लक्ष्मी - 2

  • 22k
  • 15.6k

भाग दुसराबाबांचे अकाली जाणे मोहनला खूप जड गेले. त्याच्या डोक्यावर आभाळ कोसळल्यासारखे झाले. त्याची आई तर वेडी झाल्यासारखे वागू लागली. या दोघांना सांभाळण्यासाठी मोहनचा मामा हा एकटाच आधार म्हणून उभा होता. दोन दिवसांनी मोहनचा इंग्रजीचा पेपर होता. वडिलांच्या मृत्यूनंतरची सर्व क्रिया सोपस्कार पूर्ण केल्यानंतर तो परीक्षेचा विचार करू लागला. अपघातात त्याच्या सायकलचा चक्काचूर झाला होता. त्याला दुरुस्त करणे शक्य नव्हते. आईला एकटीला गावात सोडून परत शहरातल्या खोलीवर जाऊन राहणे मोहनला अशक्य होते. परीक्षेचे पुढील पेपर कसे द्यावे ? द्यावे की देऊ नये ? या विचारात तो तसाच झोपी गेला. त्याला जेवण देखील गोड लागत नव्हते. सकाळ झाली. त्याचा मामा तेवढ्यात