कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- २२ वा

  • 7.2k
  • 2.5k

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .. भाग – २२ वा ------------------------------------------------------------------------- अनुषा आणि अभिजित निघून गेल्यावर ..अजयजीजू आणि रंजनादीदी त्यांच्या उद्याच्या कार्यक्रमात काय बोलायचे कसे बोलायचे ? याबद्दल हे ठरवू लागले . अनुशाने सुचना केली होती की – तुम्ही दोघांनी ..सागर देशमुख यांच्याबद्दल बोलतांना त्यांचे नाव न घेता त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करायच्या आहेत .. हे ठीक आहे , रंजना दीदी बोलू लागली की – क्षणभर असे मानूया की..समोरच्या श्रोत्यांना त्याबद्दल काहीच कल्पना नसल्यामुळे .. त्यांना काही ही फरक पडणार नाही..कारण ज्या भावना व्यक्त करायच्या आहेत ..त्या आपल्या वडीलधार्या व्यक्तीबद्दल आहेत , आपल्याच माणसाबद्दलच्या आहेत ..आणि त्या अर्थातच ऐकणार्याला छानच