कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- २३ वा

  • 6.2k
  • 2.3k

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन भाग-२३ वा ----------------------------------------------------------------------- रंजनादीदी आणि अजय यांच्यात पहिल्यांदा इतका सविस्तर संवाद झाला होता. अजय रंजनाला म्हणाले – अनुशाने आपल्याला तिच्या कार्यात सामील करून घेतले आहे, ही तिची मोठी मेहेरबानी झाली असे मला आटत वाटते आहे , त्यामुळेच आपल्यात पहिल्यांदा या घरगुती विषयवार आणि या माणसांबद्दल बोलणे झाले . इतके दिवस मी विषय काढलेला नव्हता आणि तू कधी आपणहून बोलली नाहीस. असो. अनुशामुळे अभिजित आणि या दोघांच्यामुळे आपण .असे मिळून आपल्या घरातील हरवलेले श्रेयस “परत आणू या , आणि हे सगळे करीत असतांना या आधी काय घडून गेले , ते तसे का घडले , ?