महती शक्तीपिठांची भाग ११ १० ) पिठापुरम आंध्र प्रदेश शक्तीपीठ इथे आई देवी “पुरुहुतीका “नावाने विराजित आहे . सती आईचा डावा हात या ठिकाणी पडला . याला पुष्करणी शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते . या शक्तीपिठात आई “पुरुहुतिका” रुपात असुन शिवशंकर” कुकुटेश्वर स्वामी “नावाने विराजमान आहेत . श्री पुरुहुतिका देवीचे देऊळ कुकुटेश्वर स्वामी देवळाच्या परिसरात पूर्व गोदावरी जिल्ह्यात आंध्र प्रदेश येथील पीठापुरम येथे आहे काकिनाडा पासून साधारण हे अंतर २० किलोमीटर आहे आणि राजमुंद्री पासून ६२ किलोमीटर आहे . देवीचे मंदिर लहान असले तरी भिंतीवर अष्टदास शक्तीपिठांचे कोरीव काम केले असल्याने मोहक वाटते . याच जागेवर देवीचे मुर्ती पुरलेली होती