jaal aala hota pan wel nahi aali hoti - 3 books and stories free download online pdf in Marathi

काळ आला होता पण वेळ नाही आली होती - 3

भाग ३
तो शांत जमिनीवर पडला होता. नुकत्याच झालेल्या त्या द्वंदचे निशान जमिनीवर होते. त्याच्या शरीरावर जागोजागी जखमेचे निशान होते .संपूर्ण शरीर रक्ताने माखले होते पण त्याचे डोळे आपल्या पराक्रमाची साक्ष देण्यास उघडे होते .मित्रांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांच्या लाडक्या वाघाने काळराजाच्याही नाकी नऊ आणले होते .सर्वांचे डोळे पाणावले होते. आपल्या मित्राची अशी करुन अवस्था पाहून सर्वांना गहिवरुन आले .थोडावेळ कोणालाही काहीच कळेना कि काय म्हणावे आणि काय बोलावे.अचानक भयानक शांतता तिथे पसरली होती. सुई पडेल तर त्याचाही आवाज येईल अशी नीरव शांतता तिथे पसरली होती आणि कोणीच कोणाशी बोलत नव्हते. फक्त सर्व एकमेकांकडे पाहत होते आणि एक नजर विशालच्या पार्थिव देहाकडे टाकत होते. प्रत्येकाला आपल्या मित्राचा अभिमान वाटत होता. आज त्याने स्वतःचे प्राण देऊन मित्रांच्या केसालाही धक्का लागू दिला नव्हता. मैत्रीचा खरा अर्थ त्याने सिद्ध करून दाखवला होता. आपल्या नावाप्रमाणेच त्याने आपले कर्म सार्थक केले होते.
मग सर्वांनी मिळून त्यांच्या पार्थिव शरीराला गावात आणले.सर्वत्र हाहाकार माजला .पूर्ण गाव त्या वाघाला श्रद्धांजली द्यायला आले. कुणी हे मानायला तयार नव्हते किं वाघ विशालची शिकार करू शकतो म्हणून कारण सर्वांना त्याच्या सामर्थ्य विषयी चांगलेच ठाऊक होते.गावात त्याचा पुतळा उभारण्यात आला कारण तो सर्वांचा लाडका होता.
असेच काही दिवस निघून गेले कोणीच कुणाशी बोलले नाही सर्वच आपापल्या कामात मग्न झाले कारण भेटलो तर विशालच्या गोष्टी निघणार म्हणून सर्वजण एकमेकांशी भेटणे टाळत होते.पण अचानक तीच भीती आणि जाणीव मला पुन्हा झाली म्हणून मी घराबाहेर पडलो आणि सरळ मुकेश च्या घरी गेलो मला बघून मुकेश म्हणाला "अरे ये पंक्या लय दिवसान आला विसरला काबे थांब चा करतो बस खाटेवर"
तसं त मला सर्वच मित्र प्रिय होते पण मुकेश बद्दल माझा लगाव जास्त होता. आम्ही लहानपणापासून एकत्रच वाढलो खेळलो होतो. का कोण जाणे? आज सकाळपासूनच मला त्याबद्दल चिंता वाटत होती. एक अजान भीती वाटत होती .म्हणून मुद्दाम मी त्याच्याकडेच गेलो होतो. पण काळाचा डाव होता दुसऱ्यावर हे मला माहीत नव्हते.इकडल्या तिकडल्या गोष्टी झाल्यावर मी विचारलं.
मी= मुक्या आज कुठे जाणार हाय काबे तू?
मुकेश= व्हय शेतावर जातो बैलाले चारा टाकले. काई काम आहे का? तू म्हणशील तर धम्या ले पाठवतो
मी= नाय रे असच ईचारलं चल मग मी बी येतो तुया संग तसा भी मल काई काम नाय हाय.
मुकेश =हे तर बेस झालं तसा बी म्या यकटा जाणार हुतो ,तू येणार म्हणल्यावर म्या कसं नाही म्हणणार चल जाऊया.
मी= बे नित्या, राहुल्या, कार्तिक कुठे आहे बे? तुई भेट नाही का त्यांच्यासोबत?
मुकेश =नाही बे आलेच नाही साले .का माहित विशाल्या मेला तवापासून भटकलेच नाही.
मी=चाल मग जाता जाता त्यायले बी भेटू.
मुकेश =व्हय चाल.
आज राहुल्या सकाळपासूनच प्यायला बसला होता. जेमतेम पहिला घटका झाला होता आणि काळ राजांनी दुसरी निवड राहुल्याची केली होती. तसं पाहिलं तर ही काळराजाची आसान शिकार होती आणि त्याला गंडवण्यात जास्त काही करावं नाही लागेल असं काळराजाला वाटत होतं .हा तर दारुड्या याला नशेतच उचलायचे असा विचार काळराजांनी केला आणि एका गावकऱ्यांचे रूप घेऊन तो सकाळी त्याच्या घरी आला होता आणि त्याचा प्रोग्राम चालूच होता.
इकडे मुक्या नित्या कार्तिक आणि मी असे चौघ जमलो थोड्या चर्चा झाल्या मग मुक्या ने राहुल्याची आठवण काढली;
मुक्या="बे राहुल्या कुठ आहे बे ?दिसून नाही रायला.
नित्या=कुठे गेला असंन बसला आसंन भट्टीत धोकसत.
कार्तिक=नाही बे भट्टीत नाय हाय मी तिकडेच हुतो.
मी=असं व्हय म्हणजे घरी असंन चला येऊ त्याले भेटून.
इकडे दुपारची वेळ झाली होती दारूच्या कई बाटला खाली झाल्या होत्या. पण राहुल्या काही दम नाही खात होता आणि इतका पिऊन पण आरामात तंगड्या तोडत काळराजा सोबत बसला होता.सर्वसाधारण माणूस जर इतका पिला असता तर आतापर्यंत तो आडवा झाला असता. पण राहुल्याला पास्ता- पास्ता काळराजाच्या नाकी नऊ येऊ लागले .मनात विचार करू लागले याच्या पोटात काय खंदुक आहे काय ?घटकतच जात आहे . याला आता दुसऱ्या मार्गाने उचलावा लागेल असा विचार करून त्याने त्याला घराबाहेर आणले आणि गोष्टी गोष्टीत त्याच्या मृत्यूचे कारण जाणून घेतले.
त्याची एकच कमजोरी होती ती म्हणजे त्याचे हृदय खूप हळवे होते.त्याला लवकरच कुणाची पण कीव यायची. आपल्या डोळ्यासमोर कुणाचे वाईट होतानि तो बघू शकत नव्हता.जरी तो बेवडा असला तरी मनाने खूप चांगला होता. त्यानुसार नियतीने पुन्हा एकदा राहुल साठी डाव रचला होता आणि खुद्द त्याच्या सोबत त्याचे प्राण घेण्यासाठी काळ राज सज्ज होते.
गोष्टी गोष्टीत तो इसम राहुलला गावाच्या बाहेरच्या चौरस्त्यावर घेऊन आला आणि त्याचा निरोप घेत तिथून तो गायब झाला .त्याच्या या अचानक गायब झाल्याने राहुल्या थोडासा भांबावला पण नंतर त्याला असे वाटले की आपल्याला दारू जास्त झाली आहे त्यामुळे त्याने त्या गोष्टीचं तेवढं मनावर नाही घेतलं. पण अचानक राहुल याला त्याची प्रेयसी मिनीचा आवाज आला पण तो नेहमीसारखा नव्हता .ती कुठल्यातरी संकटात असल्यासारखा त्याला आवाज आला .तो जिथे उभा होता तो गावचा रस्ता होता त्याच्या आजूबाजूला घनदाट झाडे झुडपे होती .त्यामुळे रस्त्याच्या पलीकडील काही दिसणे शक्य नव्हते. पण कुजबुज आवाज मात्र स्पष्ट होता .सोबत असलेला तो मनुष्य अदृश्य झाला होता .राहुलने डोळे चोळत आजूबाजूला बघितले पण त्याला कोणीच दिसले नाही. राहुल्या स्वतःच पुटपुटला "साला आज पहिल्यांदा आपल्याला दारू चढली वाटत घरी जाऊन झोपूया."
तो घरी जायला वळणार इतक्यात एक जोरदार किंकाळी त्याला ऐकू आली आणि त्याच्या डोक्यात एकच संवेदना जागली .कुणीतरी संकटात आहे, कुणीतरी त्याला बोलवत आहे आणि ही त्याची नशा नाही हे सत्य आहे. तोच पुन्हा तीच किंकाळी ऐकू आली आता मात्र त्याला पूर्ण खात्री झाली .तो त्या आवाजाच्या दिशेने वाटचाल करून गेला. त्याला बघून असं वाटत नव्हते की थोडा वेळ आधी त्याने दारूच्या बाटल्या पोटात ओलांडल्या होत्या. एवढ्या नशेत तो भर जंगलातून पूर्ण शुधिने आणि चपळाईने चालत होता.जसजसा आवाज येत होता तस- तसा तो समोर वाढत होता .त्या दिशेने आणि आता तो अगदी जवळ होता. समोरच एक उंच शीला होती आणि आवाज त्या शिळेच्या मागूनच येत होता. तसा तो समोर वाढला आणि शिळेच्या मुखावर उभा होऊन खाली बघू लागला समोरचे जे दृश्य होते ते हादरवून टाकणारे होते.
एक अठरा ते वीस वर्षाची तरुणी एका अस्वली समोर होती आणि ती अस्वल त्या मुलीवर अत्याचार करीत होती व ती त्याच्यापासून रक्षण करण्यासाठी ओरडत होती. मदतीचा धावा करत होती .जेमतेम तिने तिला अर्धनग्न केले होते .जागोजागी तिला जखमा केल्या होत्या आणि ती दुसरी कोणी नाही तर राहुलची प्रेयसी मिनी होती आणि तिच्या समोर असवलीचे चे रूप घेऊन काळ राजाने आपल्या शिकारीसाठी चाऱ्याची निवड केली होती. हे बघून राहुलला खूप राग आला .तसं बघितलं तर तो सडपातळ आणि साधारण शक्तीचा मनुष्य होता. त्याची असल शक्ती त्याच्या हृदयात होती .मागचा पुढचा विचार न करता तो त्या अस्वलिवर तुटुन पडला . हळुच मिनिला बाजूला सारत थोडा दुर मोकळ्या जागेत आला.अचानक झालेल्या हल्ल्याने अस्वल थोडी भांबावली व नंतर वार करण्यास तिने राहुल कडे धाव घेतली पण राहुल त्यासाठी तयार होता. त्याने चपळाई दाखवत हळूच आपले अंग चोरले आणि अस्वल झाडाला आदळली. चुकलेल्या हल्ल्यामुळे ती आणखीनच पिसळली आणि या वेळेस तिने ही संपूर्ण शक्तीने त्यावर धाव घेतली .तसा राहुल सावध होता पण अंगात जास्त बळ नसल्यामुळे लाख चपळाई करून सुद्धा त्याच्या पोटाला तिच्या वाघेऱ्या नखाने अर्धे -परधे फाडत नेले .पण त्याकडे लक्ष न देता त्याने अंगातला शर्ट काढून पोटाला गच्च बांधला आणि काही प्रमाणात का असेना त्याने आपल्या रक्तस्त्रावला आळा घातला .त्याने मिनीला जोरात आवाज देऊन गावाकडे पळून जाण्याचा सल्ला दिला पण कदाचित त्याचा हेतू अस्वलीला कळून चुकला . कारण तीच तर त्याची कमजोरी होती जर तीच गेली तर मग तो आपल्या चपळाईने वाचून निघून जाईल आणि काळ राजाला हे मान्य नव्हते. हाच एक अवसर होता त्या तिघांमध्ये जास्तीत जास्त पाच पावलांचा अंतर होता . अस्वलीने मिनी वर नजर रोखली, राहुलने ती हेरली कदाचित तिचा डाव त्याला कळून चुकला होता . बस आता तो क्षण आला होता जेव्हा कधी पण काहीही होऊ शकत होते.
इकडे आम्ही चार मित्र त्याच्या घरी गेले तर तिथले वातावरण पाहून मला उगाच संशय आला. मित्रांना संबोधून मी म्हणालो"साला इतक्या बाटल्या पडल्या हायत इतका पिऊन हा कधी बाहेर जात नाय घरीच झोपून रायते. शिवाय बाजूच मंग्या सांगत होता ,की कोणीतरी पाहुणा आला म्हणून त्याला सोडले चौरस्त्यावर गेला म्हणे. जिथपर्यंत मले माहित आहे त्याले आपल्या शिवाय कोणीच नाय.माय बाप त कवाच गेले .कोणी नातेवाईक हाय असं मले नाही माहित. तुले माहित आहे का बे मुक्या?"
मुक्या म्हंनला"नाय बे त्याचं कोण आलं इथं"
कार्तिक म्हणाला "बरं चाल जाऊन पाहू कोण व्हय त त्यालेच इचारू.
असे म्हणून चौघेही चौरस्त्यावर आलो पण तिथे आम्हाला कोणीच दिसलं नाही.
"इथं त कोणी बी नाय हाय बे ."मुक्या म्हणला
तितक्यात कार्तिकला राहुलच्या गळ्यातील लोकेट रस्त्याच्या बाजूला आढळून आले.
सगळ्यांना संबोधून तो म्हणाला" बे लेक हो पाहा राहुल्याच लॉकेट .पण ह्यो कुठे दिसत नाही .गेला कुठं ? चाला थोडंसं आत जाऊन बगु जंगलात गेला असंन काड्या आणाले.
पण मला मात्र काहीतरी विचित्रच वाटत होतं.काहीतरी घोळ असल्याचा अंदाज मी लावू शकत होता. काही अंतर चालत गेल्यावर आम्हाला एक उंच शिळा दिसली. इतक्यात माझ्या कानावर कसलातरी आवाज आल्याचा भास झाला. "बे चला रे त्या शिळेच्या टोकाल .मले कायच तरी आवाज आला ."असं म्हणून आम्ही चौघ शिळेच्या मुखावर आलो आणि समोरचे जे दृश्य होते ते पाहून सर्वच जण शहारून गेलो.
मिनी राहुल आणि अस्वल अशी त्रिकोणीय परिस्थिती आमच्या निदर्शनास आली आणि फक्त क्षणाचा विलंब पण होणार नव्हता काही व्हायला .करा किंवा मरा अशी वेळ राहुल वर होती .चपळाई दाखवून वार चुकवणे जमले नसते .तो झेलावाच लागणार होता.करा किंवा मरा ची पाळी आता तिथे निर्माण झाली होती. तोच अस्वली ने मिनी वर झेप घेतली. राहुल पण तयार होता त्याने सुद्धा थेट मधात झेप घेतली. इकडे मुकेशने आपला कोईता त्या दिशेने भिरकावला होता .नेम चुकणे शक्य नव्हते पण उशीर झाला होता .आपल्या काटेरी जीभेने तिने राहुलचा गळा फाडला होता आणि मागून कोयत्याने आपला वार तिच्यापाठीवर केला होता. ती विव्हळत जंगलात पळून गेली .इकडे राहुलच्या गळ्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या आणि आता तो आपल्या शेवटच्या घटका मोजत होता. मिनी धावत त्याच्याजवळ जाऊन त्याला आपल्या मांडीवर घेऊन धाय मोकलून रडू लागली होती. आम्हीपण लगबगीने खाली उतरलो पण जोपर्यंत आम्ही पोचणार तोपर्यंत राहुल ने मिनीच्या मांडीवर आपले प्राण सोडले. आपल्या प्रेमासाठी राहुलने आपल्या प्राणांचे बलिदान केले होते. मिनीचे रडू आणि राहुलच्या केविलवाणा क्षत विक्षत देह पाहून आम्ही सर्व तिथेच एकमेकांना धरून रडू लागलो.एका प्रियकराचा असा दारुण अंत पाहून निसर्गाला सुद्धा रहावले नाही आणि तो सुद्धा पाऊस रुपी धारा सोडून रडू लागला व आपली श्रद्धांजली अर्पित करत होता.
पुढे काय झाले त्यासाठी भाग ४ वाचायला विसरू नका तसेच आपले मत आणि अभिप्राय कळवा जेणेकरून अजुन लिहिण्यास मला प्रेरणा मिळेल.

इतर रसदार पर्याय