अधिकस्य अधिकं फलं- अधिक मासाचे महत्व

  • 13k
  • 1
  • 5.6k

अधिकस्य अधिकं फलं- अधिक मासाचे महत्व डॉ. आर्या जोशी दर तीन वर्षांनी येणारा अधिक महिना. या महिन्यात जावयाला अनारशाचे वाण देणे, भागवत पुराणाचे वाचन करणे, जप करणे, विष्णूस्वरूप सूर्यदेवतेची पूजा करणे या गोष्टी अधिक महिन्यात केल्या जातात. परंतु नवीन वस्तूंची खरेदी करणे किंवा एखादे शुभ कार्य करणे हे मात्र आपण अधिक महिन्यात करण्याचे टाळतो... काय आहे हा अधिक महिना ? आणि याचे स्वरूप काय? चला जाणून घेऊया या महिन्याबद्दल “ अधिक” माहिती. संपूर्ण भारतातच अधिक महिना श्रद्धेने पाळला जातो. या महिन्यामध्ये केलेली पुण्यकर्मे आपल्याला “अधिक” फल मिळवून देतात अशी आपली धारणा आहे. आपण भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचे पालन करतो.