काळ होता पन वेळ नाही आली होती भाग 7
चौकीदाराने जीपमधून सोडल्यानंतर मुकेश आणि कार्तिक ने त्यानंतरचा प्रवास पायी सुरू केला दुपारची वेळ झाली होती दोघांना पण खूप जोराची भूक लागली होती त्यांनी आपसात ठरवून भरून आणलेली शिदोरी खाण्याचे ठरवले मुकेश जाऊन बाटलीमध्ये जवळच असलेल्या तलावातून पाणी घेऊन आला आणि त्यांच्या गोष्टी सुरु झाल्या,
मुक्या:- आर तुले रस्ता त माईत हाय न सामोर?
कार्तिक:- व्हय व्हय त्याची काडजी नग करु मले समद माईत हाय पर फकस्त गडाच्या पायथ्या परत त्याच्या सामोर नाई.
मुक्या:- ते बगु सामोर काय कराच त आदी तित परत पोचू मग पावू .
कार्तिक:- व्हय चाल आटप लवकर .
(मग त्यांनी लगबगीने आपले जीवन पूर्ण केले ते उठून समोरच्या प्रवासाला लागणार तोच कोल्ह्यांच्या आवाजाने दोघेही जागीच थबकले.)
मुक्या:- कोली हायेत इत जवडपास इतन लवकर निगा लागते.
कार्तिक:- व्हय म्या तयार हवो (आपले बॅग काखेत घेत म्हणाला आणि दोघेही चपळाईने तिथून सामोर वाढू लागले चालत चालत ते पुष्कळ दूर पर्यंत आले तेव्हा सुटकेचा निश्वास टाकला)
मुक्या:- बरं झालं लवकर निगलो नाई त इनाकारण कोल्याची मुर्दी पाडा लागली असती. अजुन कितीक दुर हाय र पाय दुखायला लागली. सूर्य पर बुडतीला लागला हाय रात व्हा च्या आत आपल्याले तीत पोचा लागण वरून झोपा सटि जागा पावा लागण.
कार्तिक:- आर आलोच हावो जवड आन जागेच टेन सन नग घेवू तीत सिकारी खोपडी हाय तीत रात काडू.
मुक्या:- मग ठीक हाय बाबा चाल
(सूर्य मावळतीला गेला तोपर्यंत दोघेही सुखरूप त्यातल्या पर्यंत पोहोचले होते तिथले शांत वातावरण पाहून दोघेही मंत्रमुग्ध झाले होते तया जवळच एक शिकारी ग्रुप होते दोघेही त्याच्या आत शिरले कार्तिक नाही काही काळा जमा करून आग पेटवली कारण तिथे थंडी फार प्रमाणात होती तसेच कोणता वन्यप्राणी जवळ भटकू नये म्हणून ती तरतूद दोघांना पण माहिती होती.)
घोर साधनेत असलेल्या मिनीन अचानक खाडकन डोळे उघडले तेवढ्यात एक आकाशवाणी झाली," अडकलाय तो मदत पाहिजे त्याला,ते आले धावून मदतीला. घे साथ नंदी ईश्वराची आण माणिक नागलोकांशी चरणी महादेवा ठेवायची बंदी मुक्त होई सैतनासी तथास्तु."
आकाशवाणी बंद झाली.जरी हे कोड्यात असल तरी मिनीला कळून चुकले होते की पंकज गडावर असलेल्या भूत पिशाच यांच्या तावडीत सापडला आहे. त्यांनीच ते वादळ निर्माण करून त्याला तिथेच कैद केले आहे.असंख्य डोळ्यांनी न दिसणारे पिशाच पंकज ला त्या वातावरणात घे रून होते आणि त्याला यमसदनी पाठवण्याचे यत्न करत होते. पण मिनीच्या स्पर्शाने व तपोबलाने ते अजून त्यांचे काही वाईट नाही करू शकत होते.पण समोर ही वाढू देत नव्हते.शिवाय जास्त वेळ पर्यंत मिनी त्याचे रक्षण करण्यास असमर्थ होती. तिला आपले तपोबल वाढवण्यास त्या माणकाची गरज होती जो त्या तळ्याच्या आत नागलोकांमध्ये तिथल्या नागराजाच्या मुली जवळ होता जो प्रत्यक्ष महादेवाने तिच्या पित्याला वरदान स्वरूपात दिला होता.
झालेल्या आकाशवाणी आणि दिव्य दृष्टीने मिनीने सर्व परिस्थिती जाणून घेतली होती. शिवाय तिला हेही माहीत झाले होते की कार्तिक आणि मुकेश दोघ माझ्या मदतीला आले आहेत आणि त्याच्या मधून कोणी एकच हे काम करू शकत होतं हे सुद्धा तिला माहीत होते. तिने आपल्या हातात हवं कुंडातील भस्म घेतली आणि काही मंत्र पुटपुटून हवेत फुसकारा मारला.
अर्धवट झोपेत असलेल्या कार्तिकच्या कानात काहीतरी फुसफुस असा आवाज आला. तसा तो ताडकन उठून उभा झाला. पण जवळपास काहीच नजर न आल्याने तो थोडा विचारात पडला. जवळच मुक्या गाढ झोपेत होता. त्याला कसलीच हालचाल नाही जाणवली. दिवसभराच्या थकव्याने तो शांत झोपून होता.तोच पुन्हा एकदा तिच फुस्कारी कार्तिकच्या कानावर आली.आता मात्र कार्तिक सावध झाला कारण आता त्याला खात्री झाली होती की नक्की काही ना काही जवळपास आहे. तोच एक लख्ख प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला आणि एक पांढरी आकृती त्याला स्पष्ट दिसली.घाबरून त्याने मुकेशला गदगदा हलवले तोही खडबडून जागा झाला.
मुक्या:- काय र काय झालं वरडाल?
कार्तिक:- भ भ भ भुत ते बग सामोर (मुकेशने दाराकडे नजर टाकली ते पाहून तोही थोडा दचकलाच पण तो थोडा हिमती वाला होता.)
मुक्या:- घाबरू नग शांत राय मले पाहू दे का वय त.(तसा तो कोयता हातात घेऊन समोर झाला)
तेवढ्यात तिच आकृती त्या दोघांची सोबत बोलू लागली "घाबरू नका मी तुम्हाला काही इजा करणार नाही. तुमचा मित्र अडकलाय तुमची मदत पाहिजे म्हणून माझ्या स्वामीने तुम्हाला बोलावलं आहे चला माझ्यामागे."
मुक्या:- आर हे तर पंक्याच नाव घेत हाय ईल कसं माईत आपण इत हाव त ?आण तो कुट अडकला हाय? इले कोण धाडल हाय?
कार्तिक:- त तत थे त आता इच्या माग जाऊन माईत पडल. का माईत कुट नेते त? चकवा त नवे?
मुक्या:- येडा झाला का चकवा असा रायते वय. आन थो का तुले आवतन देणार हाय का? भिवु नग चाल म्या हाय जे व्हाईल ते पावू.
दोघेही त्या पांढऱ्या सावलीच्या मागोमाग चालू लागले ती सावली त्यांना तळ्याच्या किनार्यापासून होत होत गुफेच्या दारापर्यंत घेऊन आली आणि अदृश्य झाली. ते दोघं जागीच थबकले.
मुक्या:- आर हे कुट गेलं भुत? अन ह्यो त लई लहान गुफा हाय. आत जावून बगतो.
कार्तिक:- आर थांब आत नग जावू वाघ बिग असल त? पयले मले पावू दे.(गुहेच्या तोंडावर कार्तिक आकलन करू लागला. कुठे वाघाच्या पंजाचे निशान वगैरे दिसते का तसेच नाकपुड्या फुगवून त्याची गंध तरी येते का ते पाहू लागला.पण या उलट त्याला आतून अत्यंत मुग्ध करणारा सुवास आला जणू आत मध्ये सुगंधित फुलांचा बगीचा असावा) असं काई वाटत त नाई हाय कोणत जनावर असल मनून आत मंदी उलट लई मस्त सुगंद येत हाय आत मंदून.
तोच गुहेच्या आत मधून एक स्त्रीचा आवाज आला "घाबरू नका आत या तुम्हाला इथे काही धोका नाही." थोडा वेळ ते दोघेही एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिले.मग दोघांनी पण आत जाण्याचा निश्चय केला.जसजसे ते आत जात होते त्यांना आश्चर्याचे धक्के बसत होते. कारण बाहेरून असं वाटतच नव्हते कि ती गुफा आत मध्ये इतकी विशाल असेल म्हणून.चालत चालत शेवटी ते जीथे महादेवाची पिंड होती तिथे आले. मिनी जवळच हवन कुंडाजवळ बसली होती .ते पाहून त्यांना आश्चर्याचा आणखी एक धक्का बसला वरून आनंदही झाला की त्यांना या भयावह जागेत एक ओळखीचा चेहरा दिसला होता.तिला बघून दोघेही एका स्वरात म्हणाले,"मीने तु व्हय, इत का करत हाय तु?" मग दोघ पण एकमेकांच्या तोंडाकडे बघत"आदी तुच ईचार"
मिनी:- शांत वहा सर्व कळे या बसा येथे समोर म्हणून (मिनिने हवन कुंडा जवळ बसलेल्या चौकोनी गोठ्याकडे इशारा केला दोघेही काही न बोलता चुपचाप तिथे जाऊन बसले.)
मुक्या:- बरं आता सांग ते भुत कोण होत? तु इत कसी आली? अन ह्यो काय अवतार करुन ठिवला हाय? काई येड बीड लागलं हाय का तुले.
कार्तिक:- व्हय बराबर हाय तुन त आमाले लयं मोठा धक्काच दिलीस. इतक्या भ्यान जंगलात तु सदवी बनून रायतीस अन गावात भनक बी नाई कोनाले. अन इत काय चालत हाय काई समजत नाई पंकज भाऊ कुट अडकले काय? आता तुच सांग.
मिनी:- मी कुठुन आले का आले ते महत्वाचं नाही आहे. आता गरज आहे ते समोर काय स्थिती आहे तुम्हाला काय करायचे आहे. मी तुम्हाला इथे कशाला बोलावले आहे ते आधी जाणुन घ्या. तुम्हाला ज्या पुण्यात माने येथे आणले आहे ते माझी तपश्चर्येने प्रसन्न झालेली देवदूत होती.
मुक्या:- ते पण आयकुन घेवु आदी तु हे सांग तु इत कसी आली? अन ह्यो काय प्रकार हाय थे सांग.
मिनी:- ठीक आहे तुम्हाला जाणूनच घ्यायचा आहे तर सांगते
(मग मी नेत्यांना आईने हाकलून लावण्यापासून ते माझ्या तिथे येणे लग्न करणे आणि त्यानंतर वर जाण्यापर्यंत कथा सविस्तर वर्णन केली)
कार्तिक:- बापरे मंजे इतकं सगड होवुन गेलं. तरी तु इटच हाय मग तु काऊन नाई गेली सोबत.
मिनी:- मला जाणे जमले असते तर मी पण गेले असते पण मला इथे राहून आपल्या साधनेने त्याची मदत करायची आहे. आणि आता तो तिथे वर पिशांच्या मध्ये अडकला आहे. त्याला मुक्त करण्यासाठी मला त्या माणकाची गरज आहे.ज्यामुळे माझे तपोबल द्विगुणित होऊन मी त्याला सोडवण्यास मदत करू शकेल.
मुक्या:- कसला माणिक ? कोटी हाय तो?आता जाऊन घेऊन येतो तु फकस्त दिसा सांग.
मिनी:-हे काही इतकं सोपं नाही आहे तो माणिक या तळ्याच्या आत नागलोकांमध्ये असलेल्या नागराजाच्या नागकन्या जवळ आहे. तिथे जाण्यासाठी एक कुशल तैराक पाहिजे. जो पाण्यात आपला दम धरून ठेवू शकतो.शिवाय हे तळे जितके वरुन शांत आणि निश्चल आहे तितके आत मधून भयानक ही आहे. इथे असंख्य सर्प मगर तसेच जीवघेणे प्राणी आहेत.त्या सर्वांना पार करून जसा तसा माणूस समोर गेला तरी समोर एक विशाल काय भोवर आहे ज्याला पार करून समोर नाग लोकांचे प्रवेशद्वार आहे. जरी हे सर्व तारूण कोणी तिथे पोहोचला तरी त्या दारातून आत प्रवेश करण्यासाठी तल्लख बुद्धीचा व्यक्ती पाहिजे. कारण तिथे काही कोडे आहेत आत प्रवेश करण्यासाठी ती सोडवता आली पाहिजेत आणि त्यानंतरही नागराज माणिक देईल हे खरे नाही.आपली गोष्ट पटवून सांगणारा तसेच आपल्या वाणीने मोहुन घेणारा व्यक्तीच हे साध्य करू शकते.
एकूण यात बुद्धिचातुर्य, वाकचातुर्य ,तरबेज पोहणारा तसेच वेळेचे महत्व ज्याला तंतोतंत कळू शकते असा व्यक्ती पाहिजे.आता तुमच्यापैकी कोण जाणार आता हे तुम्ही ठरवा.
मुक्या:- ते काई बी असु दे म्या जाईल अन थो माणिक घेऊन येईन. तु इतचं थांब र कार्तिक.
कार्तिक:- येडा झालास का तु जाशील. दहा मिनिट बी स्वास धरु नाई सकत अन चालला तीत माणिक आणाले. जर पोचला तरी भोवऱ्यात फसून मर्शिल चांगले चांगले महारथी बी भोवऱ्याच्या नादी नाई लागत. वरुन इत दिमागाच काम हाय जो तुया जवड लई कमी हाय मनून गुमान बस हे काम मयावर सोपव म्या आणतो थो माणिक.
मुक्या:- आर पर तीत तुले काई झालं त कोण जिम्मेदार राइल. तु त पाखरु बी नाई मारत अन तीत लई भयानक जीव हायेत त्यायचा सामना कसा करसिल माया भावा. म्या बी येतो तुया संग.
कार्तिक:- आर माया दोस्ता हेच त तुले माईत म्या धर्तीवरचा वाघ नाई पाण्यातला वाघ हाय. पाण्यातले डावपेच तुले नाई कडनार माई धरतीवर काई हिम्मत व्हय न व्हय पर पाण्यात काई बी येऊ दे आपल्या सामोर त्याची काई धग नाई लागत. म्या सवताले बाराबर नेतो शिवाय भोवऱ्यातुन बाहेर निग्न फक्त मलेच माई त हाय. मनून तु काई काडजी नग करू म्या सांबडून घेईन. फक्त आजची रात्र हाये उद्या सकाड परत म्या थो मणिक घेऊनच येईल.
मुक्या:- बरं हाय भावा पण आपली काडजी घेजो. काय दोस्त मनावं मले आपला दोस्त मावतीच्या तोंडात जात हाय अन म्या काईच नाई करू सकत थु हाय ह्या जींदगाणीवर.
कार्तिक:- आर येड्या इतकं काय मनाला लावुन घेतो. आपला साथ कायम हाय तुया बी टाईम येईल आपल्याले सोबत पंकज भाऊ ले आणले जाच हाय तु घाबरू नकस म्या आपल्या जीवाची बाजी लावुन बी थो माणिक आणल.(कर्तिकच्या या शब्दाने मु क्याला गहिवरून आले आणि त्याने त्याला मिठी मारली दोघाही मित्रांच्या डोळ्यात पाणी आले कार्तिकची पाठ थोपटत मुक्या मनाला)
मुक्या:- जार माझ्या वाघा आज तुझी खरी कसोटी हाय. हा घे माझी हिम्मत मनून माझा कोयता ठिव. मी नाई येवू सकलो त का झालं माझा कोयताच काफी हाय. रस्त्यात जर कोणी आडवा गेला त फाडुन टाकजो साल्याले. हर हर महादेव.
कार्तिक:- हर हर महादेव
मिनी:-शिवशंभु तुमच्या पाठीशी आहे काळजी नका करू विजय तुमचाच होईल पण गाफील न राहता. मी काही वस्तू देत आहे ते तुमचे रक्षण करणार .(मिनीने आपल्या जवळच ठेवलेल्या थाळी मधून एक रुद्राक्षअभिमंत्रित करून कार्तिकला दिली हि माळ कोणत्याही परिस्थितीत तुमच्या गळ्यातून बाहेर येता कामा नये. जोपर्यंत ही माळ तुमच्या गळ्यात आहे तोपर्यंत सर्प तुम्हाला हानी पोहोचवू शकणार नाही. तसेच इतर कोणत्याही संकटापासून हे तुमचे रक्षण करणार.त्यानंतर तिने एक शंख दिला जेव्हा कधी तुम्हाला श्वास घ्यायची गरज पडली या शंखाला मुखात घ्यायचे त्याने तुम्हाला दीर्घकाळपर्यंत श्वास घेण्याची गरज नाही पडणार. असे म्हणून तिने कार्तिकच्या कपाळाला भस्म लावुन हर हर महादेव म्हणत तिथून उठून उभी झाली आता वेळ आली होती निरोप घ्यायची मुकेश पण उठून उभा झाला आणि तिघेही तळ्याच्या काठावर आले.
तळ्याजवळ येऊन तिघेही थांबले पुन्हा एकदा मुकेशने गहिवरून कार्तिकला आलिंगन दिले त्याची पाठ थोपटली मुक्याचा निरोप घेऊन मी नीला नमस्कार करून कार्तिकने तळ्यात उडी घेण्यासाठी एक उंच जागा निवडली आपल्या कमरेला मुक्याचा कोयता खोसला मिनी ने दिलेली माळ गळ्यात घातली व ती पाण्यात निघणार नाही अशी तरतूद केलीआणि शंकर शंखाला कंपनीच्या दुसर्या बाजूने एका दोरीने टांगले हर हर महादेव म्हणत कार्तिक नेत्याच्या मधुमती उडी घेतली आणि इकडे मिनी आणि मुकेश परत गुपित आले मिनीने मुकेशची झोपण्याची व्यवस्था त्याच गर्भगृह केली जिथे याआधी तिने माझी केली होती सोबत आहे त्याला खाण्यासही दिली व ती आपल्या पक्षाकडे निघून गेली मुकेशने त्यातले एक फळ खाऊन त्या बिछान्यावर जाऊन बसला आता त्याला झोप लागणे कठीण झाले होते त्याला सतत कार्तिक ची चिंता लागली होतीचिंता लागली होती
नारायण नारायण नारद ऋषी वेळ राजाच्या दरबारात प्रकट झाले वेळ राजाने त्यांचे स्वागत केले त्यांना मान देऊन त्यांना बसण्यास बाजूचे सिंहासन दिले आणि म्हणाले
वेळ राज मुनिवर्य आज आपण इकडे कसे काय आगमन केली
नारद ऋषी :- नारायण नारायण तुमच्या परम भक्ताचे प्राण संकटात येणार आहे वेळेआधी काळ राज त्याचे प्राण हरण करण्यासाठी कुच करत आहे म्हणून मी आपल्याला सावधान करण्यास आलो आहे.
वेळ राज:- काय? वेळेआधी मृत्यू आणि तेही माझ्या भक्ताचे मी हे होऊ देणार नाही.
नाराद ऋषी :- नारायण नारायण तुमचा परम भक्त पृथ्वीतलावर नाग लोकातून माणिक आणण्यासाठी महादेव सरोवरात प्रविष्ट झाला आहे आणि काळ त्याला थांबवण्यासाठी त्याच्या मागे लागला आहे तेव्हा त्वरा करा आपल्या भक्तांसाठी धावून जा (नारायण नारायण म्हणून नाराद मुनी अंतर्धान झाले.)
वेळ राज उठून उभे झाले आणि क्षणातच ते त्या तळ्याजवळ पोहोचले मग त्यांनी एका कासवाचे रूप घेऊन त्यात प्रवेश केला आणि निघाले कार्तिक च्या दिशेने.इकडे काळ राजाने एका भयंकर मोठ्या स्वरूपाचे सर्पा मध्ये आपले रूप घेतले आणि तळ्यात प्रवेश केला. कारण त्यांची शिकार आता कार्तिक वर होती.काही करून त्यांना त्याला नाग लोकांपर्यंत पोहोचू द्यायचे नव्हते. पोहत पोहत कार्तिक बऱ्याच खोलात आला. तळ्यात त्याला स्पष्ट पाहता येत होते. परंतु अजूनही त्याला त्या भोवऱ्या पर्यंत पोहोचण्याचा मार्ग काही दिसत नव्हता.मात्र तळ्याच्या असंख्य नवनवीन प्राणी तसेच दिव्य तेज मान वनस्पती त्याला दिसून येत होत्या.त्या प्रकाशाने त्याला सर्व स्पष्ट दिसत होते. तसे पण त्याच्यासाठी हे काही नवीन नव्हते न पहाता पण तो पाण्यात दिशा शोधून घ्यायचा.त्यामध्ये त्याला महारत होती. तो पाण्यातल्या माशा प्रमाणे त्या तलावात स्वच्छंद विहार करत होता.कसली भीती नाही का त्रास नाही.
तितक्यात एका मगरीने मागून त्यांचा पाय पकडला अचानक झालेल्या हल्ल्याने कार्तिकचा त्याच्या श्वासावरून तोल सुटला.अर्थात त्याने पाण्यात उडी घेण्याआधीच योग क्रिया श्वास रोखून धरला होता. ज्याने तो खूप वेळपर्यंत ही पाण्यात राहू शकत होता.पण आता त्याचे योग नियंत्रण सुटले होते.पाण्याच्या वर जाणेही शक्य नव्हते कारण तो आता खूप खोलात होता. शिवाय मगरीने त्याचा पाय दातात पकडुन ठेवला होता. ज्यामुळे त्याला हालचाल करणे शक्य नव्हते.वेळ विकट होती त्वरा करून आधी कार्तिकने कमरेला खोचलेला शंख काढून श्वासावर नियंत्रण आणले आणि पुन्हा एकदा त्याने पाण्यातच तो योग पुन्हा लावला.
शंख पुन्हा पूर्ववत ठेवून मुक्याने दिलेला कोयता काढला आणि सपासप पाण्यात त्या मगरीच्या डोक्यावर वार केले. कोयता चांगला धारदार होता वार एकदम अचूक होते. त्या मगरीने त्याचा पाय सोडून तिथून पळ काढला. मगरीने पायाला चांगलीच जखम केली होती.ते संकट टाळत नाही तर दुसरे संकट समोर येऊन उभे ठाकले होते.समोर एक विशाल काय सर्प काळ राज्याच्या स्वरूपात समोर उभा होता.
कार्तिकने गळ्याला हात लावला पण मगरीच्या चकमकीत रुद्राक्ष माळ पाण्यात खाली कुठेतरी पडली होती. मृत्युदाता साक्षात त्याच्या पुढ्यात उभा होता. काही झाले तरी आता दुसरा मार्ग नव्हता. कार्तिक माळ शोधू लागला तसा त्या सर्पाने कार्तिक वर धाव घेतली होती. एका क्षणातच त्या सर्पानी आपल्या कुंडलीमध्ये कार्तिकला गुंडाळून घेतले.त्याला काहीच हालचाल करता येत नव्हते.श्वासावर नियंत्रण सुटायला लागले होते. तो सर्प त्यांना त्याच परिस्थितीमध्ये घरंगळत नेऊ लागला.काही केल्या कार्तिकला त्याच्या तावडीतून सुटता येत नव्हते. तोच अचानक ते दोघे त्या विशाल काय भोवर जवळ पोहोचले.तो त्यांना एका चुंबकाप्रमाणे स्वतःकडे खेचून घेत होता. कार्तिकने तळ्यात असलेल्या एका झाडाच्या फांदीला गच्च पकडून ठेवले होते. तितक्यात कासवाच्या रूपात वेळ राज तिथे पोहोचले.त्यांनी ती रुद्राक्ष माळ तोंडात पकडून आणली होती.ती त्यांनी कार्तिकच्या हातात दिली. रुद्राक्ष स्पर्श होता सर्पाच्या स्वरूपात असलेल्या काळराजाला झटका लागून ते भोवर्याच्या ओघा मध्ये फसले. कार्तिक बेशुद्ध झाला होता पण कश्यप महाराजांनी त्याला सुखरूप भोवराच्या पलीकडे नेऊन सोडले.
जेव्हा कार्तिकला चेतना आली तेव्हा त्यांनी स्वतःला वाळूवर पडलेले बघितले होते.तिथे समोर पाण्याची भिंत होती त्यातून ते नुकतेच बाहेर आले होते. त्यांना आश्चर्य वाटले की मी तर मृत्यूच्या दारात पोहोचलो होतो मग येथे कसा पोहोचलो? "आयुष्यमान भव आवाज आला"वेळ राज तिथे प्रकट झाले."हे बालका तु माझी नेहमी जपणुक केली आहे त्यामुळे तुझ्यावर प्रसन्न होऊन मी तुझे प्राण वाचवले आहेत. तुझे कल्याण होवो."असे म्हणून अंतर्ज्ञान झाले.
कार्तिक विस्मित होऊन ते दृश्य बघत राहिला मग त्यांने समोर प्रवासाला सुरुवात केली. पण त्याला नाग लोकाचे द्वार कुठेच दिसत नव्हते. जिकडे तिकडे फक्त वाळू दिसत होती. काहीच सुचत नव्हते. तो नुसता चालत होता त्याने एका ठिकाणी थांबून पुन्हा इकडे तिकडे पाहीले. एक विशाल काय दगड त्याला दिसला. तो त्या दगडा जवळ गेला.तिथे निरखून पाहू लागला. कुठे काही दिसते काय?कोणता रस्ता वगैरे दिसते काय? तिथे त्याला संस्कृतमध्ये काहीतरी लिहिलेले आढळले ते असे होते "लोचणे मुंदती अर्ध्या तिमिर मा अस्ते दृश्यांती तथा ओम नमः शिवाय नामस्मरण ती नागलोकाय द्वार प्रवेशंती."
आता हे कार्तिक साठी एक नवीन कोडे होते कारण त्यांना संस्कृत बद्दल काही ज्ञान नव्हते. याचा काय अर्थ असू शकते हे तो विचार करू लागला. " च्य मारी का भानगड हाय हे तर सनकिरतात लिवला हाय.आता हे कसं उलगडा च काय न काय त दोस्क लावले पायजे. "बराच विचार केल्यावर त्या जागेवरून कार्तिकने आपले डोळे अर्धवट लुटल्या सारखे केले त्याला समोर काहीतरी आढळले. त्यांन पुन्हा डोळे अर्धवट केले तर समोर त्याला गोल अंधकार दिसला तो तसेच अर्धवट डोळे करून तिथपर्यंत गेला पुन्हा त्यांन डोळे पुर्ण उघडले असता त्याला काहीच नाही दिसले. हताश होवुन वर परमेश्वराला हात जोडले आणि ओम नमः शिवाय असे बोलून त्याने डोळे उघडले.आश्चर्य समोर नागलोकाचे भव्य प्रवेशद्वार त्याला दिसून आले.
कार्तिकच्या आनंदाचा पारावर नाही राहिला. तो त्या दरवाज्याजवळ गेला. आता आत कसे जायचे? हा प्रश्न समोर उभा होता. तितक्यात त्या दारावरचा रक्षक तिथे प्रकट झाला आणि म्हणाला कोण आहे तू? इथे कशाला आलास? हे नागलोक आहे.येथे मानव नाही जाऊ शकत.माघारी जा नाहीतर मृत्यूला सामोरे जा.
कार्तिक:- माफी करा महाराज म्या आपल्या दोस्ता चे जीव वाचवा सा टी इत आलो हाय. त्यासाटी मले नागराज जवड जो माणिक हाय त्याची गरज हाय. म्या मेलो तरी चालल पर मले आत जावाची परवानगी द्या तुमची लय कीरपा होईल.
द्वारपाल:- मूर्ख माणसा नाग लोकातून माणिक ने तुला काय खेळ वाटला काय?माणिक तर दूर तू या दारातून आत सुद्धा जाऊ शकत नाही.
कार्तिक:- मले माईत हाय महाराज तुमच्या परवानगी सिवाय म्या यक पाय बी सामोर नाई वाडवू सकत. तुमि मनाल ते करीन पण माई मदत करा.(कार्तिकचा नम्र व्यवहाराने द्वारपाल त्याच्यावर प्रसन्न झाला)
द्वारपाल:-ठीक आहे जर माझ्या 3 प्रश्नांची उत्तरं तू अचूक दिलीस तर मी तुला आत जाण्याची परवानगी देईल पण चुकलास तर प्राण गमवावे लागेल बोल तयार आहे.
कार्तिक:- व्हय महाराज यका पायावर तयार हाय. तुमि फकस्त ईचारा म्या उत्तर द्याले तयार हाय.
द्वारपाल:- ठीक आहे सांग मग ती कोणती ती कोणती शक्ती आहे जी दिल्याने वाढते आणि ठेवल्याने क्षीण होते?
कार्तिक:- ग्यान सक्ती
द्वारपाल:- हम्म अचूक आहे दुसरा प्रश्न धर्म काय आहे?
कार्तिक:- धरम मंजे हे यक संकल हाय जे आत्म्याल परमात्म्यासी जोडते.
द्वारपाल :- हमम हुशार आहेस शेवटचा प्रश्न खरे प्रेम म्हणजे काय?
कार्तिक:- आर वां ह्यो तर माया आवडीचा परस्न ईचारला. माया मते खरं पिरेम मंजे सवताची पर्वा न करता दुसऱ्या सा टी जगणे. जसं यक माय आपल्या लेक्रावर करते, शेतकरी आपल्या जमिनी वर करते अन परमात्मा आत्म्या वर करते.
द्वारपाल:- वा अति उत्तम तुषार तर आहेसच पण दिला चा पण राजा आहेस जा मी तुला आज जाण्याची परवानगी देतो.
(असे म्हणतात प्रवेशद्वार उघडे झाले आणि कार्तिकने आत प्रवेश केला.)
तर मित्रांनो यापुढे काय झाले हे वाचण्यासाठी तुम्हाला पुढील भाग वाचण्यास विसरू नका का ( भाग आठ) तसेच तुमच्या प्रतिक्रिया व तुमचे सुजाव मला कळवा त्याने मला लिहिण्यास अजून उस्फुर्त प्रेरणा मिळेल.