eka vidhven svaprana harval books and stories free download online pdf in Marathi

एका विधवेन स्वप्नांना हरवलं!!!


*एका विधवेने स्वप्नांना हरवलं!!!*

खरंच तिने स्वप्न हरवलेलं आहे.ती कोणाची तरी होणार होती...! तुम्ही दचकला ना!अहो ही गोष्ट आहे . आमच्या सुंदरीची तशी ती नावाप्रमाणे सुंदर ही नव्हती पण,विचाराने मात्र सर्वांना लाजवणारी अशी होती.

सर्वांन प्रमाणे ती सुद्धा आपलं काम उरकून बाहेर आली होती ‌. सर्वांच्या नजरा तिच्यावर पडल्या होत्या कोणी कोणत्या नजरेने पाहत होता.हे जरी आजूबाजूच्या लोकांना जरी समजत नसल तरी पाहणाऱ्या व्यक्तीला आणि तिच्याकडे पाहत आहे त्या व्यक्तीला लगेच समजत.विशेष करून स्त्रीयांना ह्या विषयी नजर ओळखण्याची देणगी निसर्गाने दिलेली आहे.असो सुंदरी विषयी तिचा भुतकाळ बरंच काही बोलून जातो.

कधी काळी महामारी आली होती.सुंदरीवरून दोन मोठे भाऊ होते.पण त्यांना शिक्षणात रस नसावा.म्हणुन ते घरील शेती पाहत होते.आणि ही सुंदरी तशी अभ्यासात मध्यम होती.पण जिद्दी होती.शहराच्या ठिकाणी म्हणजे पुण्याला ती शिक्षणासाठी गेली होती.आता स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू होती.पण अशा अचानक आलेल्या महामारीमुळे तिला घरच्यांन कडून घरी येण्यासाठी फोन येत होते.आणि ती दोन दिवसांनी येते.म्हणुन आपल्या धुसर दिसणाऱ्या स्वप्नांचा पाठलाग करत होती.पण दिवसेंदिवस महामारीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नाईलाजास्तव तिला घरी यावे लागले.आणि ती अभ्यासाचं संपूर्ण बिछाना घेऊन ती घराच्या दिशेने तिची पाऊले पडायला लागली.बऱ्याच मैत्रीणी पण घराकडे धाव घेत होत्या. कित्येकजणी तर पाच-सहा वर्षांपासून तयारी करत होत्या.त्या सुद्धा घराच्या दिशेने वाटचाल करत होत्या. सर्वांचा निरोप घेऊन ती निघाली.

घराकडे गेल्यानंतर तिला खुपचं वाईट अनुभव येत होते.कारण जे शेजारचे त्यांच्या मुलांना या सुंदरीच्या शिक्षणाच्या जिद्दीच्या गोष्टी मोठ्या रूबाबात सांगायचे .तेच आता तिच्याकडे त्या संशयी दृष्टीने पाहत होते.कारण ही आता शहारातून आली आहे.आणि हिच्याकडे कोणी कोणी म्हणुन महारोगी याच दृष्टीने पाहायचे.सुरूवातीला तिने या गोष्टीला दुर्लक्षित केले.पण जेव्हा घरातील ही परकेपणाने वागू लागले हे मात्र तिला न सहन करणारी गोष्ट होती.आता तिच्या अभ्यासाची पुस्तकं त्यांनी लपवून ठेवली होती.आणि तिला आता या महामारीच्या काळात तिला आता अभ्यास सोडून घरातील स्वयंपाक कामासाठी आग्रह करु लागले.तिनेही जास्त वाद न घालता ती आवड म्हणून स्विकारले.पण थोड्याच दिवसात तिच्या या कामाचे खरे कारण तिच्या नजरेस आले.आणि तिलाही कित्येक तिच्या मुलींचे , मैत्रीणींचे फोन आले.आणि जे तिच्याबाबत घडत होते तेच इतर मुलींबाबत घडत होते.कारण तिचेही लग्न आता करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.हे तिला कळण्याच्या आत झाले.तिला होणाऱ्या नवऱ्याबरोबर धड नीट संवाद सुद्धा साधता आला नाही.आणि तिला सरळ त्याला लग्नातच भेट झाली.

सुरुवातीचे गुलाबी दिवस असे गेले.पण जेव्हा सुंदरी तिच्या स्वप्नाविषयी बोलायची तेव्हा तो विषय बदलत असे काही कामाचे निमित्त सांगून बाहेर जात असे.आणि ठराविक काळानंतर तो व्यसनी आहे.हे तिला समजलं होतं.आईवडीलांनी या महामारीच्या काळात कमी पैशात तिचे लग्न खर्च न करता केले तर होतेच.पण तिला न कळता बक्कळ पैसा दिला होता.आणि त्याच कारणाने तिच्याशी तो लगेच लग्न करायला तयार झाला असावा.तो नेहमीच दारू पित असे .आणि त्याला ड्रग्स याचीही सवय लागली होती.आणि तो खूप अशक्त झाला असावा.या वेळी तो तिच्यावर हात उघारणे,तर होतेच पण हाणमार सुध्दा होऊ लागली.पण तिला दिवस काढायचे होते.तरीसुद्धा तिचा अभ्यास सुरू होता.ती दिवसभर येणार पेपर वाचून काढत होती.

ती सकाळी सकाळी कामाला लागली असताना . तिला फोन वाजल्याची आवाज आला.तिला अशा फोनची सवय झाली होती.कारण कित्येक वेळा नवरा रात्रभर घरी येत नसे .मग त्याच्या ओळखीच्या लोकांचे फोन येत असे.आणि तो कुठे पडला आहे याची खबर मिळाली जात असे.आज तिने फोन उचलला.तिकडून आलेला आवाज ऐकून तिला एकदम धक्का बसावा असं झालं.कारण तिचा नवरा रात्री दारूच्या नशेत गाडीखाली आला होता.आणि तो जागीच ठार झाला होता.हा सर्वात मोठा धक्का पचवणं अवघड तर होतच पण सासू सासऱ्यांना धीर देणं महत्त्वाचं होतं कारण त्यांना याचा मोठा धक्का बसला असता.अगोदरच ते तिच्या आयुष्याचे वाटोळे केले म्हणुन स्वतःला दोष देत होते.आणि आता हे जर त्यांना लवकर सांगितले तर ते नक्कीच हा धक्का पचवतील का? याबाबत तिला शंका होती.ती स्वतः जाऊन शव घरी घेऊन आली.आणि सर्वांना मग सांगितले.आता मात्र सर्व विधी झाल्यावर तिला न्यायला तिच्या माहेरचे लोक आले होते.पण तिने जायला नकार दिला कारण तिला तिच्या सासू ,सासऱ्यांना आधार द्यायचा होता.कारण त्यांना ही एकूलता एक मुलगा तो होता.महिना झाल्यानंतर तिच्या सासऱ्यांनी तिला स्पर्धा परीक्षा द्याव्या असं सुचवलं.कारण तिला तिच्या स्वप्नांना हरवायचे होते.तिने नकार दिला कारण मग मी जर अभ्यास करायला गेले तर घर कसे चालणार!तर सासरे म्हटलं बाळा तू अभ्यास कर .मी काहीतरी नोकरी करेन.अशा शब्दांनी तिचे कित्येक मागे पडलेले स्वप्न पुन्हा जिवंत झाले होते.आणि ती पुन्हा जोमाने कामाला लागली.

तिला आता खंबीरपणे पाठिंबा होता .तरी पण दोन ते तीन तास ती बाहेर काम करून स्वतःच्या पुस्तकांचा ती खर्च काढायची.आता मात्र तिला काही करून यश मिळवायचे होते.कारण आज ती खरच दुसऱ्यांच्या आशेसाठी का होईना अभ्यास करत होते.जे सासरे त्यांचे वय झाले ते नीट काम करू शकत नाही ते सासरे पाठिंबा देतात.तिला आता अपयश हे सुद्धा त्यांच्यावर अन्याय वाटू लागे.तिने रात्र दिवस अभ्यास करू लागली.बाकीच्या मैत्रीणी आता संसारात रममाण झाल्या होत्या .पण त्या सुंदरीला प्रोत्साहन देत होत्या.कारण त्या स्वतः परिस्थिती समोर जाऊ नाही शकल्या पण सुंदरी तर काळाला हरवायला चालली होती.

तिला कोणालाच हरवायचे नव्हतं तर तिला फक्त त्या स्वप्नाला हरवायचे होत.कारण ते कुणाला सहजासहज मिळत नाही.आणि मिळाले तर ते किती टिकविता हे पण महत्वाचे आहे.आणि तिला समाज प्रत्येक वेळी तू एक विधवा आहे.तूझी नजर घराच्या उभऱ्याबाहेर कशी पडू शकेल! जिच्या आयुष्यात बेरंग झाला आहे.तिने स्वप्नांचा रंग का बरं ?उधळावा.अशी अनेक प्रश्न तिच्या समोर येत होते.काहीजण तर तिला अश्लीलतेने पाहायचे.पण ती त्यांना कधीच उत्तर न देता यशातून उत्तर देणार होती.

आजच्या पेपरला फोटो आला होता.एक सुंदरीने ,एक नवीन इतिहास रचला.एक विधवा हिने प्रशासकीय अधिकारी म्हणून निवड झाली.

खरंच तिने स्वप्नांही आज हरवलं होतं!!!
✍️लेखक-राहुल पिसाळ (रांच)


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED