संत एकनाथ महाराज - 2

  • 17.4k
  • 1
  • 7.3k

?संत एकनाथ महाराज,?उत्तरार्ध.....✍️✍️?Archu ?एकनाथ महाराज विद्वान, ज्ञानी, पंडित होवून पैठणला परतले होते.. सर्व वेद पुराण, शास्त्र अंगिकारून करुणेचा व शांतीचे सागर नव्हे महासागर झाले होते..आजी आजोबांच्या सांगण्यावरून त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकार्याल होते.. त्यांनी सुसंस्कृत अश्या गिरिजा बाई सोबत विवाह करून ते चतुर्भुज झाले होते..आता नाथाच्या वाड्यात दररोज हरिकिर्तन,कथा पारायण होवू लागली... एकनाथ महाराज यांचे अफाट लिखाण काम होते.. जनसामान्य माणसापर्यंत पोहचण्यासाठी त्यांचे मनोरंनाबरोबरच त्यांना शिकवण ते भरुदामाडून देवू लागले. त्यांनी अनेक गवळणी, पद ,भारुड, गोंधळ ,अभंग. .. यांची सुरेख रचना केली.. वेदातले गुह्य अत्यंत समजेल अश्या पद्धतीने सजरित्या ते सर्वासमोर मांडू लागले....त्यांनी अनेक ग्रंथ हि लीहीले..त्यांची काही गवळणी,भारुडे खूप प्रसिद्ध आहेत..