रंग माझे किती - रंग माझे किती..

  • 7.4k
  • 2.1k

दारावरची बेल वाजली तसे आईने जाऊन दार उघडले. दारात फुल स्लीव्हच्या ड्रेसमध्ये खांद्यावरची ओढणी सावरत शर्मिला उभी होती, गालांत मंद हसत.. सुंदर तितकीच नाजूक वाटावी अशी तिची छबी. "उशीर केलास आज यायला..!" आई घड्याळाकडे पाहत म्हणाली. "सॉरी आई.. पहिल्या बसमध्ये खूप गर्दी होती, म्हणून मग मागच्या बसने आली.. " काहीश्या घाबरट भावात आणि संस्कारी आवाजात मान किंचितशी हलवत शर्मिलाने उत्तर दिले. "अगं.. नुसतंच विचारलं मी.. गुणाची माझी बाय.." आईला तिचा हेवा वाटला. शर्मिलाच्या पाठी एक भाऊ असूनसुद्धा आई वडिलांची तिच लाडकी होती. आईवडिल दोघेही कडक शिस्तीचे होते. मुलीच्या जातीला असणाऱ्या साऱ्या मर्यादा शर्मीलावर लहानपणापासून लागू होत्या. शर्मिलाचा लहान भाऊ सतत या ना त्या