jaal aala hota pan wel nahi aali hoti - 4 books and stories free download online pdf in Marathi

काळ आला होता पण वेळ नाही आली होती - 4

4काळ आला होता पण वेळ नाही आली होती भाग 4
कळत नकळत काळाने आमच्या आणखी एका मित्राला आमच्यापासून हिरावून घेतले होते.आणि आम्ही फक्त मूक दर्शक बनून पहात राहिलो होतो. राहुलचे कोणीच नसल्यामुळे मीच त्याचा अंत्यसंस्कार केला.गावात पुन्हा एकदा शोकांतिका पसरली कारण राहुल जरी पिणारा असला तरी कधी कोणाला तो वाईट बोलला नाही किंवा कधी कुणाशी वैर नाही. उलट तो कोणाच्याही मदतीला तयार असायचा आणि त्याच्या याच गुणामुळे तो आज आमच्या हयात नव्हता.
एकेक करून आम्ही सगळे घरी परतलो. आज सगळे शुन्यातच होते.कुणालाही काहीच सुचत नव्हते.मी बिछान्यावर पडुन झालेल्या दोन्ही घटनाक्रमावर थोडा विचार केला पण काहीही जुळवू शकलो नाही. केवळ योगायोग वाटत होता काहीच तथ्य सापडत नव्हते.
दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता उठलो तर मला असे जाणवले की एक विशालकाय सावली माझ्या समोरच्या भिंतीवर आहे.पण पुढच्याच क्षणी ती नाहीशी झाली.माझा भ्रम समजून मी बाहेरच्या पायरीवर बसलो.मग थोड्यावेळाने फ्रेश होऊन बाहेर जाण्यासाठी तयारी केली.गावातील मोठ्या वडाच्या झाडाखाली पत्ते खेळत नित्या बसला होता.मी पण जाऊन बसलो नीत्या म्हणाला"ये पंक्या एक एक हात होऊन जाऊदे." मी नाय म्हणलो "तूच खेळ बे आपण जुगाराच्या दहा हात लांब भावा.ठीक हाय "म्हणत तोआपल्या खेळात गुंतला.
तसे गावातील वातावरण रोजच्या सारखे सर्वसाधारण होते पण एक कमालीची शांतता मला आज गावात वाटत होती.एरवी गावात प्रसन्नता आणि हिरवळ वाटायची पण आज अस्वस्थच वाटत होतं मला त्या गावात.
पण मला काय माहित होते कि काळ आज नित्याच्या डोक्यावर नाचत होता म्हणून.आज त्याचा नंबर होता. आज जे घडणार होते तर झालेल्या दोन्ही घटनांच्या आणखीनच भयानक घडणार होते. याची किंचित चाहूल सुद्धा कुणाला नव्हती.तिकडे काळ राज विचार करीत होते की माझी दोन शिकार तर माझ्या मनाप्रमाणे माझ्या ओघात आली.पण आता याच्या साठी काहीतरी वेगळे विपरीत आणि आणखीनच रोमांचक केले पाहिजे.तसा तर याला पाहून वाटत नाही की हा मरण्यासाठी वाट पाहिल. एक डाव आणि खेळ खल्लास झाला. पण त्यांना तरी काय माहित होते ज्याला ते साधारण व्यक्ती समजत होते तो नित्या किती कट्टर डाव पेच खोर होता. हरलेला डाव पण जिंकण्याची त्याच्यात क्षमता होती.कोणतीही परिस्थिती का ना असो पण जेव्हा त्याच्या जीवावर कोणती गोष्ट आली की आपल्या तल्लख बुद्धीने त्यावर मात करायचा.
एक धडधाकट आणि बलाढ्य व्यक्ती अचानक काही व्यक्तींसोबत जिथे जुगार चालू होता तेथे प्रकट झाले.ते गावातले तर मुळीच वाटत नव्हते आणि त्यातील प्रत्येक जण एखाद्या राक्षसा प्रमाणे वाटत होते.
ते चार जण होते यमराज आणि त्यांची यमदूत गावकऱ्यांच्या वेशात धर्तीवर विराजमान झाले होते.तो कट होता त्यांचा. जेमतेम मध्यान्ह झाली होती.गावातील मंडळी शेतावर निघून गेल्यामुळे गावात फक्त स्त्रिया, मुले आणि वृद्ध व्यक्ती होते.म्हणजे किंचित गाव विरानच होते.आज मुक्या पण गावात नव्हता. काही तरी कामाकरिता तो बाहेरच्या गावाला गेला होता.
आणि कार्तिक आपल्या लिखाणाच्या कामात गुंतला असेल कदाचित म्हणून आतापर्यंत त्याचा काहीच ठावठीकाणा नव्हता. त्याला लेखनाची इतकीआवड होती की तो गावात कधी काळीच भेटायचा. त्याला भेटायचं राहिलं तर नदीकाठी किंवा एखाद्या झाडाखाली त्याला शोधावं लागे तसा त्याचा व्यवसाय हा मासेमारी तो एक उत्कृष्ट तैराक आणि कोळी होता. खळखळत्या वाहणाऱ्या नदीच्या पात्रातून शंख शिंपले आणण्याचे धाडस त्याच्या व्यतिरिक्त कोणीच करू शकत नव्हता. एखादा मासा जितक्या कुशलतेने पाण्यात पोहोणार त्याचप्रमाणे त्याची तैराकी होती.जर एखाद्या वेळेस गावातील कोणी पाण्यात बुडाल्याची किंवा काही घटना झाली असल्यास पोलिस त्यालाच बोलवायचे कारण तो च एक होता जो नदीच्या पोटात शिरून सुद्धा मोती किंवा एक रुपयाचा शिक्का सुद्धा हुडकून काढून आणायचा.पण त्याचं मन हे जास्त करुन लेखनात आणि निरनिराळ्या वस्तू संग्रहित करण्यात जास्त असे पण वेळ आल्यावर तो आपल्या अंगी असलेल्या गुणामुळे लोकांना मदत पण करायचा.
इकडे नित्या जुगारात व्यस्त असताना अचानक खरोखर त्या आव्हानात्मक आवाजाने त्याचे लक्ष वेधले.
"जरा आमच्या सोबतही दोन दोन हाथ होऊन जाऊ दे....र...आम्ही पण बगु तुया हाताची जादू. असं ऐकलं हाय की तुले जुगारात कोणी बी या गावात जिकु नाय शकत. भल्या भल्या जुवाऱ्याले तुन मात दिली हाय मनते.दम हाय त मले हरवुन दाखव. म्या बी पायतो कसा जिंकतो त."
तो भरभक्कम व्यक्ती त्याला आव्हान देत म्हणाला तो आणखी कोणी नाही तर खुद्द यमराज होते.त्याचे बोल ऐकून नित्या थोडा खावळला आणि म्हणाला"ए जा बे इथून नीघ साल्या. चांगला गेम रंगला हाय बिगडवू नको. ई त पाचशे रुपयाच डाव लागला आहे. तुयासारख्या फाटक्या आणि फुकट्या लोकांच इत काई काम नाही."
नित्याचे हे धाडस पाहून मला तर खरंच नवल वाटले कारण त्या व्यक्तींना पाहूनच कोणताही माणूस जागीच गर्भगळीत होणार.असे त्याचे त्यांचे अक्राळ विक्राळ रूप पाहूनच कुणाचीही घाबरगुंडी होऊन जाणार.त्यांना हुल देणे तर दूरच त्यांना प्रत्युत्तर देणे पण कुणाला जमण्या लायक नव्हते. तिथे बसलेल्या व्यक्तींना पण थोडे आश्चर्य वाटले पण त्यांना नित्याचा स्वभाव माहीत होता. एकदा का जर तो खेळण्यात गुंगला तर त्याला तहान भूक पण नाही लागत होती आणि अशा वेळेस तो कुणाची पर्वा नाही करायचा.
नित्याचे ते धीट वचन ऐकून काळराजाला खूप राग आला पण स्वतःला सावरत त्यांनी म्हटले "आर ह्यो काय चिल्लर खेळ खेळतोय, ह्यो घे माया पाच हजारांचा डाव आता बोल.दम असल तर मले हर्वून दाखव. जर तु जिकलास तर या पाच हजाराचा मालक तू आणि ह्यो माया सोन्याच्या कडा पर तुया. पर याद राख हरलास तर मी तुला जीता सोडणार नाय कारण मले हरवणे वाला अजुन पैदा झाला नाय आणि म्या अस्तानी म्या दुसऱ्या जुगाऱ्याले जगु देणार नाय.
काळराजाच्या आमिषाने नित्याचे डोळे चमकले.अचानक इतके पैसे पाहून त्याचे मन फुलले शिवाय काळराज्याच्या आव्हानाने त्याला थोडा राग आला कारण आजपर्यंत जुगारात त्याला कोणी इतके मोठे आव्हान कधीच नव्हते दिले शिवाय त्याला जुगारात हरवणे आमच्या गावात तरी कुणाला शक्य नव्हते.
पैशापेक्षा त्याला आपला मान प्यारा होता. त्याला असे वाटले की हा व्यक्ती आपल्याला आपल्याच गावकऱ्या समोर अपमानित करत आहे आणि हे त्याला कधीच मान्य नव्हते.
इतक्या वेळ पासून मी हा सर्व प्रकार पाहत होतो.आधी तर मी लक्ष नाही दिले पण त्या व्यक्तीच्या धमकीने मी थोडा सावध झालो कारण मला त्याच्या हावभावावरून तो खेळायला आले असं वाटतच नव्हतं. मी मध्यंतरी केली "ए...ए कोण र तुम्ही? कोठून आले? या गावात तर आधी पाहिलं नाय तुमाले.अन हे का खेळाच् आहे तर खेळा हे मारण्याच्या धमक्या देणार तुम्ही कोण? जर पैसा लावायचं असल तर खुशाल लाव? पर मरण्या मारण्याचं धमक्या इत नाय चालणार. चला चालते व्हा इतन."
त्यावर नित्या म्हणाला,"तू चूप बे काई बी पटरुन रायला, हा मलेका हारवन.याले माईतच का हाय माया बद्दल मी का चीज हवो तर. आपल्याले का कराच कुठून आले त? मले काई नाई होत तू टेनसन नको घेऊ. अन् तु हायस न व इत बगच कसा भिकारी करुन पाठवतो की नाई त.
माझ्या लाख समजावून पण तो नाही मानला आणि सुरु झाला नियतीचा खेळ. कोणाला माहित होतं की हा जुगाराचा डाव नसून नियतीने मृत्यूचा खेळ मांडला होता.
नित्याने स्वीकारलेल्या आव्हाने यमराज मनातल्या मनात हसले आणि स्वतःशी बोलले "फसला आता माझ्या तावडीत". काळ राजाला वाटले कि ते नित्याला आरामात हरवणार पण त्यांना तरी काय माहित होते की त्यांचा पल्ला कोणासोबत पडला आहे म्हणून.तीन पत्ती चा तर तो मास्टर होता पत्ते त्याच्या हातात आल्यावर त्याचीच बाजू घेत होते.
पहिला डाव पडला दोन्हीकडे पत्ते वाटले गेले इतरांकडे सर्व चांगले पत्ते आले त्यामुळे ते आणखीनच खूष झाले. इकडे नित्याकडे फारसे गेम मारण्याला पत्ते नव्हते आले. आज पहिल्यांदाच पत्ते त्याला धोका देत होते. हे पाहून तो थोडा चिंतेत आला पण लगेच त्याने स्वतःला सावरले कारण समोरच्या व्यक्तीकडे कोणते पत्ते आहेत हे त्याला चांगले ठाऊक होते आणि गेम कसा पलटवायचं यात तो निपुण होता.
एकेक करून पत्ते पाडण्यास सुरुवात झाली नित्याने हुशारीने हलके पत्ते सोडले ज्याची गरज समोरच्याला नव्हती आणि नाईलाजाने समोरच्या व्यक्ती त्याला हवे असलेले पत्ते सोडायला लागले होते.कमालीचं डाव पेचाने काळराजांच्या डोक्यावर आठ्या आणल्या. ते विचारात पडले की माझ्याकडे इतके चांगले पत्ते आल्यावर सुद्धा माझा खेळत बसत नाही आहे. शेवटी नित्याने आपले पत्ते शो करत सर्वांना चकित केले. पहिला डाव त्याने फत्ते केला होता. त्या सर्वांना आश्‍चर्याचा धक्काच बसला त्याची खेळी बघून.
त्यानंतर दुसरा तिसरा डाव पण त्याने कुशलतेने पार केला.जणू आता पत्ते फक्त त्याच्या हाताचे इशाऱ्यावर नाचत होते.खेळ जबरदस्त रंगला होता. काळ राज आणि त्यांचे साथी खरंच नित्यांसमोर हतबल झाले होते.त्यांना काही सुचतच नव्हते की काय करावे आणि काय नाही कारण काही केल्या नित्या डाव सोडत नव्हता. ते सर्व हैरान झाले होते. यावर मग काळराजनी तोडगा काढला. आपल्या दैवीशक्ती ने त्यांनी सर्व पत्ते बदलून टाकले कारण हा डाव शेवटचा होता आणि काही केल्या तो त्यांना जिंकायचा होता.पण जे पत्ते त्यांच्याकडे तेच नित्याकडे काळजाने नित्याला शो करायला लावले. त्याने आपले पत्ते शो केले तेव्हा तेच पत्ते काळराज यांनी त्याला दाखवत म्हटले," ए हरामखोरा खेळत दगाबाजी करतोय व्हय. पत्ते चोरून टाकतोय काय.हे पाहून नित्या थोडा चमकलाच "तोंड सांभाळ दगाबाजी नित्याच्या रक्तात नाई तुच काईतरी घोळ केल सा, तुन आपल्याजवळचे पत्ती चोरून टाकले आणि दोष मले देत हाय. चाल निग इथन. चालता हो ....ते सर्व उभे झाले आणि काळ राजान नित्याची कॉलर पकडत त्याला ओट्या वरून खाली फेकले.त्यांच्याकडे घातक शस्त्र होती हे आम्हाला माहीतच नव्हते.त्या सर्वांनी सत्तुर्, तलवार ,चाकू काढले नित्या कोसळत खाली पडला.
त्या अचानक झालेल्या हल्ल्याने मी आणि आसपासचे लोक थोडे भांबावून गेलो.नित्या ही थोडा बिचकला. पुढच्या क्षणीच काळ राजाने त्याच्यावर वार करायचा प्रयत्न केला पण नित्याने ते आधीच हेरले होते तो लगेच बाजूला सारला. तो व्यक्ती तिथेच जमिनीवर कोलांट्या खात दुसऱ्या बाजूला पडला. तोच सोबत असलेल्या तिघांनी त्याच्यावर हल्ला करण्यास कुच केली. आतापर्यंत मुक दर्शक पहात बसलेला मी भानावर आलो मला आधीच त्यांचे ईरादे ठीक वाटत नव्हते आणि आता चक्क त्यांनी नित्यावर हल्ला बोलला.तर माझा राग तळपायाला गेला. जवळच असलेल्या लाकडी दंडाला हातात धरून मी त्या दिशेनेच कूच केली. आणि ते तिघे नित्यावर वार करणार तोच मी त्याला लाकडी दंडणे रोखला आणि त्याला आधार देत त्याला उठून उभे केले. आता तोही सावरला होता आणि आता आम्ही दोघेही त्या भिम काय नराधमांचा सामना करण्यासाठी सज्ज झालो होतो. पण त्यांच्या शक्तीपुढे आमची शक्ती टिकाव लागनार नव्हती शिवाय आमच्याकडे त्यांचा सामना करण्यासाठी काही शस्त्र पण नव्हती.आणि आमची मदत करण्यासाठी गावात नवयुवक पण कोणी नव्हते. फक्त वयोवृद्ध मंडळी तिथे होती शिवाय कार्तिक आणि मुख्य म्हणजे मुक्या गावात नव्हता कारण विशाल नंतर जर आमच्या मध्ये जर कोणी लढण्यात तरबेज आणि बलशाली कोणी होता तर तो मुक्या तो एकटाच चार पाच जणांना भारी होता तो असताना कोणी माणूस आमचं काही वाईट करूच शकत नव्हता. कित्येक पैलवानांना त्याने आखाड्यात मात दिलेली होती एका रेड्याचे बळ त्याच्या अंगात होते मोठमोठाले पैलवान तो मैदानात उतरला की घाबरून पळत सुटायचे.
आता ते चौघेही आम्हाला घेरून फाडून खाणाऱ्या नजरेने घुरत होते असं वाटत होते की ते आमचा एक झटक्यात फाडशा पाळून मोकळे होणार होते .
जरी आम्ही कमजोर असलो तरी इतका असानीने हार मानणारे नव्हतो मि नीत्याला म्हटले,"बगितलंस साल्या मी म्हणत व्हतो न वं हे साले भलत्याच इराद्याने गावात आले हाय.यायल खेळाच फक्त बायना पाईजे व्हता पण साला आपण तर यायल वळखत नाही आपली कोणासोबत काई दुश्मनी बी नाई मग साले हे कायले आपल्या मागे लागले बे."
नित्या बोलला" अबे काही नाही न बे माजलेले हाय साले यायल माईती नाई आपण का चीज हावो त साले कमजोर समजुन पंगा घेतला हाय त्यानं मुक्या येईन च थोल्या येडात तवपर्यंत यायले आपण गुरफटून ठेवु यकदा का तो आला मंग तेंसन नाय या हराम खोराचे तंगडे तोडाले लावतो त्याले."
पुढच्या क्षणीच काळ राजाने नित्यावर झडप घेतली आणि त्या तिघांनी माझ्याकडे. एकीकडे मी त्या तिघांशी झुंज देत होतो तिकडे काळ राज आणि नित्याची झुंज चालू होती माझ्या हातात धडधाकट काठी होती आणि मला माहिती असलेल्या दांडपट्टा मुळे मी त्या काठीने त्या तिघांचे वार अडवू शकत होतो.
पण तिकडे नित्याला कोणत्याही शास्त्राचे ज्ञान नव्हते. तो फक्त वार चुकवत होता. शिवाय त्याच्या अंगात इतकी ताकद पण नव्हती की तो त्या विशालकाय व्यक्तीचा सामना करू शकणार.पण त्याची खरी शक्ती ती त्याच्या मेंदूत होती हे मला ही माहीत नव्हते.पण आज प्रत्यक्ष त्याच्या कमालीच्या अंग चोरण्याची कला पाहून मी दंगच झालो. पण नकळत कोयताचा एक वार त्याच्या पोटावर झाला आणि त्याचे पोट फाटून रक्त वाहू लागले. पण भांबावून न जाता त्याने अंगातील शर्ट काढून पोटाला घट्ट आवळून बांधला व विचार करू लागला की समोरच्या प्रतिद्वंद्वीला मात कशी द्यायची. यावर उपाय योजू लागला तोच एक भयानक हास्य त्याच्या होटावर नाचले. जणु आता तो विजय प्राप्त करणार इतका त्याचा आत्मविश्वास दिसत होता. काळ राज पण किंचित त्याच्या या विस्मय हास्याने चकित झाले.
खरंच पुढे जे झाले त्याने मला पण विचार करण्यास भाग पाडले जवळच असलेल्या विजेच्या खांबाला त्याने पूर्ण शक्तीने हालवणे सुरू केले.आमच्या गावात वीज ही लाकडी बासावर तारे टाकून आणण्यात आली होती.त्याच्या धक्क्याने ती खांब जर्जर अवस्थेत असल्यामुळे तुटुन पडला व विजेची तार चक्क काळ राजाच्या अंगावर कोसळली.त्यामुळे जरी ते देव असले तरी सध्या माणसाच्या रुपात होते आणि त्यामुळे पृथ्वीतलावरील नियम त्यांनाही लागू बसत होते. विजेचा जोरदार झटका त्यांना बसला व त्यांचा एक हात पूर्ण भाजला गेला.इकडे त्या तिघांनी मला अडवून ठेवले होते काही केल्या ते मला नित्याच्या मदतीला जाऊ देत नव्हते. नित्याने आता जमिनीवरील मोठे मोठे दगड घेऊन ते एका कापडात गुंडाळले आणि माझ्यावर तुटून पडलेल्या त्या तिघांपैकी एकाला जोरदार गिरक घेऊन निशाणा लावला.मार अचुक त्याच्या डोक्यावर लागला आणि तो बाजूला डोके पकडून बसला. तो दुसऱ्यावर वार करणार इतक्यात काळ राज उठून उभे झाले. त्यांनी दुसऱ्या हाताने सुरा उचलून नित्या कडे धाव घेतली. नित्याचे त्याकडे लक्ष नव्हते.तो माझ्या दिशेने येत होता. तोच मागुन काळ राजांनी त्याच्या पाठीत सुरा खुपसला.वार जोरदार होता नित्या पाठीला हात लावत तोंडाच्या भारावर जमिनीवर पडला.
तो पडताच आपल्या साथीदारांना आवाज देत काळ राज म्हणाला," ए चला रे आपला शत्रु संपला चला पळा इथंन आणि त्या तिघांनी तिथून पळ काढला.नित्याचे रक्तरंजीत शरीर जमिनीवर पडलेले होते. मी धावत त्याच्या जवळ जाऊन त्याच्या श्वास चालू आहे काय हे बघत होतो पण वेळ झाली होती. नित्याचे प्राण केव्हाच उडाले होते. तितक्यात मुकेश आणि कार्तिक गावात आले होते मला असे जमिनीवर खाली बसून पाहून दोघे धावतच आले आणि माझ्याजवळ नित्याचा मृत देह पाहून दोघेही आश्चर्यचकित झाले.
जवळ आल्यावर मुक्याने मला विचारले
मुक्या= का झालं बे पंख्या याले कोण मारलं?
मी=आपल्या मांग साला पनवती लागली हाय तरी म्या याले समजवत होतो जुवा नग खेळू म्हणून.
मुक्या =आर जुवा तर ह्यो नेहमीच खेळतो पर त्याचा आणि याच्या या गतिचा काय मेल?
कार्तिक=वय बरोबर हाय मुक्या तुया पंकज भाऊ सांगा तरी काय झालंय कुणी मारलं याला {मग मी सुरुवातीपासून तर अंत पर्यंत सर्व हकीकत दोघांनापण सांगितली} ते एकताच मुक्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली तो म्हणाला
मुक्या =कोण हुते ते हारामखोर ज्याने आमच्या मित्राच्या अंगाला हात लावला.तू फकत नाव सांग पंख्या कोण हूते ते ? आई भवानी ची आण हाय यका यकाले फाडून त्यांचे तुकडे कावळ्या ले देईन त्याला म्या जिता नाय सोडणार आपल्या गावातलं हुतं काय?
मी=नाय आपल्या गावातलं नव्हतं कुनी आणि आसपासच्या गावच्या पण नाय वाटलं कोण हुते? कुठले हुते? काई माईत नाय पर ह्यो अनर्थ करून गेले.
मुक्या=तू घाबरू नग ते कुठलं पर असेल त्याले हुडकून काढील. अन् यका यकाले नाय या कोयत्याने फाडला तर नावाच् मुक्या नाय सोडणार ना य म्या त्या हरामखोरांना.
मी=काय फायदा ते तर गेलेत आपलं काम करुन आता यालें पोचवाची तयारी करू.
मग आम्ही मिळून त्याला उचलून त्याच्या घरी घेऊन गेलो.तिथे त्याच्या अंत्यविधीची सर्व कामे करून त्याची प्रेतयात्रा काढाची तयारी करू लागलो.त्याचे पार्थिव उचलताच घरात रडारड सुरु झाली. त्याची आई वडील बहीण धाय मोकलून रडू लागले. सर्व गावात शोकांतिका पसरली होती कारण गावात सलग ही तिसरी मयत झाली होती.
शेवटी स्मशानात आलो त्याचे प्रेत लाकडावर ठेवले.मग शेवटचे संस्कारांनी निपटल्यावर त्याच्या वडिलांनी त्याला मुखाग्नि.दिल्ली जेव्हा त्याचे प्रेत जळत होते तेव्हा माझी नजर त्याच्या चितेच्या वर गेली.ते पाहुन मी पुन्हा एकद चकित झालो.एक विशाल काय सावली मला तिथे दिसली आणि पुन्हा एकदा तेच हास्य माझ्या कानावर पडले. मला वाटले की कदाचित हा माझा भ्रम असेल.पण जवळच उभ्या असलेल्या कार्तिकने पण तो नजारा बघितला आणि मनाला," पंकज भाऊ तुम्ही काही ऐकलं का? काई दिसलं का व्हय तुमस्नी?
मी=व्हय म्हंजे जे म्या बगतोय तेच तुमि बि पावून रायलेत अन् आयकुन बी रायले.
कार्तिक= व्हय जे तुमाले समजलं ते मले बी उमगल आता इथून चाललं पायजे लय येळ झाला मले काय ठीक नाय वाटत हाय
मी= व्हय मले बी तेच मनाचं व्हत. बे मुक्या चाल बे घराकड (मी मुक्याला उद्देशुन म्हंटल)
तिघेही घराकडे वळलो रस्त्यात कोणीच काही बोलले नाही.गावात आल्यावर सर्व घरी जाणार होते तोच मुक्याने पाय दुसरीकडे वळवले. कसल्यातरी इराद्याने. त्याला फार राग आला होता.त्याचे रक्त सळसळ करत होते. आपल्या मित्राच्या खुणाचा बदला त्याला घ्यायचा होता आणि त्यासाठी त्या तीघांना शोधणे गरजेचे होते.त्याचा इरादा पाहून कार्तिक ने त्याला म्हटले," कुठ निघालास आता घरला जायचं त?
मुक्या= त्या हरमखोरायले हुडकायला. जोवर म्या त्यांचा मुडदा पाडत नाय तोवर मले अन्न गोड नाय.तुम्ही जा घरला .जर ते गावात आलं तर फकस्त एक मिस काल दे म्या जित पर असेल इजेच्या येगान तुमच्या जवड येल.
मी=आर पर इतक्या रात्री कश्या पायी जातोस. उद्या सकाळ ला जा. चल आमच्या बरोबर घरला आता नग जावू . येडा नग बनुस. तूले आपल्या दोस्तीची आण हाय( माझ्या शपथिंने तो थोडा शांत झाला)
मुक्या=बर ठीक हाय आता तु दोस्तीची आण दीला म्हणुन रातभर त्यायले मजा करु दे. पर उद्या यो खाती नाई त्यानले मातीत गाडला तर नावाचा मुक्या नाय.
मग तिघेही आपल्या घराकडे वळलो.मी कार्तिकला फ्रेश होऊन जेवण झाल्यावर माझ्या घरी यायला सांगितले.मुक्याला पण बोलावणार होतो पण त्याचा मूड पाहून त्याला न बोलावण्यातच उचित वाटले. तसे पण जे गुढ आणि रहस्य मला डिवचत होते. त्याची जाण फक्त कार्तिकला होती.तोच एक विचारवंत आणि ज्ञानी व्यक्ती होता आमच्यात.शिवाय कोणत्याही गोष्टीची कोडे किंवा गूढ सोडवण्यात त्याला महारत होती. त्यामुळे माझ्या प्रश्नांची उत्तर त्याच्याजवळच मिळेल असे मला वाटत होते.
तर मित्रांनो पुढे काय झाले हे जाणून घेण्याकरता तुम्ही माझा भाग पाच वाचायला विसरू नका तसेच आतापर्यंत घडलेले घटनाक्रम आणि पुस्तकाबद्दल तुमची उत्सुकता कोणत्या शिगेला पोहोचली हे मला नक्की कळवा जेणेकरून पुढील भाग प्रदर्शित करण्यास मला आणखी उत्तेजना मिळेल.


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED