हजामत

  • 8.5k
  • 2.2k

हजामत. आता माहीत नाही;पण पूर्वी गावाकडे परंपरागत बलुतेदार पद्धत आस्तित्वात होती.या पद्धतीमध्ये गावातली कामे “पेंढी” वर करून घेतली जायची. (कदाचित महाराष्ट्रात वा देशात वेगवेगळ्या भागात या पद्धतीला वेग वेगळी नावे असू शकतील ,या पद्धतीत गावातले मोठे शेतकरी गावातल्या बलुतेदारांना वर्षाला काही ठराविक पायल्या धान्य वा काही रक्कम द्यायचे, व त्याबदल्यात त्या शेतकऱ्याची वर्षभराची सगळी कामे त्या संबंधीत बलुतेदार मोफत करून द्यायचा!) या पद्धतीप्रमाणे समजा त्या घरातली कुणाची चप्पल दुरुस्त करायची झाली तर संबंधीताकडून ती दुरुस्त केली जायची, शेतातल्या अवजारांची दुरुस्ती सुतार, लोहार गरजेप्रमाणे करून द्यायचे,ठरलेला नाभिक त्या घरातील पुरुषांची हजामत करून द्यायचा, कोंबडी बकरी कापायचे काम गावातला मुलानी