राजकुमारीची भूक! राहुल पिसाळ (रांच) द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

राजकुमारीची भूक!

राजकुमारीची भूक!

गजबजलेल्या गावांमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचे लोक राहतात.त्यांना जमेल असं आपलं जीवन जगत असतात.आपल्याला आयुष्य सुखकर जगण्यासाठी नवीन काम धंदे शोधत आपलं जीवन सुखी करण्याचा त्यांचा प्रमाणिक प्रयत्न असतो.अशाच एका गावाची गोष्ट आहे.त्यागावामध्ये रामू नावाचा एक तरूण राहत होता.अलिकडच त्याच लग्न झाले होते.आणि त्यांच्या घरात आनंदाची बातमी येणार होती.तशी त्याची परिस्थिती हलाखीची होती.पण अशा काळात सुद्धा आपल्याला संसाराचा गाडा ओढत जाणे हा त्याचा नित्य नियम झाला होता.त्याच्या बायकोचे नाव आशा होती.ती पण आपल्या नवऱ्याला कधीच कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट करत नव्हती.असच त्याच दररोज नित्य नियम चालू होतं.

असंच एकदा रामू रानात काम करत असताना त्याच्या बायकोला कळा चालू झाल्या होत्या.तसच काम सोडून मालकाची गाडी घेऊन आशाला दवाखान्यात घेऊन गेला .तिथे सुद्धा तिला भयंकर कळा चालू झाल्या होत्या.आणि डॉक्टरने लवकर पैशाचं नियोजन करायला लावले होते.कारण तिची डिलिव्हरी नॉर्मल तर होऊ शकत नव्हती.कारण तिला भयंकर कळा होत होत्या आणि त्यात अंगात ताकद ही नव्हती.रक्ताच प्रमाण अंगात कमी असल्याने डिलिव्हरी सिझरच कराव लागेल आणि परत तिला खुप जपावं लागेल असे डॉक्टरांनी सांगितले होते.रामू मालकाला फोन करून पैशाची सोय केली होती.आणि घेतलेल्या रकमेसाठी दोन वर्ष तरी त्याला शेतात पुढं काम करावं लागणार होतं.

आशाची डिलिव्हरी झाली होती.आणि तिला मुलगी झाली होती.रामूला इतका आनंद झाला होता की कारण घराला घरपण आता मिळणार होतं.इतके दिवस आईवडीलांनी आशाशी लग्न केल्यानंतर घरात पाय टाकून दिला नव्हता आणि आशेला आई-वडील नव्हते.आणि तीसुद्धा एक अनाथ आणि रामू सुद्धा सर्व काही नाती असून सुद्धा अनाथासारखाच होता.आणि हे दोघे एकमेकांना समजून-उमजून आधार देत होते.मोठ मोठं स्वप्न पाहत नव्हते पण आपल्या स्वप्नात दोघांचे आयुष्य फुलवण्याचा जमेल तसा प्रयत्न करत होते.आणि या संसारात आता कुठे सुखाच फुले उमलणार होतं आणि दोघांच्या नात्यातील एक अतूट बंध फुलणार होत.

इकडे आशाला मुलगी झाली आणि रामूने गावभर पेडे वाटले होते.आता मुलीचं नाव बरं काय ठेवायचं म्हणुन तो विचार करत होता.त्याला काय सुचत नव्हतं मग त्यानं आशाला विचारलं तर ती म्हटली हीच नाव आपण 'प्रगती' ठेवूया!!! झालं प्रगती आता घरात धुडूधुडू धुडूधुडू धावू लागली होती.आता तिला घर कमी पडून घरापुढच‌ अंगण सुद्धा आता कमी पडू लागलं होतं.आणि आता या घराला सुद्धा आता पाय फुटू लागले होते.आणि घरात कसं आता नेहमी हसत खेळत वातावरण निर्माण झाले होते.

रामूला आता काम जावं लागतं होत कारण आशेच्या डिलिव्हरी काळात घेतलेले पैसे फेडायचे होते.तो दिवसरात्र काम करायचा आणि घरी आल्यानंतर इतका कंटाळा येऊन सुध्दा प्रगती त्याच्याकडं येऊन जेव्हा छान अशी हसायची.इवलश्या हातांनी तांब्या आपल्या बाबांसाठी ओढत घेऊन यायची आणि गोड असा एक पापा द्यायची त्याच सगळं कष्ट नाहीस होऊन जायचं.

आशानी कधीच हट्ट केला नव्हता पण प्रगती थोडी हट्टी होती.कोणती गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे!!!मग ती लुटपुटत रूसून बसायची मग तिला मनवण्यासाठी रामूची पळता भुई कमी व्हायची.ती त्याची राजकुमारी होती.तिचा प्रत्येक हट्ट तो गरीबीत राहून सुद्धा श्रीमंत मनाचा बाप पुर्ण करत होता.

प्रगतीला आता कळू लागलं होतं.तिला अणि आशाला एखाद्या दिवशी आपण बाहेर हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जावं.अशी त्याची खुप इच्छा होती.त्यासाठी तो आता काम ज्यादा वेळ करू लागला आणि घरी उशीरा झाला असं सांगत असे.पण असं आठवडाभर घडलं मग आशेला न राहवून विचारलं ,"काहो, दररोज उशीर करताय? प्रगती जेवत नाय तुमच्याशिवाय! उशीरा झाल्यावर तिला खूप जेवण जात नाय!"

तो म्हटला,"उद्या एक तिला सरप्राइज देऊया! तिला तू काय सांगू नको!"

तिने पण मान हालवली!

तो दिवस उजाडला.ते तिघे शहाराकडे निघाले.मस्त खरेदी केली आणि आता ते हॉटेल मध्ये गेले. याअगोदर कधीच त्यांनी हॉटेलमध्ये गेले नव्हते.संबंध तोही बाहेरून पाहण्याचा!तिघेही ह्या नवीन हॉटेलमध्ये बावरले होते.आणि एकदम उत्सुकता जशी लागावी तशी ते खुप हरकले होते.नवा हा झगमगाट पाहून डोळे दिपावे अशी स्थिती होती.आणि प्रगतीला खुपचं भूक लागली होती.नव्यानं हरकून‌ जाव तसंच ती हसत हसत म्हणाली ,"बाबा,कधी येणार हे जेवण!¡! व्वा काय मज्जा येणार!मग मी ते असं खाणार...!आणि ते आईला देयच आणि मी तूला भरवणार! किती प्रेमळ गप्पा!!!"
बहुतेक त्या गप्पा तेथील वातावरणाला किंवा तेथील सुटाबुटात वावरणाऱ्या लोकांसाठी वेगळ्या असतील कदाचित.पण त्या कुटुंबाला ते संपूर्ण आनंद तेवढ्या एका जेवणातून मिळणार होता.आणि अविस्मरणीय पर्वणी!!!

रामूसाठी प्रगती ही राजकुमारीच होती.आणि ती आपल्या प्रत्येक आनंदासाठी भुकेलेली होती.मग त्या अन्नासाठी का होईना!!!

ती कधीच एकटी या सुखाचा आनंद भोगू शकली नसती.किंवा तिला ते कदाचित संस्कार सुद्धा नसतील!!! प्रत्येक घास वाटून खाल्याने पोट भरत हाच जन्म संस्कार!!!

त्यामुळे एक मनाने श्रीमंत अशा राजाची एकुलती राजकुमारीची अनुभवलेली कथा!
लेखक-राहुल पिसाळ (रांच)