jaal aala hota pan wel nahi aali hoti - 2 books and stories free download online pdf in Marathi

काळ आला होता पण वेळ नाही आली होती - 2


त्या क्रूर आणि भयंकर हास्याने कार्तिक आणि पंकज ने एकमेकांकडे पाहिले दोघांच्या पण नजरा बोलल्या मग हळूहळू दोघेही जवळ येऊन बोलले
पंकज = "काही ऐकलं का कार्तिक भाऊ?"
कार्तिक ने मान हलवत हो म्हटलं ."आता इथे जास्त वेळ थांबन बरोबर नाही आपल्याला लवकरात लवकर गाव गाठावे लागते."
समोर हातात कुर्‍हाड घेऊन विशाल ,मागे मुकेश हातात सत्तुर घेऊन, त्यामागे नितेश दोन्ही हात खिशात टाकून ,राहुल ,कार्तिक आणि पंकज हातात काड्या धरून आजूबाजूचा कानोसा घेत सामोर वाढत होते. सायंकाळची वेळ झाली होती .सर्व एकापाठोपाठ चालत होते .मध्येच एखादे हरिण किंवा ससा रानात पळत सुटत होते .सर्वत्र आज शांतता होती .आज निसर्गाने सुद्धा कमालीचे मौन धारण केले होते .एरवी इतक्या वेळा रात्री-अपरात्री जंगलातून पायपीट करणाऱ्या पंकजला जंगलाचे रूप हे बदलून आल्याचे कळत होते आणि आज काहीतरी अजूनच डाव आपल्यासाठी नियतीने ठरवला आहे असे त्याला ठाम वाटत होते .म्हणून प्रत्येक पाऊल जपून समोर वाढवत होता आणि याच कारणाने तो सर्वात मागे चालत होता. जेणेकरून समोर जर काही झाले तर त्याला दुरून त्याचा सुगावा लागेल आणि मागून जर काही असले तर तो सर्वांना सावध करू शकेल.
पावलोपावली भीती सतत जाणवत होती. अर्धा मैल चालत आल्यावर रात्रीचा काळोख जिकडेतिकडे पसरला. मग विशाल म्हणाला" ऐ कोणीतरी मशाल पेटवा र... अंधार झाला रस्ता नाय गवसणार" तडका फडकी कार्तिकने एक झाडाची सुखी फांदी तोडून झोळीत आणलेल्या चिंध्या गुंडाळल्या आणि त्याची मशाल पेटवून विशाल च्या हातात दिली. कारण रस्ता तोच दाखवणार होता आणि शिवाय त्याच्यासारखा हिम्मतवाला आणि चापळ त्यांच्यामध्ये तोच होता .म्हणून समोर तोच चालत होता. आपल्या मित्रांना सुखरूप घरी घेऊन जाण्याची चिंता त्याच्या माथ्यावर ही होती ,पण तो निश्चिंत होता. कारण जंगल त्याच्यासाठी काही नवीन नव्हते आणि रात्री-अपरात्री येण्या जाण्याची त्याला सवय होती .म्हणून तो बिनठोक समोर वाढत होता, पण त्याला काय माहित होते की आज जंगल त्याची खरी कसोटी घेणार म्हणून.
तिकडे काळराजांनी आपली तयारी केली .हातात चाबूक घेऊन रेड्यावर स्वार होऊन निघाले. आपल्या शिकारीसाठी .सर्वात आधी त्यांनी विशालची निवड केली कारण त्यानेच सर्वात आधी काळाला आव्हान दिले होते आणि त्याचा सामना करण्याची क्षमता असल्याचे कबूल केले होते.
एका प्रचंड मोठ्या अशा वाघात काळराजाने आपले रूप घेतले .साधारण असलेल्या वाघापेक्षा त्याची उंची बरीच होती आणि भरदार शरीर, सुळ्यासारखे धारदार दात, तलवारी प्रमाणे तीक्ष्ण नखे आपल्या शिकारीला एका क्षणात चित्त करून त्याला फाडून खाण्याची ताकत या वाघात होती.कारण तो साधारण वाघ नव्हता खुद्द काळराज वाघाचे रूप घेऊन धरतीवर प्रकट झाला होता. त्याला बघताक्षणीच कोणीपण बेशुद्ध होणार असे त्याचे रूप होते.
आसमंत दुमदुमला अशी डरकाळी फोडत तो वाघ त्या सहा मित्रांच्या दिशेने कूच करायला लागला. इकडे त्या सहा जणांनी ती डरकाळी ऐकली आणि सर्वजण जागीच थांबले कारण तसे तर वाघाची गर्जना या सर्वांनी याआधी पण ऐकली होती. पण आज जे वाघाची डरकाळी त्यांनी ऐकली होती ती खरंच आश्चर्यचकित करणारी होती. इतकी भयानक आणि क्रूर गर्जना सर्वांनी प्रथमच ऐकली होती. शिवाय आभाळ पण काळ्कुट्ट दाटले होते. आजचा अंधार हा नेहमी असलेल्या अंधारा पेक्षा जास्तच गडद वाटत होता. अधून मधून आकाशात विजा चमकत होत्या.
सर्वजण सावध झाले पंकज विशालला म्हणाला "बे विशाल्या ऐकला का म्या आजपर्यंत लय वाघ बगितल त्याले गरजतानी बी आयकल पण अशी वाघाची गरजना आयकली नाय .हा काही साधारण वाघ नाय आपल्या जंगलातला तर नाय वाटत मले हुशार राय लवकर लवकर गाव गाठ.
त्यावर विशाल म्हणाला"व्हय बे मी बी आयकलं तू काळजी नग करू थो काय आपल्याजवळ नाही अजून दूर हाय . अन् आलाच तर मी हावो एका कुऱ्हाडीत साल्याचा फडशा पाडतो . माया मित्रांले हात लावाच्या पहिलं त्याले माया सामना करावा लागेल . थो या जंगलाचा राजा आसन तर मी बी काय कम नाय. चुपचाप माया मांग मांग चला जास्त आवाज नगा करा पायांचा.
समोर मैदानी भाग होता. अचानक तिथेच त्या वाघाने प्रत्यक्ष त्यांच्या समोर येऊन आपली उपस्थिती दिली .सर्व जागीच थबकले समोर विशाल आणि त्याच्या मागे त्याचे पाच मित्र . वाघाच्या आणि त्यांच्या मध्ये जास्तीत जास्त वीस पावलांचा फरक असेल.
खरंच तो वाघ म्हणजे साधारण वाघापेक्षा अत्यंत भरदार आणि उंच होता. त्याची उंची किमान 5.5 असावी आणि त्याचा पंजा हा एखाद्या लोखंडी पोलादा इतका जाड होता. त्याचे दात हे सुळ्यासारखे तीक्ष्ण होते, त्याचा जबडा एका क्षणात माणूस मिळेल असा होता. हाताची नखे तलवारीसारखी धारदार होती.
ते सगळे जंगली भागातले असल्यामुळे वाघ दिसणे हे त्यांना काही नवीन नव्हते किंवा साधारण वाघांचा सामना करायची प्रत्येकाला जाणीव आणि क्षमता होती. विशालला तर त्यामध्ये महारथ होती. वाघाची भीती कधी त्याला जाणवली नाही.उलट जर एखाद्या वेळेस कोणाचे जनावर किंवा माणसावर वाघाचा हल्ला झाला की विशालच त्याचा सुगावा काढून आणायचा. प्राण्यांच्या पावलांची त्याला चांगलीच जाणीव होती. शिवाय कोणता प्राणी कुठे असेल किंवा कोणत्या मार्गाने गेला असेल हे त्याला चांगलेच ठाऊक होते. शिवाय जंगलातल्या प्रत्येक घडामोडी तो अलगद टिपून घ्यायचा. मागे गावातील एका घरी वाघाचा हल्ला झालेल्या वामनरावांच्या मुलाला पण त्यानेच हुडकून काढले होते .
आज तो पण समोर असलेल्या त्या भयानक दृश्याला पाहून थोडासा चकमकीत झाला होता कारण त्यानेही आज पर्यंत इतका भारी आणि मोठा वाघ आपल्या आयुष्यात बघितला नव्हता .पण त्याला काय माहित होते तो वाघ नसून खुद्द काळराज त्याच्यासमोर होते म्हणून.
त्याने सर्वांना बोटाच्या इशाऱ्याने शांत राहण्यास सांगितले आम्ही पाचही जण विशाल च्या पाठीमागे हालचाल न करता उभे होते तेवढ्यात तो वाघ विशालच्या डोळ्यात पहात गुरगुरला जणू आता तो त्यांना एका झटक्यात मिळणार गिरणार पण म्हणतात ना किंवा कधीच समोरून हल्ला करणार नाही करत हे विसरला पण चांगलेच ठाऊक होते म्हणून त्यांनी कुणालाही जागेवरून न हल्ल्याचे न घालण्याचे हातानेच खुणावले आपली कुराड घट्ट पकडून तो आता पूर्ण तयारीत होता सोबतच मुकेशने पण आपला सत्तूर सरळ पकडला आणि तो पण विशालच्या खांद्याला खांदा लावून त्या वाघाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला.
पण जे नाही व्हायचे ते झाले नियतीने आज डाव रचलाच होता. त्यांच्यात सर्वात भित्रा म्हणजे कार्तिक. त्याला वाघाची फार भीती यदाकदा तो कधीच जंगलात एकटा जात नसे.जास्त करून तर जाण्याचे टाळायचा . आणि जर जायचे असले तर विशालला घेतल्याशिवाय जायचा नाही .घाबरून कार्तिकने चुकी केली त्याने हळु हळु त्यांच्याच्यातून बाहेर पाऊल काढले आणि लगेच धावू लागला .वाघाने ते पाहिले आणि तिकडे धाव घेतली. बाकीचे त्याला थांब थांब म्हणत अडवणार तोच वाघाने त्याच्यावर झेप घेतली .
इकडे हा प्रकार विशाल च्या लक्षात येताच आधीच त्याने त्या बाजूने कूच केली विशाल-कार्तिक आणि वाघ असे तिघे समोर आणि मुकेश , नितेश, राहुल आणि पंकज मागे अशी ती स्थिती होती .जशी वाघाने कार्तिक वर झडप घातली तोच विशालने पण झेप घेत कार्तिकला दूर ढकलले आणि फक्त आता वाघआणि विशाल आमोरासमोर होते . कार्तिक त्यांच्या पासून जवळच झुडपात फेकला गेला. आपल्या मित्राचे प्राण वाचवण्यासाठी विशालने स्वतःला मृत्यू समोर उभे केले होते. कारण मित्रता ही मौज मज्जा करण्यापुरती नाही तर वेळ आल्यावर मित्रांसाठी धावून जाण्या लाच मित्रता म्हणतात .ते चौघे तरी फार अंतरावर होते आणि काय करावे हे कोणालाच सुचत नव्हते जे काही करायचे होते ते विशाललाच कारण आता तावडीत तोच सापडला होता.
आपल्या शिकारीला आपल्या तावडीत बघून काळराज पण आता खुष झाला होता .आता बस एक वार आणि आपली फत्ते असं काळराजाला वाटत होतं पण त्याला तरी कुठे माहीत होतं की समोर असलेला विशाल हा सहजासहजी हार मानणारा नव्हता म्हणून. विशाल उठून उभा झाला. दात विचकत स्वतःशी म्हणाला" माया मित्रावर वार करतो काय ? आर त्यानल्या हात लावण्या अगोदर तुले या वाघाचा सामना करावा लागेल ." आणि त्याने आपली कुऱ्हाड सरळ पकडली कारण आता वार करण्याशिवाय त्याच्याजवळ पर्याय नव्हता. तिकडे वाघाने सुद्धा झेप घेण्यासाठी थोडी माघार घेतली आणि लगेच विशाल वर डरकाळी फोडत झेप टाकली विशालला माहीतच होते . की की वाघ असे करणार तो सावध होता . ज्या क्षणी वाघ त्याच्या अंगा जवळ येणार त्याचक्षणी तो खाली वाकला आणि एका हाताने कुऱ्हाडीचा वार वाघाच्या शेपटीवर केला त्यामुळे त्याच्या शेपटीचे दोन तुकडे झाले .पण विशालच्या मानेवर सुद्धा त्याच्या भरदार पंजाने वार झाला आणि त्याच्या मानेवरून रक्ताच्या धारा वाहू लागल्या त्यामुळे त्याचा शेला पूर्ण रक्ताने माखला पण त्याकडे विशालने मुळीच लक्ष न देता पुढच्या वापरासाठी तो सज्ज झाला. इकडे झालेल्या अनपेक्षित हल्ल्याने वाघ सुद्धा अचंभित झाला. कापलेल्या शेपटीने तो अजूनच खावळला आणि आता पूर्ण शक्तीनिशी तो विशाल वर आदळला कदाचित त्याच्याकडून इतकी प्रखर हल्ल्याची अपेक्षा विशालला नव्हती. त्याच्या या अचानक झालेल्या पुनर हल्ल्याने विशालचा तोल जाऊन तो खाली पडला .तोपर्यंत ते दृश्य पाहण्यासाठी त्याचे मित्र दहा ते पंधरा पावलांवर होते पण समोर वाढण्याची कुणाचीच हिम्मत होत नव्हती. आपल्या मित्रांची अशी अवस्था बघणे हे त्यांचे दुर्दैवच होते. काही करण्याची किंवा सुचण्याची ती वेळच नव्हती. खाली पडल्यामुळे विशालच्या हातातील कुऱ्हाड हातातून सुटली त्यामुळे वाघ त्याच्या अंगावर स्वार झाला आणि तो आपल्या हातानेच त्याचा प्रतिकार करू लागला.खाली जमिनीवर विशाल आणि त्याच्या अंगावर तो भरदार वाघ असे दृश्य होते .विशालने आपल्या दोन्ही हाताने त्याचे पंजे घट्ट पकडून ठेवले होते आणि एका पायाने त्याने त्याचे तोंड स्वतःपासून दूर ठेवले होते.शरीरावर पुष्कळ ठिकाणी त्याला जखमा झाल्या होत्या आणि आता डाव पलटत विशालने वाघावर स्वारी केली .
त्या भयाण शांत वातावरणात दोन वाघ एकमेकांशी झुंज देत होते .एक आपला भक्ष्य मिळवण्यासाठी तर दुसरा आपल्या मित्रांचे प्राण वाचवण्यासाठी झुंजत होता. ते भयानक रान त्या दोघांच्या युद्धाचे साक्ष बनले होते.संपूर्ण वातावरण भयाण झाले होते. त्याचा खेळ संपणार असे वाटत होते .आपल्या शिकारीवर संपूर्ण स्वार होऊन काळ आता आपल्या विजय अभियानावर खुश होणार होता. तोच विशालने आपल्या पूर्ण शक्तीनिशी त्याचा जबडा आपल्या दोन्ही हातांनी पकडला आणि आता पूर्ण ताकदीने तो त्याला फाकवायला लागला .कमालीची ताकत आणि अशा अनपेक्षित हल्ल्याने वाघ सुद्ध कळवळीस आला.खुद्द काळआज मृत्यूच्या दारात उभे होते. विशालच्या डोळ्यात त्याला त्याचे मरण दिसत होते. पहिल्यांदाच अशा शूरवीर आणि पराक्रमी व्यक्तीशी त्याचा सामना होता.विशालचे ते रौद्र रूप पाहून काळ राजालाही कसेबसे झाले होते. काही क्षणातच विशाल त्याचे दोन तुकडे करून फेकणार असे वाटत होते. मृत्यूचा देवता आज स्वतःच्या जाळ्यात फसला होता आपल्या शिकारीला फस्त करण्यात त्याच्या चांगलेच कपाळावर आले होते. पण म्हणतात ना की शेवटी नियतीला मंजूर असते तेच होते.अत्यंत रक्तस्त्राव झाल्यामुळे विशालची शुद्ध हरवत होती. त्याची पकड आता हळूहळू सैल होत होती आणि तोच मौका काळराजाला मिळाला कसाबसा तो विशालच्या तावडीतुन सुटला आणि थोडा मागे सरकून पुन्हा त्याने त्याच्यावर झडप घातली. हा मात्र शेवटचा वार होता कारण आता प्रतिकार करण्याची विशाल मध्ये शक्ती नव्हती.इतक्या वेळापासून गप्प बसलेल्या मुकेशला रहावलं नाही त्याने आपला सत्तुर घेऊन वार केला पण तोपर्यंत वेळ झाली होती. वाघाने आपले काम पूर्ण केले होते .त्याचे छताड फाडुन प्राण पाखरू उडवले पण तोही मुकेशच्या प्रहारातून वाचला नाही मुकेशच्या सत्तूर ने त्याचे काम तंतोतंत केले आणि त्याचा पायच उडवला.किंकाळ्या फोडत तो जंगलात निघून गेला आणि ते सगळे विशाल जवळ जमा झाले.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED