रेशमी नाते - ६

(49)
  • 31.7k
  • 1
  • 19.3k

पिहु विराट आवरतात.पिहुने पिंक कलरची कुर्ती व्हाईट कलरची लेगिंग घातली. केसांचा छोटा पफ करुन मोकळे सोडले होते. विराट ने पण व्हाईट कलरचा शर्ट जीन्स घातली‌... दोघे एकमेकांसमोर येत नजरानजर होते...दोघेही डोळ्यात‌ आरपार बघत होते. सुमन रुममध्ये येत: विराट झालं का...दोघे आवाजने दचकुन इकडेतिकडे होतात.. मॉम..हहहह. अरे झालं का लवकर निघा .ड्रायव्हर ला सावकाश गाडी चालावायला सांग रात्री उगाच उशीर नको होयाला ..पोहचल्यावर फोन करा.पिहु सगळं घेतलं का... हो‌ आई दोघेही निघुन जातात. पिहु विराट मागे बसले असतात..विराट लॅपटॉप‌ घेऊन बसला.पिहु रागानेच बघत होती...तिने रागात हेडफोन काढलं आणि कानाला लावलं.डोक्यतल्या विचारामुळे ??गाणं तर ऐकु येत नव्हतं ( मनात ) लॅपटॉप घेऊन बसायच