शेतीपेक्षा शिक्षण महत्वाचेलक्ष्मीला कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी मोहन शहरात आला. पहिल्यांदा त्याने भोसले सरांची भेट घेतली व त्याच्याशी चर्चा करून शहरातल्या चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याचं निश्चित झालं. कॉलेजचा प्रश्न सुटला पण लक्ष्मीचा राहण्याचा आणि जेवण्याचा प्रश्न अजून सुटला नव्हता. भोसले सरांनी शहरात मुलींसाठी एक चांगले वसतिगृह असल्याचे सांगितले. काही वेळानंतर तिघेजण कॉलेजात गेले आणि लक्ष्मीची अकरावी सायन्समधील प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली. तेथून त्यांनी मुलींच्या वसतिगृहाकडे गेले. तेथे सर्व विचारपूस केल्यावर मोहनला ते वसतिगृह लक्ष्मीसाठी योग्य वाटले. लक्ष्मी तेथे अगदी सुखरूप आणि सुरक्षित राहणार याची खात्री पटल्यावर तिचे नाव तेथील वसतिगृहात टाकण्यात आले. एकट्या मुलीला शहरात ठेवणे कोणत्याही पालकांसाठी एक काळजीचा विषय