थोडं तुझं थोडं माझं

  • 6.7k
  • 1
  • 2k

क्लिक... क्लिक... क्लिक..."वाह! ब्युटीफुल."एका निळसर झाक असलेल्या धोतर्याच्या फुलावर बसलेले, लाल ठिपकेदार फुलपाखरू पिनीने अलगद टिपले होते. आपला डी एस एल आर कॅमेरा गळ्यात अडकवत तिने एक समाधानाचा सुस्कारा सोडला तेव्हा कुठे तिच्या लक्षात आलं, कि आपला फोन केव्हापासून वाजतो आहे. स्क्रीनकडे पाहून एक हलकीशी स्माईल देत तिने फोन उचलला."गुडssss मॉर्निंग. एक परफेक्ट शॉट आणि एका परफेक्ट माणसाचा फोन. क्या बात है? सकाळी-सकाळी कॉल." "काय करणार. त्या परफेक्ट शॉटच्या नादात मला विसरत चालली ना तू? " कॉफी मग टेबलवर ठेवत विराजने लॅपटॉप बंद केला. "एक्सट्रीमली सॉरी... खरच मी रात्री खूप वेळ ट्राय करत होते, बट इकडे नेटवर्क प्रॉब्लेम आहे आणि