काळ आला होता पण वेळ नाही आली होती - 1 Pankaj Shankrrao Makode द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

काळ आला होता पण वेळ नाही आली होती - 1

हे ब्रम्हदेव मी आजपर्यंत विधात्यांच्या मर्जीप्रमाणे कार्य करत आलो आहो, आणि ते मी कधीच विसरलो नाही. सर्व मानवलोक माझ्या या कार्याने थर - थर कापतात. पण आता मला या कार्याचा कंटाळा आला आहे. म्हणुन माझी अशी मागणी आहे की किमान ६ जणांचे मृत्यु हे मला माझ्या पद्धतीने घेता यावे यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे मला फक्त या ६ जणांची मृत्यु कशी घ्यायची हे ठरवु दया त्यामध्ये विधात्याची काहीही दखल नको किंवा वेळेचा बंधन नको. मला ज्या वेळेला वाटेल आणि ज्या प्रकारे वाटेल त्या प्रकारे मी त्यांचा मृत्यु निश्चित करु शकु.
काळराजांचे हे वचन ऐकून ब्रम्हदेव किंचित हसले. काळराजंचे अभिमान आणि विमुखता ब्रम्हदेवाच्या लक्षात आली आणि विधात्याने जे आधीच ठरवले होते त्याचप्रमाणे काळराज आज बोलत होते. हे त्यांना माहित होते. इथेच काळराजांच्या अभिमानाचा नाश होणार होता हे विधीने आधीच ठरवले होते. तरीही ब्रम्हदेवांनी ते आपल्या मुखावर न आणता काळराजांना म्हंटले, हे काळराज आपण आजपर्यंत जे आपली कामगिरी निभवली आहे त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. खरचं तुमचे कार्य अप्रशंसनीय आहे. तुमची ख्याती आणि भिती संपूर्ण पृथ्वीलोकात चहुकडे आहे, त्यामुळे तुम्हाला नाही म्हणणे हे बरोबर नाही म्हणून मी तुम्हाला आज्ञा देतो कि तुम्ही तुमच्या इ्छेनुसार ६ जनाचे मृत्यु निश्चित करु शकता तुम्हाला हव्या त्या प्रकाराने तुम्ही ते घडवु शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा काळ जरी तुमचा राहील पण वेळ नाही त्यावर माझी काही बंधन नाही ते तुम्हाला ठरवावं लागेल इतके म्हणून ब्रह्मदेव अनंतात विलिन झाले.
काळ राज इतके ऐकुन खुप खुश झाले आणि निघाले आपल्या शिकारी साठी स्वतः शी बोलत ,"वा आज पहिल्यांदाच मी माझ्या मनाप्रमाणे काम करणार सहा जनाचा मृत्यु मी माझ्या पसंती नुसार ठरवणार वेळ काय करणार जेव्हा काळ माझा आहे फक्त घटका मोजत राहणार ."
असे म्हणुन आपल्या प्रिय वाहन रेड्यावर स्वार झाले.
तिकडे वेळ राजाने काळ राजाचे जोरा जोरात हसणे आणि त्यांच्या बद्दल बोलणारे वाक्य ऐकले त्यांना प्रचंड राग आला माझी किंमत नाही काय वेळ आल्यावर कळेल मी कोण आहे ते तुम्हाला अद्दल घडविली नाही तर मी नावाचा वेळ राजा नाही.
पंकज आणि त्याचे पाच मित्रांनी आज नदीवर जायचा प्रोग्राम केला.मन नव्हते पण काय करणार मित्रांच्या हट्टामुळे मी जायला तयार झालो. मुकेश, नितेश, राहुल, विशाल, कार्तिक आणि पंकज अशे सहा निघालो आम्ही पार्टी करायला. संपूर्ण मार्गात पंकज हा आपल्याच तंद्रीत होता बाकी मित्र मात्र थट्टा मस्करी करत चालत होते मधताच ते पंकज ला चिडवत होते ,"ओ भाऊसाहेब काय हो नेहमी अँग्री यंग मॅन काय विचार करत राहतो बी चिल्ल यार ये न मस्ती करूया ,"तुम्ही करा बे माय ते टेन्शन नको घ्या,"
ये सोडा यार याला याच नेहमीचच आहे चला त्या झाडा खाली बसु सारे पत्ते खेळू , नित्या म्हणाला " हो हो म्हणत सगळे एका भल्या मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली बसले काही वेळ पत्ते खेळल्या नंतर सारे नदीत आंघोळ करायला गेले पण मी मात्र तिथेच बसुन त्यांना पाहत होतो काही वेळानी ते सारे पुन्हा जमा झाले राहुल ने आपली बाटली काढली सर्वांना दिली मग चिवडा खात गोष्टी सुरू झाल्या.
इतक्यात काळराज पृथ्वीचे भ्रमण करता करता तिथे येवुन पोचले ,आणि आपल्या रेड्या वरुन उतरून दुसऱ्या बाजूने शयन करण्यासाठी त्यांनी ते पिंपळाचे झाडच निवडले. इकडे हे सहा जन आणि तिकडे काळ राज असे ते चित्र होते प्रत्यक्ष काळ आणि मानव यांचे जिवंत उदाहरणं ते झाड होते ज्याने दोघांनाही एकत्र आणले होते.
इकडे माझ्या काळजात धासस्कान झाले असे वाटले की कोणतेतरी संकट आमच्या अगदी जवळ आहे आणि लवकरच ते आपल्या सर्वांना गिळणार अशी दाट शंका मला वाटू लागली . राहून - राहुन माझे पुर्ण अंग शहारत होते ,तस मला स्वतः ची तेवढी काळजी नव्हती पण ,आपल्या जीवापाड मित्रा बद्दल मला सतत काळजी वाटत होती .मनतल्या मनात देवाला प्रार्थना करत होतो त्या अजान संकटापासून रक्षण कण्याकरिता याचना करीत होतो.,"एे चला बे लई झालं असंन तुमचं घरी चाला लई ऊशिर झाला हाय माई ओरडल .," सर्वे माझ्या तोंडाकडे बघायला लागले.
विशाल म्हणाला," ए का यार पंक्या तूले नेहमी घाई रायते आताच तर आलो जाऊ थोड्या वेळाने घर का पळून चाल्ल वय, य दोस्तांनो मी काय म्हणतो तुमाले जाच असन त जा याच्या सोबत मी येतो थोडया येलान." त्यावर सर्वे म्हणले ," ए सारे सोबत आलो सोबत जाऊन यार सोड न कायले टेंशन घेतो.
त्यावर मी म्हणालो," अरे तस नाही यार थोड्या वेळात रात्र होईन अन आपल्याले जंगलातून जाच आहे म्हणून काळजी आहे."
विशाल बोलला,"ए भेकड काय हमेशा भित राहतो रे कोण आपला बाल बाका नाही करु शकत , हे जंगल म्हणजे आपला घर आहे आणि इथला कोपरा न कोपरा ओळखुन अाहो आपण . न कोणता जनावर आपला काही वाईट करु शकत न कोणत भूत रायली गोष्ट मृत्यु ची तर अजुन लई येळ आहे त्याले आपल्या कुशीत घ्या साठी यमराज बी आपला काई तेड नाय करू शकत समोर आला न त या कुऱ्हाडीने आडवा घालतो नाही थर थर कापुन पळाला तर नावाचा विशाल नाही. असे म्हणुन त्याने आपल्या कुऱ्हाडी वर हात फेरला आणि मिश्या वर ताव मारला.
तितक्यात मुकेश बोलला," ए साला मला समजला नाय हा साला यमराज आहे तरी कोण ? कसा दिसत? अन् तो येतो त कस माहित व्हत ? आजपर्यंत कोणच त्याले पायला नाय. पण एक गोष्ट आहे साला लई भेकड आहे साला मागून वार करतो समोर ये म्हणा दावतो त्याले ईंगा.
ज्याच्यात दम नाही राहत त्यालेच नेते आपल्या सोबत साला सांगुन काही नाही करत , अचानक माणसाल उचलुन टाकते स्वतः ले यमराज म्हणते साला थु अश्या कामावर याच्यात कोणती मर्दानी , लोकाले मारण्यात कोणता अभिमान , मी बी तुया सोबत हाय बे विशाल येवू दे साल्याले पायतो कसा माया जीव घेते त."
राहूल बोलला," पागल झाले का बे तुम्ही लोकं काई बी पट रून रायले थो का दिसते का येते त , त्याच कामचं आहे देवानं त्याले थे काम सोपवला आहे तस बी जर मानस मेले नाय त इथ किती पंचाईत व्हिन माहित हाय , पयलच त किड्या माकोड्या सारखे वाढत हाय, खा पायचे वांदे हाय वरुन जर कोणी मेल नाय त अजुन किती पंचाईत.
तस बी आपण मराच टेंशन घेत नाही एक न यक दिस जाच आहेच मग आता पासुन कायले ईचार कराचा जब तक जीना हैं तब तक पिना हैं चुलीत गेला यमराज न धेमराज आपला त फक्त देश राज," म्हणून बाटली तोंडाला लावली.
इतक्या वेळा पासुन आपल्या पत्यात गुंतलेल्या नित्याने मान वर करत त्या सर्वांना दुजोरा दिला," अबे सोडा बे तूम्ही लोक भाजला पापड नाय मोडण व व्हत तुमच्या न चालले तिथं यमराज ल आपली शान पट्टी दाखवाल. आपल्या स समोर आला न त आपण त म्हणु त्याले मले तीन पत्तीत हारव अन् मग खुशाल आपल्याले घेवुन जा , साला शैतान भी आपल्या ले मात नाय देवु शकत यमराज क्या चीज हाय. नाय नंगा करून पाठवला न त नावाचा नित्या नाय."
मी आणि कार्तिक गप्प होतो, अस नाही की आम्हाला त्यांच्या गोष्टीचा राग वगेरे आला होता पण जास्त करून कोणताही प प्रसंग टाळण्याचा आमचा विचार असायचा. आम्ही जास्त काही न बोलता सर्वांना घरी चालण्याचा आग्रह केला शेवटी त्यांना पण पुरे झाल्याची जाणीव झाली व सर्व परतीला निघालो.
इकडे काळ राज जेव्हा विश्राम करासाठी निंद्रवस्थेत होते तेव्हा या मित्रांच्या कोलाहलने त्यांची झोप मोड झाली , त्यांनी प्रत्येकाचा शब्द न शब्द ऐकला .,"काळ राज म्हणजे मी मृत्यू चा देवता ज्याला पृथ्वी तळावरील प्राणी थर थर कापतात अश्या क्रूर आणि महाकाय काळ राज यांना तुम्ही काहीच भित नाही ."आपला अनादर व निंदा ऐकुन त्यांना प्रचंड राग आला व त्याने या सहा मित्राची आपल्या शिकारी साठी निवड केली.
काळ राज स्वतः शी म्हणाले," तूच्छ माणसा मला हिनवतो काय , मि काळ राज माझी भिती नाहि काय तुम्हाला, मला इंगा दाखवता काय! अरे मला समजला काय तुम्ही! आता तुम्ही सहाचे सहा माझ्या काळाच्या अधीन आहात तुमचे प्राण आता माझ्या हाती आहे. कोणी तुम्हाला वाचवू शकणार नाही, बघा आता तुमचे काय हाल करतो ते माझा सामना कराल काय! अरे काळ राज आहे मी, माझ्या वर कोणाचे साम्राज्य नाही मला कोणीच अडवु शकत नाही आणि तुम्ही आहे तरी कोण न देव न दानव फक्त एक तुच्छ मानव काळा वर मानवाचे काहीच चालत नाही. आता तुमचा काळ जवळ आला आहे लवकरच तुमचा सामना त्याच्याशी होणार आहे बघतो काय करु शकता ते.,"हा: हा: हा: भयंकर अशे हास्य पुर्ण पृथ्वी तालावर गाजले आकाशात विजा कडाडल्या मी आणि कार्तिक ने ते हास्य स्पष्ट ऐकले होते.
पण काळ राजाला काय माहित होते की नियतीने अजुनच काही ठरविले होते. जरी पृथ्वीवर काळाचे साम्राज्य पसरलेले असले तरी नियतीने अहंकाराचे दमन कधी सावित्री च्या रूपाने तर कधी मार्कंडेय ऋषी मुनी यांच्या वतीने यमराजलाही शरण येण्यास भाग पाडले आहे. आणि
आज इथे पुन्हा तिचं पुनरावृत्ती होणार होती. मानव आणि मृत्यु दोघांच्याही अहंकाराचा आजपासून आमना सामना होणार होता. त्यात विजय कोणाचा आणि पराजय कोणाचा ते तर भविष्याच्या गर्भात होते. पण जे काही होणार होते ते अगदी असाधारण आणि आश्चर्य चकित करणारे होते. कदचित काळ राजाला पण माहित नव्हते की त्यांचा सामना कोणाशी आहे .तर आम्हाला पन् माहित नव्हते की काळ आमच्या मागे लागला आहे म्हणून. आणि आमच्या मध्ये जी शक्ती होती ती त्यांना पण माहित नव्हती.