घालमेल त्या क्षणांची... नवीन आयुष्याला सुरुवात करायची वेळ आली. हो माझं लग्न आहे आणि माझ्यातच मी हरवून गेले आहे. उद्या पासून नवीन माणसं नवीन चाली रिती. स्वानंद ची आई खुप प्रेमळ आहे. मला मुली सारखंच करतात. त्यांच्याकडे जाण्याची ओढ देखील लागली आहे आणि आई बाबांना सोडून जाण्याची इच्छा ही होत नाहीये. डोळ्यांतून सारख पाणी येतंय पण सगळयांना खूष पाहून समाधान पण वाटतंय. काय होतंय हे मला कोणी माझ्याकडे तरी पाहा. घरात नुसती धमाल धावपळ चालू आहे. आई माझी सारखी विचारतेय, "हे घेतलं का ते घेतलं का..?" आजी माझी नजर काढतेय. बाकी सगळे घरचे इथे तिथे कामात गुंतले आहेत. पण बाबा.