Premat padatana...! books and stories free download online pdf in Marathi

प्रेमात पडताना...!

सकाळी लवकर उठून आज तुषार तयार झाला होता.त्याची आई नेहमीप्रमाणे हा लवकर असा उठला की काहीतरी शंका घेत त्याला हजार प्रश्नांची उधळण त्याच्यावर करायची.कारण पण तसच होतं कारण रोज आठ वाजेपर्यंत झोपणारा मुलगा कधी चुकून गजर लावला तर न चुकता बंद करून पुन्हा अंथरूणामध्ये साखर झोपेसाठी जायचे.आणि कित्येक हाका मारल्या तरी काही केल्या न उठणारा हा मुलगा लवकर उठला की,शंका तर येणारच...!

तसा तुषार मुलगा हुशार तर आहेच.पण त्याची उत्तम कलाकार म्हणून सुद्धा ओळख आहे.तो कॉलेजला सर्वांच्या नजरेतून काही सुटत नव्हता.कारण कॉलेजच्या शिपाई पासून ते प्राचार्यापर्यंत सर्वांच्या परिचयाचा असा हा तुषार.
आज नेहमीच्या वेळापत्रकाला कलटी देऊन आज सर्व मित्रमंडळी कॅन्टीन मध्ये काहीतरी चर्चा सुरू होती.काहीजण तर येणाऱ्या युवा महोत्सव मध्ये काही करून कॉलेजला आपण जिंकून आणायचं अस ठरवल होत.कारण दोन तीन वर्ष झाले कॉलेजची विजयाची माळ कुठेतरी खंडीत झाली होती.येणाऱ्या वर्षांमध्ये तुषारला कलामंचचा प्रमुख केल्याने आणखी हुणरबाज कलाकार आपल्या टीम मध्ये जोडणे ही त्याची प्राथमिकता होती.आणि तोही त्याच दिशेने प्रयत्न सुरू करत होता.त्यांच्याच कॉलेजमधील माजी कला मंचचे विद्यार्थी यांची तो भेट घेत होता.आणि प्रत्येक कलाप्रकारामध्ये आपण कसे निपुण होऊ यासाठी मार्गदर्शन घेत होता.सहसा कोणतंही कॉलेज या कालावधीत प्राधान्य या युवा महोत्सवालाच देत असतात.पण काही कॉलेज स्पर्धेच्या ऐनवेळी मुलांना काही सवलत देत असतात.ह्या सुविधा मिळायला तर हव्यातच पण यावेळी त्यांना तयारीसाठी अजून वेळ मिळायला हवा.यासाठी दोन महिने अगोदरच तुषार आणि त्याचे सहकारी प्राचार्यांची भेट घेण्यासाठी जातात.

तुषार दरवाजा उघडतो...!"सर आत येऊ का?"

"अरे ,या मुलांनो...!काय म्हणताय...?कसा चाललाय सराव..!"

"सर,खरं तर आम्ही त्यासाठीच तुमची भेट घेण्यासाठी आलोय."

"बरं...!अरे उभे का आहात बसा ना"

तुषार म्हटला,"धन्यवाद सर..!"

"काय म्हणताय तुम्ही?"

"सर आम्ही यावर्षी जोराने तयारी करतोय.त्यासाठी आम्हाला तुमच्याकडून काही अजून सहकार्य हवंय..!"

"मी काय समजलो नाही?"

"सर, दरवर्षी आपण महिना अगोदरच सरावाला सुरूवात करतो.पण यावर्षी थोडा अवधी वाढवून तो दीड-दोन महिने करावा‌.त्यामुळे अजून तयारीला वेळ मिळेल!"

"म्हणजे महिना तुम्हाला तयारीला पुरेसा नाही का...?"

"सर,खरं तर महिना पण तसा पुरेसा आहे पण नवीन मुलांना अजून वेळ मिळाला म्हणजे त्यांना अजून वेळ मिळेल अन् नेहमीचं विषयाचे सर त्या मुलांना कलामंचला येण्यापासून परावृत्त करतात.अभ्यास होणार नाही असे विविध कारणे देतात!"

"खर तर माझ्या सुद्धा कानावर ह्या गोष्टी आल्या आहेत.त्यामुळेच मागील दोन वर्षात आपल्या कॉलेजला बक्षीस कमी आली आहेत.आणि उत्तम कलाकार दिसले नाहीत...!"

"होना सर...!"

"बरं मी बोलतो सर्व शिक्षकांशी तुम्हाला इथून पुढे काही अडचण येणार नाही.इथून पुढे जोरात तयारीला लागा...!"

"नक्कीच सर आमची आम्ही शंभर टक्के नक्की देऊ सर...!"

(या दोन महिन्यांच्या कालावधीत बरीच मेहनत कलामंच आणि इतर सहकारी यांनी घेतली.आणि युवा महोत्सव जवळ आला होता.बाहेरील कॉलेजला स्पर्धा होती.त्यामुळे साहित्य गोळा करणे ते नवीन कलाकारांच्या पालकांची सहमती घेणं इथपर्यंत सर्व कामे झाली होती.)

तुषारने अमोलला कॉलेजच्या नावाचा मोठा पडदा तयार करायला लावला होता.तो असा 'स्वामी विवेकानंद कॉलेज,परंपरा गरूड झेपेची...!' असा पडदा पाहून कुणाच्याही अंगात अभिमानाचा संचार येऊन आपल्या कॉलेजची शान अजून वाढवावी अस वाटणारा असा शब्द म्हणजे 'गरूड झेप...!'

पुणे इथे कॉलेजच्या राहण्याची उत्तम सोय असल्याने आणि सर्व कॉलेजांची उत्तम सोय व्हावी म्हणून तिथे सर्वांना आमंत्रित करण्यात आले होते.तुषार आणि त्यांची संपूर्ण टीम तिथे पोहचली तेथील शिपाई मामांनी राहण्याची खोली दाखविली.उद्यापासून नवनवीन स्पर्धा आणि त्याच्या निकालाची उत्सुकता हे सर्वच अनुभवणार होते.

दररोज नवीन स्पर्धा होत होत होत्या.आणि स्वामी विवेकानंद कॉलेज यावर्षी प्रत्येक स्पर्धेत एक उत्तम स्पर्धक म्हणून समोर येत होता. संपूर्ण कॉलेज आणि स्वामी विवेकानंद कॉलेज असा मुकाबला पाहायला मिळत होता.आणि आता महत्वाची स्पर्धा म्हणजे 'गायन आणि वक्तृत्व स्पर्धा' यात आजपर्यंत तुषारच्या कॉलेजला आजपर्यंत तितकसं यश मिळाले नव्हते जास्त मजल मारली तर उत्तेजनार्थ पर्यंत मजल मारता आली होती. यावर्षी एक उत्तम वक्ता कॉलेजला मिळाला होता तो म्हणजे तुषार...!आणि तरी पण गायन ही स्पर्धेत आपला उत्तम कलाकार नसल्याने तुषार आणि इतर सहकाऱ्यांनी दोन महिने स्वतः यात उत्तम तयारी करून स्वतःला कसेतरी तयार केले होते. वक्तृत्व स्पर्धेत तुषार ने कॉलेजला टॉपमध्ये आणले होतेच.आता फक्त लक्ष गायन स्पर्धेसाठी होते.

एकामागून एक कॉलेज आपले गायक पाठवून गीत सादर करत होते. प्रेक्षकांची उत्तम दाद आणि कलाकारांच्या मेहनत यांच उत्तम नमुना पाहवयास मिळत होते.पुणेमधील एका कॉलेजने गायिका व गायक पुढे न लावता म्हणजे पडद्याआडून गायचे ठरवले आणि सुंदर आवाजांनी संपूर्ण परिसरात टाळ्या, शिट्टया,आणि काही काळाने कमालीची शांतता असा प्रतिसाद येत होता.तुषारने आजपर्यंत कितीतरी गाणी ऐकली होती.पण या आवाजात कमालीची जादू होती. स्वतः कसेतरी गीत गाऊन त्या व्यक्तीला भेटण्याची इच्छा वाटली.त्याला माहित होते की आपले गायन यात बक्षीस नाही भेटणार पण जे गीत त्याला खुप आवडलं होतं ते मात्र पहिलं येणार यात काही वाद नव्हता.

त्यानं पडद्यामागे जाऊन चौकशी केली पण त्याला फक्त ती एक मुलगी होती एवढंच समजलं.परत जास्त चौकशी केल्यानंतर 'रश्मी' हे नाव सुद्धा समजले.आता मात्र आपण या हुणरबाज कलाकाराला भेटायला हव असं त्याला वाटू लागले.त्याला चौकशी करून त्या व्यक्तीचा नंबर मिळवला.आणि संपूर्ण स्पर्धेच्या बक्षीस वितरणला सुद्धा ती व्यक्ती दिसली नाही त्यांच्या शिक्षकांनी ते बक्षीस स्विकारले.खर तर या स्पर्धेत तुषारच्या कॉलेजने घवघवीत यश मिळाले होते.आणि यात तुषारचा खुप मोठा वाटा होता.पण स्पर्धेवरून आल्यापासून तुषार मात्र थोडा अस्वस्थ वाटत होता.

त्याने मिळवलेल्या फोनवरती फोन केला.पण तो दोन तीन रिंग वाजवून तो भीतीने ठेवून द्यायचा.त्याला वाटायचं तिकडून काहीतरी उलटं फोन करून विचारणी होईल असं त्याला वाटायचं पण त्याचा फोन न येऊन भ्रमनिरास झाला होता. संपूर्ण आठवडाभर त्याचा असाच गेला कित्येक दिवस असं चालणार म्हणुन त्याने सरळ फोन केला.तिकडून फोन उचलला गेला.आणि तोच गोड आवाज कानी पडला "कोण बोलतंय...?"

तुषारला काही बोलाव काही समजत नव्हतं तरी पण तो म्हणाला,"तु..... तुमच्या त्या गाण्यासाठी अभिनंदन बरं का...!"

तिकडून आवाज आला, "धन्यवाद...!पण मी तुम्हाला ओळखलं नाही!"

"माफ करा बरं का ..! तुमची परवानगी न घेता फोन केला पण त्या दिवशी मी पडद्यामागे आलो होतो पण तुम्ही तिथे दिसला नाही अन् पारितोषिक वितरणाच्या वेळी सुद्धा नाही दिसला...!"

(तोपर्यंत पलीकडे काहीतरी पडल्याचा आवाज आला...)

तुषार "अहो,काय झाले.. बरं आहे ना...?"

"काही नाही हो, मांजर असेल...!"

"असु द्या...मी तुषार...माझी ओळख करून द्यायची राहिली...!"

"म्हणजे तुम्ही जिंकलेल्या कॉलेजचे लीडर ना...!"

"बरं झालं तुम्ही तरी ओळखलं नाही तर कोणीच असं ओळखत नाही...!"

"काहो...?"

"तसं काही नाही पण सर्वजण त्या पारितोषिकाला ओळखतात आपल्याला कोण ओळखणार...?"

"मग मी कसे ओळखले...!"😊

"ते तुम्हालाच माहिती...!"

"तशी मी बरी गाते ना...?"

"अहो,कुणाला स्वतःची कीर्ती ऐकायला आवडते...!तसं बरं गाता म्हणुनच तर तुमचं कौतुक करून मला पण शिकायचं आहे म्हणून तुम्हाला कॉल केला आहे..!"

"बरं येईल की शिकवायला...!पण तुम्हाला तर उत्तम गायला येत...!"

"हेच तर अवघड वाटत.एक माणूस दुसऱ्याला भेटला ना...!हीच बोंबा आहे एकतर स्वतःचे गुणगान गातो नाही तर दुसऱ्याचे मोठेपण...!"

"मग मी कुठे आहे...!"😊

"साधारण दोन...!"
(तसे दोघे हसायला लागले...!)

असाच दोघांमध्ये संवाद होऊ लागला. आता दोघांना एकमेकांशी बोलल्याशिवाय दिवस जात नसे.आणि दोघेही खूप मनसोक्तपणे बोलणारे.तितकेच विनोदी...! त्यामुळे कुठं काय मनाविरुद्ध झाले किंवा काही बोलावंसं वाटले तरी ते एकमेकांना बोलायचे.दोघांना मैत्रीच्या नात्यात जोडणारा फक्त मोबाईल होता.कधी तुषार राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तेव्हा सर्व प्रथम फोन करून रश्मीला सांगायचा. अन् रश्मी सुद्धा तिच्या रंगलेल्या मैफील त्याच्यापाशी सांगायची.

आता तुषारला तिच्या विषयीं एक आपुलकीची भावना निर्माण झाली होती.पण तिला असं कसं बोलायचं दोघेही एकमेकांची काळजी घेत होते.आवाजावरून तब्येतीची चौकशी होत होती.मग तुषारने भेटायची इच्छा तिच्यासमोर बोलून दाखवली.पण रश्मीचा त्या प्रश्नाला साजेस उत्तर येत नव्हतं.ती आता हा विषय आला की टाळाटाळ करू लागली.तुषार सुद्धा तिचं हे वागणं नवीन वाटत होतं.

त्याला सुद्धा मित्रांकडून समजलं होतं की मोबाईल वरून विविध अॅपवरती होणारी चाटिंग आणि दुरून बोलणं यात फक्त गोड बोलणं असतं जेव्हा प्रत्यक्ष भेटायची वेळ येते तेव्हा मग मात्र लांबची भूमिका स्विकारणे हे सुद्धा गोड अविश्वासाच लक्षण वाटतं.आता त्याला रश्मी बद्दल वाटू लागले होते.

तुषारने बरेच दिवस तिच्याशी अबोला धरला होता.पण किती दिवस असा गप्प राहणार...!तो तिला फोन करून तिच्या मनाची मनोवळणी करू लागला ‌.तीसुद्धा खोटे-नाटे रागावून पुन्हा सुरूवातीप्रमाणे बोलू लागले.आता मात्र तुषारने प्रेमाची कबुली दिली होती.पण रश्मी मात्र यावरती मौन करून होती.तिच्या मनाची चलबिचल तुषार तिच्या आवाजावरून समजत होती.पण ती खरं कारण काय सांगायला तयार नव्हती.

आता तुषारने तिला न कळवता भेटण्याचं ठरवलं . युवा महोत्सवच्या वेळी तेथील मित्रांची ओळख झाली होती.त्याच्याकडून रश्मीच्या घरचा पत्ता मिळवला अन् एक चांगलं गिफ्ट घेऊन तो तिकडे निघाला.रश्मीसंगे बोलताना तिने सांगितले होते की,ती आणि आजी सोबत राहतात आणि एक मैत्रीण.वडील तिचे वारले होते अन् आई शिक्षिका असल्याने बाहेरगावी नोकरीला होती.

तसा तुषार बऱ्याचवेळा आजींशी सुद्धा बोलला होता.खुप छान स्वभाव होता.तुषारने घराची बेल वाजवली.अन् घर कुणीतरी मुलीने उघडले.बहुतेक हीच रश्मी असावी म्हणुन त्याने तिला रश्मी अशी हाक मारली पण मी रश्मी नाही तर मी अपूर्वा...! रश्मीची मैत्रीण...! बरं रश्मी कोठे आहे? तिला सांगशील तुषार आलाय महणू.

घरात सुगंध सुटला होता घराच्या समोर मोगरा होता तसेच मंद सुर्य किरण खिडकीतून बाहेर येत होती.अन् अशा वातावरणात कोणीतरी पेटीवरती गाण्याचा रियाज करत होते.कानाला मंत्र मुग्ध करणारा तो ध्वनी संपूर्ण वातावरण एकदम प्रसन्न करत होता.आणि तुषारला तो आवाज तसा ओळखीचा वाटला...!अरे...हाच तो रश्मीचा आवाज...!

तोपर्यंत अपूर्वा चहा घेऊन आली .आणि म्हटली रश्मीने तुम्हाला आत बोलावलं आहे.तो तसाच चहा संपवून आत गेला तर रश्मी भिंतीकडे तोंड करून बसली होती.
तुषार म्हटला,"माफ कर बरं का.‌‌..!तुला न विचारता आलोय,!"

ती म्हटली,"जसा फोन तरी कुठे विचारून केला होतास...!"

(तसे दोघे हसले😃😊)

तुषार म्हटला,"अरे तू माझ्यावर नाराज आहेस का...? माझ्याकडं तू पाहत नाही...!"

"अरे तसं काय नाही!"

"तुला राग तरी नाही ना ...! आला.मी तुझ्यावर प्रेम आहे असे बोललो म्हणुन!"

"कशाचा राग..‌मनात जे होतं ते तू बोलून दाखवलं... कदाचित मी सुद्धा बोलू शकली असती...!"(अशी ती पुटपुटली...!)

तोपर्यंत तिथे अपूर्वा आली आणि म्हटली.तशी पण ती तुमचे मन मोडण्यासाठी खरं काय सांगणार नाही.खर तर तुमच्यावर सुद्धा तिचं तेवढंच प्रेम आहे ‌तुम्ही म्हणाल हे फोनवरून झालं असेल तर तसं नाही तर तुमच्या प्रत्येक युवा महोत्सवच्या कार्यक्रमाला दाद देताना तेथील एक रश्मी प्रत्येक वेळी उभी होती‌.तुमचे वकृत्व तिला प्रचंड आवडतं.तुम्ही सांगितलेले चांगले विचार तिचे अजून तोंडपाठ आहेत...!

खर तर तुषारला हे कधीच माहीत नव्हतं.

तुषार म्हटला,"अगं,मी तिच्यावर कितीतरी वेळा प्रेम आहे असं व्यक्त केले पण ती प्रत्येक वेळी काहींना काही मुद्दा काढून ती टाळते."

टाळेल तर काय करेल.तिला तुम्हाला गमावण्याची भीती वाटते.

तुषार म्हटला,"अन् मला तिला...!"

तुम्हाला सोपं वाटतं तेवढं ते सोपं नाही. प्रेम हे कुणाशी करायचं तर आपल्याशी बरोबर करणाऱ्याशी, आपल्या जातीतल्या, धर्मातल्या, आपल्या कुळातील,रंग गोरा पाहून, अन् तुम्हाला चारचौघात शोभून दिसणाऱ्याशी ना...!!!

अशा अपूर्वाच्या बोलण्याने तुषार अजूनच प्रश्नात पडला.त्याला पण काहीच समजत नव्हते.तो म्हटला,"काय बोलायचं ते स्पष्ट बोलशील का?"

"बरं ऐक मग...!तू ज्या रश्मीच्या प्रेमात पडलाय ती अंध आहे.............‌‌......!"

खर तर तुषारच्या चेहऱ्यावर काहीच भाव दिसले नाहीत.तेव्हा अपूर्वाने त्याला विचारले,"तुला हे समजून धक्का तर नाही ना बसला..! नाहीतर तू विचार बदलू शकतोस...!"

तो म्हटला,"खरं तर मी रश्मीच्या शरीरावर नाही तर तिच्या आवाजावर, तिच्या स्वभावावर प्रेम केलंय.खर तर मी तिचा आवाज ऐकला तेव्हाच तिच्या प्रेमात पडलो होतो.अन् मला तू थोड्या वेळापूर्वी जे म्हटली ते मी कधीच मागेच सोडले आहेत.वक्ता कधी टाळ्यांसाठी चांगले भाषण करत असतील ही पण जर तुम्ही जे बोलता ते तुमच्या आचरणात येत नाही तोपर्यंत तुम्ही विचार शून्य, अन् माणूस शून्य रहाल...!मी बोलण्याच्या आणि आचरणात फरक करत नाही. अन् प्रेमाचं जर विचारशील तर ते कोणावरही होऊ शकतं.त्याला धर्म,जात, वर्ण असा कोणताच भेद नाही.

एक माणूस दुसऱ्या माणसावर निस्वार्थी करतो ते प्रेम...!

हे सर्व रश्मी कितीतरी उशीर ऐकत होती.तिच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू वाहत होते.तुषार तिच्याजवळ गेला अन् म्हटला इतके परके समजते का मला साध बोलणार पण नाही का...! लोकांच्या विरोधात जाण्याची माझी तयारी आहे.अन् तुझ्या जीवनाचा एक सुरेल नाही पण एक बेसुर का होईना सुर व्हायचंय...!😃😃😃तशी रश्मी हसली अन् म्हटली,"बरं..! वक्ते साहेब इथे पण पोपटपंची करून चांगला सुर लावला की तुम्ही...!"

(यांच्या तर नात्याचा सुरेल संवाद झाला.पण समाजात अजूनही विविध जात, धर्म, वर्ण, विविध प्रथा धरून प्रेम या निर्मळ, नैसर्गिक भावनेला विरोध केला जातोय.अन् वेगळ्याच धुंदीत समाजात प्रेमा विषयी द्वेष जाणून पसरवला जातोय.चला आपणंही प्रेमाला आणि त्याच्या कळीला फुलण्यासाठी चांगलं वातावरण निर्माण करूया...! प्रेमाच्या भावनेचा आदर करूया...! प्रेम करताना पुढील व्यक्ती पाहून नाही तर स्वभाव,मनाच जुळण, व्यक्ती स्वातंत्र्य अशा कित्येक गोष्टी महत्त्वाच्या आहेत.)

✍️लेखक-राहुल पिसाळ (रांच)


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED