महती शक्तीपिठांची भाग ६

  • 5.8k
  • 1
  • 2k

महती शक्तीपिठांची भाग ६ २६ ) कुरुक्षेत्र – सावित्री शक्तीपीठ हे शक्तीपीठ श्री देवीकुपा भद्रकाली मंदिर "सावित्री पीठ", "देवीपीठ", "कालिका पीठ" किंवा "आदी पीठ" म्हणून देखील ओळखले जाते. याच भद्रकाली मंदिरात श्रीकृष्ण व बलरामाचे मुंडण झाले होते . असे मानले जाते की कुरुक्षेत्रातील शक्तीपीठ श्री देवीकुपा भद्रकाली मंदिरात आई सतीची टाच पडली . पौराणिक कथेनुसार महाभारताच्या युद्धाला जाण्यापूर्वी भगवान श्रीकृष्णासह पांडवांनी त्यांच्या पूजेसाठी येथे प्रार्थना केली आणि त्यांच्या रथांचे घोडे दान केले. त्यामुळे भक्तांच्या इच्छा पूर्ण झाल्यावर सोने ,चांदी, माती इत्यादी बनवलेले घोडे देण्याची एक पुरातन परंपरा बनली. इथे आईचे रूप “सावित्री “असुन सोबत शिवशंकर “स्थाणु” रुपात विराजमान आहेत. २७)मणीवेदिका