प्रेमाची कबूली .........

  • 8.6k
  • 2.3k

रिक्षा ला हात करून हात करून फुलांचा गुच्छ सांभाळत प्रथमेश रिक्षा मधे बसला . रिक्षा पुढे त्याच्या एचीत स्थळा च्या दिशेने जाऊ लागली . रिक्षा जशी जशी पुढे जात होती प्रथमेश मात्र त्याच्या जुन्या आठवणी भूतकाळ आठवू लागला प्रथमेश ला कॉलेज चे दिवस आठवले जेव्हा प्रथमेश डिग्री च शिक्षण घेत होता . त्या कॉलेज च्या दिवसात दिवस भर काम करून रात्री अभ्यासाला लायब्ररी मधे जायच हा प्रथमेश चा नित्य कर्म होता . प्रथमेश नेहमी पुस्तकात गुंतलेला असायचा पण हल्ली प्रथमेश तीच विचार करू लागला होता