ब ळी

  • 6.7k
  • 1.9k

" ब ळी " मच्छिंद्र माळी औरंगाबाद आज चौदा-पंधरा वर्सं होत असतील.जव्हा माय मला आजोळी बेलापूरला घेऊन आली, तव्हा मी आसन सात आठ सालचा. बेलापुरातच मी मायच्या कष्टावरच वाढलो, खेळलो अन कर्संबर्सं चार बुकं शिकलो. मागासवर्गीय म्हणुन बांधकाम खात्यात ढंपरचा डायव्हर झालो. सरकारी कामानिमित्तगावोगांव फिरतीवर असायचो. कुठं रोडच्या कामाला तर कुठं धरणाच्या कामाला जावा लागायचं. वडगावच्या धरणाच्या कामावरबी म्या ढंपार घेऊन गेलो होतो. वडगाव तसं माझं मुळ जल्म गांव!हे कोणालाबी ठावं नव्हतं. दिवसभर धरणावर ढंपर, टॅक्टरची घरघर, खडखड होत होती. हजारो माणसं उन्हातान्हात मुंग्यासारखी राबत होती. माती उपसत