लक्ष्मी - 10 - अंतिम भाग

(46)
  • 9.3k
  • 5.1k

त्यागमूर्ती लक्ष्मी माईने लक्ष्मीच्या लग्नाचा विषय मोहनजवळ देखील काढला. मोहनने ते सर्व लक्ष्मीच्या मनावर ठेवलं होतं. कारण मोहनला माहीत होतं की, लक्ष्मी अशी ऐकायची नाही, तिला नोकरी करत करत अजून शिकायचं होतं. म्हणून तिने पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश देखील घेतला होता. आपली शाळा करत ती पुढील शिक्षणाचा अभ्यास ही करत होती. राजू मेडिकलच्या शिक्षणासाठी दूर गावी होता. दर महिन्याला ती राजूला पैसे पाठवत होती. मोहन आणि राधा आपल्या शेतीकामात व्यस्त होते. माय एकटी घरात रामनामाचा जप करत बसून राही त्याशिवाय तिच्याकडे अन्य कोणता पर्यायच नव्हता. ती घर सांभाळण्यासाठीच शिल्लक राहिली आहे जणू असे तिला कधी कधी वाटायचे. पण करणार तरी काय