महती शक्तीपिठांची भाग ७

  • 6.7k
  • 1
  • 2.5k

महती शक्तीपिठांची भाग ७ ३२) विभाष- कपालिनी शक्तीपीठ पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात आईचा डावा घोटा पडला. हे विभाष शक्तीपीठ कोलकातापासून जवळ आहे,आणि बंगालच्या उपसागराजवळ रन्नारायण नदीच्या काठावर आहे. हे शक्तीपीठ हे विशाल मंदिर आहे. हे दक्षिण पूर्व रेल्वेच्या कुडा स्टेशनपासून २४ कि.मी. अंतरावर आहे. इथे आईचे रूप 'कपालिनी'असुन शिवशंकर 'भीमरूपा' आणि 'सर्वानंद' रुपात विराजमान आहेत . ३३) कलामाधव – देवी काली शक्तीपीठ हे शक्तीपीठ मध्य प्रदेश राज्य, या अमरकंटक येथे स्थित आहे असे मानले जाते. हे शोन नदी तटावरील एका गुहेत आहे मध्य प्रदेशातील अमरकंटकमधील कलामाधवमधील शोन नदीजवळ सती आईचा डावा नितंब पडला.. इथे आईचे रूप 'काली' असुन