राजकुमारीची भूक!

  • 12.5k
  • 3.4k

राजकुमारीची भूक! गजबजलेल्या गावांमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचे लोक राहतात.त्यांना जमेल असं आपलं जीवन जगत असतात.आपल्याला आयुष्य सुखकर जगण्यासाठी नवीन काम धंदे शोधत आपलं जीवन सुखी करण्याचा त्यांचा प्रमाणिक प्रयत्न असतो.अशाच एका गावाची गोष्ट आहे.त्यागावामध्ये रामू नावाचा एक तरूण राहत होता.अलिकडच त्याच लग्न झाले होते.आणि त्यांच्या घरात आनंदाची बातमी येणार होती.तशी त्याची परिस्थिती हलाखीची होती.पण अशा काळात सुद्धा आपल्याला संसाराचा गाडा ओढत जाणे हा त्याचा नित्य नियम झाला होता.त्याच्या बायकोचे नाव आशा होती.ती पण आपल्या नवऱ्याला कधीच कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट करत नव्हती.असच त्याच दररोज नित्य नियम चालू होतं. असंच एकदा रामू रानात काम करत असताना त्याच्या बायकोला कळा चालू झाल्या