाकाठी लयं चमत्कारी जडी बुटी हाय मले त्याचा पत्ता लावाले जायचं हाय.
चौकीदार:- अर् येडा का खुळा झालास तू . तुला कुणी सांगितलं? असं काय बी नाय तिथं. म्या सवता लयं यळ घालवला तिथं मले त काई नाई दिसलं. तस बी तिकडं जाण धोक्याच हाय यकट दुकट. म्याच त शिपाई घेवुन जात असतो ते पण बंद जिप मंदी. नाई म्या परवानगी नाई देवु शकत जा घरला.
मी:- आव साहेब आयकून तरी घ्या माज. म्या लयं अभ्यास केला हाय जडी बुटीचा ज्या गोष्टी मले समजु शकते त्या तुमासनी नाय कडणार. लागण त बोलुन घ्या कार्तिक भाऊ सोबत.(असं बोलून मी कार्तिक ला फोन केला)
ट्रिंग ट्रिंग
कार्तिक:- हा बोला भाऊ.
मी:- आर कार्तिक भाऊ जरा घाटकर साहेबा सोबत बोला यायल मायावर भरोसा नाई.
कार्तिक:- बरं द्या.
चौकीदार:- हा बोला लेखक साहेब.
कार्तिक:- आर जावू द्या त्याला साहेब आपलाच मानुस हाय. म्या त्याची जबाबदारी घेतो. तुमच्या वर काई नाई येऊ देत. रात्रीला तुमची व्यवस्था म्या करतो.
चौकीदार:- बरं ठीक हाय तुमि बोलता मनून जाऊ देतो पर माजी पावती तेवढी जमवा म्हणजे झालं.
कार्तिक:- त्याची काळजी नगा करु तुमि कदी नाराज केलं का?
चौकीदार:- नाय नाय तस नाय बस लक्षात रावू द्या मनुन मनल.(असे म्हणून त्याने फोन ठेवला)
मला त्या चौकीदाराने पूर्ण माहिती देत सावध राहण्यास सांगितले. व लवकरात लवकर परत येण्यास सांगितले. रात्र झाल्यानंतर तळ्या जवळच एक शिकारी गृह असल्याचे सुद्धा त्यांनी कळविले. झोपण्यासाठी तिथेच व्यवस्था आहे असे बजावले.मी त्याचे धन्यवाद करून पुढचा प्रवास सुरु केला. ठरल्याप्रमाणे अवघ्या काही वेळातच कार्तिक भाऊ ने त्याला मवाची एक पूर्ण भरली बाटल देऊन त्याचे सात्वन केले त्यामुळे तो माझ्या कार्यात दाखल करणे गरजेचे नव्हते.
दुपारचे बारा वाजले असतील मी चालत चालत तरी बरेच अंतर कापले होते.आता दम भरू लागला होता आणि तहान पण खूप लागली होती. बॅगमध्ये आणलेले घरचे पाणीसुद्धा केव्हाच संपुष्टात आले.होते फक्त आता मवाच्या दोन बाटल्या भरून आणल्या होत्या त्या शिल्लक होत्या. पण दिवसाढवळ्या पिणे जमले नसते.फक्त रात्री थकवा मिटवता यावा यासाठी मी त्यासोबत आणल्या होत्या आणि पाण्याची पूर्तता त्याने पूर्ण होणार नव्हती. आता या वेळेस मी जंगलाच्या मध्यंतरी होतो. कुठे जवळपास पाणी भेटते काय?याचा मी शोध घेत होतो. तितक्यात पाण्यात काहीतरी बुड बुडल्याचा आवाज माझ्या कानी आला. जवळच कुठेतरी पाण्याचा स्त्रोत आहे असे कळून आले. मी त्या दिशेने आपले पावले समोर वाढवली. समोर एक छोटेसे तळे होते आणि त्या तळ्यात एक तरुण साधवी कळशी ने पाणी भरत होती. तिला पाहून मला नवलच वाटले. या इतक्या भयाण जंगलात एकटी तरुण साधवी काय करतेय? शिवाय या परिसरात कोणतेही संन्यासी अथवा साधू येण्यास बंदी आहे. तेव्हा ही कुठून येथे आली ?अशी अनेक प्रश्न निर्माण झाली.
आपली उत्सुकता मिटवण्यासाठी मी तिच्याजवळ जाऊन विचारपूस करण्याचे ठरवले तिच्या जवळ पोहोचल्यावर मी त्यांना आवाजात हाक मारली.
मी:- पर नाम देवी कोण तुमि? इत कुटून आल्या? अन इत का करत हा या जंगलात?(जसेच तिने मला वळून पाहिले तसेच मला आश्चर्याचा दुसरा धक्का बसला ती तरुण साधवी दुसरी कुणी नाही तर राहुलची प्रेयसी मिनी होती)
मिनी:- तु इथे काय करतोय?
मी:- हाच परस्न मले पडला हाय तु इत का करुन रायलि? आन ह्यो का अवतार करुन ठीवला हाय आपला? हे भगव कापड, हे हाताले फु लाची माळ, गल्यात रुद्रखश तु त पूरी शंकराची पारबती दिसत हायस. तरी म्या मनलं तु गावात का दिसत नाई ते. काई येड बीड लागलं का तुले.
(माझ्या बोलण्यावर ती फक्त हळूच मंद हसली. खरंतर राहुल्या गेल्यापासून मी तिला विसरूनच गेलो होतो. एक दोनदा मी चौकशी केली पण मग जग लाजेने मी ते सोडून दिले. मीनि मात्र शून्यात गेलेली होती.तिने अन्नपाणी सोडून दिले होते. स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले होते.घरचे सर्व हैराण झाले होते. तिच्या या वागण्याने तिची सावत्र आई खुप वैतागली होती. शिवाय ति सावत्र असल्याने मिनीचा रागच करायची आणि आता तर तिला तिच्यावर अन्याय करायला चांगलाच मौका मिळाला होता. तिचे वडील दारूच्या आहारी गेल्यामुळे त्यांचे मिनीवर फारसे लक्ष नव्हते.एका रात्री तिच्या सावत्र आईने तिला खुप मारहाण केली आणि त्रासून तिला घराबाहेर काढले व परत या घरात पाय न ठेवण्याची तिला धडकी भरली. तसे पण मीनीला आता या जगात काहीही राम वाटत नव्हते. तिला घर असून नसल्यासारखे होते. एकच तिचा सहारा राहुल पण आता तो तिच्या जीवनात नव्हता.तेवढ्या रात्री ती पाई पाई चालत जंगलात निघून आली. चालता चालता केव्हा ती त्या गडाच्या दिशेने चालू लागली तिचे तिलाच भान नाही राहिले.
गेटवर असलेला चौकीदार गाढ झोपेत असल्याने ती केव्हा आत आली आणि केव्हा जंगलात निघून गेली हे त्यालाही कळले नाही. सकाळी गेट उघडे दिसले तेव्हा त्याला असे वाटले की रात्री जरा जास्त झाली असेल आणि त्याने गेट लावले नसेल, आपली चूक लपवण्यासाठी त्याने लगेच गेट बंद करून आपल्या जागी पूर्ववत येऊन बसला.
इकडे मिनी चालत चालत त्या तळ्याजवळ आली तेव्हा तिला भान आले की ती कुठे आली म्हणून. पण तिच्या कपाळावर भीती मात्र किंचित पण नव्हती कारण तिच्या जीवनात जन्म आणि मरण यात अंतर उरले नव्हते.
काय करावे तिला कळत नव्हते. तळ्याजवळ एक विशाल गोटा होता ती त्या गोटा वर जाऊन बसली आणि पुन्हा एकदा शून्यात हरवली.थोडा वेळ झाला असेल एक लख्ख प्रकाश तिच्या दिशेने आला आणि तिच्या डोळ्यात शिरला त्या प्रकाशाने ती ताडकन उठून उभी झाली एक नवीन चेतना तिच्या अंगात संचारली होती.
एका झटक्यात तिने आपले संपूर्ण केस खुले सोडले.हातातील कंगन तिने कडाकडा तोडले व एकेक करून शरीरावरील सर्व वस्त्र तिने काढुन फेकली. आता ती पूर्ण नग्नावस्थेत होती.ती रात्र पौर्णिमेची होती. हळूच ती त्या गोटया वरून उतरली आणि त्या तळ्यात जाऊन तिने समाधी लावली.ती त्या तळ्यात असताना तिला असे जाणवले की तिचे शरीर असंख्य शक्तींचे भंडार झाले आहेत.नाना प्रकारचे बदल तिला स्वतःमध्ये जाणवत होते.
थोड्या वेळाने ती पूर्ण निर्मळ होऊन त्याच्या बाहेर आली.आता तिला खूप हलके हलके वाटत होते.एक दिव्य प्रकाश तिच्या मुखावर होता. सुखदुःख तिच्यापासून आता पुष्कळ दूर लोटले होते. चंद्राच्या प्रकाशात तिचे नग्न शरीर एखाद्या चांदणी प्रमाणे त्या भयाण रानात आपली छटा पसरवत होते.
परत ती त्या गोटया जवळ आली असता तिला तिथे भगवे वस्त्र दिसून आले. न कळतच तिने ते परिधान केले आणि आता तिची हे देव दिव्य स्वरूप पाहून आकाशातल्या त्या चंद्राला हि लाज वाटू लागली.कारण त्या अवतारात ती स्वर्गातली अप्सरा लाही लाजवणारी वाटत होती.
इतक्यात एक आकाशवाणी झाली," हे बालिके विधात्याने एका महत्त्वपूर्ण कामासाठी तुझी निवड केली आहे. भगवान भोलेनाथाची तुझ्यावर कृपा झाली आहे. जोपर्यंत तुला तुझे कार्य समजत नाही तोपर्यंत या रानात तळ्याजवळच्या गुफेत तू महादेवाची आराधना कर.लवकरच तुला फार महत्वाचे कार्य सोपवण्यात येईल.तुला काय करायचे आहे ते कळेल तथास्तु. "
आता मिनी पूर्ववत झाली ती त्या गोटा वरून उतरून तळ्याच्या काठाने चालू लागली.गडाच्या पायथ्याशी एक गुफा तिला आढळून आली. ती त्या गुफेत शिरली ती गुफा बाहेरून जेवढी अरुंद होती.तितकीच आत मध्ये विशाल होती. तिने एक शिवलिंग तिथे स्थापित केले व आता ध्यान पूजा-अर्चना हेच तिचे जीवन बनले होते. मिनिने आपली सर्व कथा माझ्यासमोर मांडली होती. तिच्या या परिस्थितीने मी अगदी भारावून गेलो होतो. मिनीच्या प्रश्नाने मी भानावर आलो.)
मिनी:- पण तू इथे काय करतोस? कशाला आला इथे?
मी:- खरं सांगु त म्या इत आपल्या काई जाणुन घ्या साठी आलो हुतो. काई परसनाची उत्तर शोदा साठी आलो हुतो.
पर तुई कहानी आयकुण सार ईस रून गेलो. असं वाटतं का सारे परस्न मिटले.
मिनी:- कोणते प्रश्न? काय शोधतोय?
मग मी सुरुवातीपासून ते इति पर्यंत सर्व कथा तिला सांगितली.कस आम्ही नदीवर गेलो, तिथे काय बोललो मग विशाल सोबत काय झालं, राहुल च तर तिला माहीतच होतं. त्याबद्दल आणि रात्री झालेल्या प्रकारा बद्दल मी तिला सांगितलं. तसेच माझ्या मनात चाललेल्या शंका-कुशंका सुद्धा मी तिला सांगितल्या.पण जणू काही तिला फरक नाही पडत अशा संवेदनेने तिने मला सोबत चालायला सांगितले.पण त्याआधी तिने आपल्या कळशी तले पाणी मला प्यायला दिले ते पाणी पिऊन मला अमृत पिण्याची शांतता लाभली.
अंधार पडला होता तेव्हा आम्ही त्या गुफेच्या मुखाजवळ पोहोचलो.जवळच विशाल काय तळे पण होते.तिथे तळे असताना सुद्धा ती इतक्या दूर पाणी आणायला कशाला गेली .असे विचारल्यावर तिने सांगितले कि त्या दिवशी अमावस्या होती आणि अमावस्यात त्या पट्ट्यातील पाणी विषारी होऊन जाते कारण साक्षात शेषनाग त्यादिवशी त्या तळ्यात भगवान भोलेनाथ चे दर्शन घेण्या आधी स्नान करतात.
मी तिला विचारले असता कि तू गडावर कधी गेली आहे काय? तर ती म्हणाली मला परवानगी नाही आहे वर जाण्याची मला इथे चरणाशी त्यांची भक्ती करायची आहे.
आम्ही गुहेत शिरलो सुरुवातीला जितकी ती छोटी वाटत होती तितकीच आत मध्ये खोल आणि विस्तीर्ण होत जात होती.काही वेळाने आम्ही तिच्या गर्भगृहात आलो होतो. तिथे बरीच जागा होती. एका दिशेने एक विशाल काय शिवलिंग निर्माण केले होते. ते पण मातीने जवळच एक हवन कुंड बनवले गेले होते.तिथे वरून सारखे पाणी पडत होते. ज्यामुळे त्या शिवलिंगाचा 24तास अभिषेक होत होता. हवन मध्ये अग्नी आता पण प्रज्वलित होता. आणि विशेष म्हणजे तिथे तूप किंवा तेल असे काही पण नव्हते तरी अग्नी पेटत होती.ते पण सारखी एकाच दिशेने.शिवलिंगाला छान फुलांनी सुशोभित केले होते. एकूण तिथले वातावरण प्रसन्न आणि प्रफुल्लित करणारे होते.
दुसऱ्या बाजूने आत मध्ये शयन कक्ष होते. असं वाटत पण नव्हत. कि तिथे अजून एक गर्भगृह असेल म्हणून. मीनि मला शयन कक्ष कडे नेले.तिथे एका चौरस गोट्यावर गवताच्या वाळलेल्या पेंड्या पसरवल्या होत्या आणि त्यावर हरिणीचे कातडे पसरवले होते. त्यामुळे ते आराम करण्यासाठी गादी पेक्षा पण उपयुक्त होते. जवळच एका कोपऱ्यात वरून एक झरा वाहत होता. तो अशा प्रकारे वाहत होता की त्या खाली उभे राहून आंघोळ करता यावी.
मिनीने मला आंघोळ करण्यास सांगितले.तसापण चालून चालून मी खूप दमलो होतो.अंगावर पाणी घेतल्यावर ताजेतवाने वाटेल म्हणून मी त्या झऱ्या खाली आंघोळ करण्या साठी गेलो.मिनी बाहेर गेली.कदाचित ती काही खाण्या पिण्याची व्यवस्था करायला गेली असेल असं मला वाटले.
त्या प्राकृतिक झऱ्या मध्ये अंघोळ करताना मला स्वर्गात असल्याचा आनंद झाला. तिथले पाणी थंड तर होतेच. सोबतच एक वेगळा सुवास त्या पाण्यात होता. तसेच शरीरामध्ये एक नवीन तरतरी वाटत होती.जणू ते पाणी नसून औषधी आहे ज्यामुळे माझा पूर्ण थकवा मिटून प्रफुल्लित वाटत होते.
मी फ्रेश होऊन त्या गादीवर बसलो. थोड्याच वेळात मिनी आली तिने माझ्या जवळ काही फळे ठेवली व खाण्यास सांगितले.तोपर्यंत मी आंघोळ करतो असे म्हणाली. त्यातले एक फळ उचलून मी खाऊ लागलो. याआधी मी असले फळ कधीच पाहिले नव्हते किंवा खाल्ले पण नव्हते.एक विशिष्ट चव त्या फळाला होती आणि आश्चर्य म्हणजे फक्त एकाच फळात माझे पोट भरले आणि अजून खाण्याची माझी ताकद झाली नाही म्हणून मी तिथेच लेटलो.
तिकडे मिनी त्या झऱ्याच्या दिशेने गेली मी जिथे भेटलो होतो त्याच्या समोरच डाव्या हातावर तो झरा होता आणि दोन भल्यामोठ्या दगडांच्या मधोमध तो झरा वाहत होता.एकूण ते एक प्रकारे प्राकृतिक स्नानगृहे होते. पण मध्येच एक पोकळी होती त्यातून अर्धवट आंघोळ करणारा दिसायचा.
पुढील भागात काय झाले ते वाचायला विसरू नका आणि आपला प्रतिसाद द्यायला विसरू नका तुमचे प्रतिसाद येत नाही आहेत. मला तुमच्या प्रतिसादाची अपेक्षा आहे धन्यवाद.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED