लालच

  • 4.2k
  • 1.1k

"हॅलो, मी अमुक कंपनी मधून बोलतोय, आपला मोबाईल क्रमांक लकी विनर ठरला असून आपणांस 10 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. अभिनंदन " रमेशला एकाने फोनवर ही माहिती दिली. लगेच फोन कट देखील झाला. रमेशला या गोष्टीचा खूपच आनंद झाला. मनातल्या मनात तो जोरजोरात उड्या मारू लागला. काही मिनिटांनी त्याच्या मोबाईलवर मेसेज आलं होतं, ज्यात लिहिलं होतं की, त्याचा मोबाईल क्रमांकावर दहा लाख रुपयांचे बक्षीस मिळाले असून ही रक्कम मिळविण्यासाठी काही अटी टाकण्यात आले होते. ज्यात प्रमुख अट म्हणजे, दहा लाख रुपयांचे जे काही आयकर म्हणजे इन्कम टॅक्स आहे ते जवळपास पन्नास हजार रुपये अगोदर भरावे लागणार होते त्याशिवाय ही रक्कम