लक्ष्मी - 7

(13)
  • 12.2k
  • 7.2k

लक्ष्मीची दहावी मालक वारल्याची बातमी तशी राधाला ही कळाली होती. तिने लक्ष्मी व राजुला घेऊन लगेच आपल्या घरी आली. तिलाही खूप मोठा धक्का बसला होता. त्याच शहरात एक किरायाची खोली घेऊन ते पाचजण राहू लागले. घरात जागा कमी आणि माणसं जास्त झाली होती. मोहनला आता यापुढे कोणते काम करावे हेच सुचत नव्हते. दुकानात काम करतांना त्याचा दिवस कसा जात होता ? हेच कळत नव्हतं तर आज दिवस कसा घालवावा ? हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला होता. लक्ष्मी यावर्षी सहाव्या वर्गात जाणार होती, तिची पूर्वीची शाळा पाचव्या वर्गापर्यंतच होती. तिचे नाव कोणत्या शाळेत टाकावं ? खाजगी शाळेत टाकावं तर भरपूर फीस