घडलं असं त्या दिवशी!!! राहुल पिसाळ (रांच) द्वारा हास्य कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

घडलं असं त्या दिवशी!!!

मी प्राथमिक शाळेतून उच्च माध्यमिक शिकायला गेलो.तेव्हापासून मी प्राथमिक शाळेतील प्रत्येक दिवस , प्रत्येक क्षण आजही आठवतो.याच आठवणीला मनात ठेवून १५आॅगस्ट या दिवशी मी शाळेत गेलो.आत जाताना शाळेला असलेलं नवीन गेट पाहिलं आणि आमच्या काळातील काटेरी कुंपण आठवलं आणि आम्ही त्यातून एक पाय बाहेर कंबरेतून खाली वाकलेलो.आणि काटेरी तारांना चुकवून जवळचे अंतर पार करण ही तारेवरती कसरत करावी लागे.आत गेल्यानंतर सर्व बाजूंनी गोंधळ सुरू होता.सरांचे एक लाईन करण्यासाठी पहाडी आवाजात कणखर आवाज काढून मुलांना डापरून सरळ करत होते.आणि प्रत्येक मुल उत्साहाने नवीन कपडे घालून आपल्याला सावरत आयुष्यातील मौल्यवान क्षण ते आज अनुभवत होते.कधी ना इस्त्रीचे कपडे घालणारी मुले आज कडकडीत कपडे घालून हातामध्ये भारताचा तिरंगा घेऊन सरांच्या सूचनेकडे लक्ष देत होते.

मला पण हा प्रसंग भूतकाळात नेणारा होता.मी पण त्यांच्या ओळींमध्ये सामील झालो.आमच्या वेळेला असणारे कोणतेच सर तिथे दिसत नव्हते.फक्त एक हक्काची जागा होती ती म्हणजे शाळा आणि तिथे वाढलेल वडाचं मोठं झाड!! 🌲 🌲 🌲 (हे वडाचं झाड नाही पण समजून घ्या!!!😃😃😃)आज ते झाड तोडून त्याच फक्त अस्तित्व म्हणून खोड आजही तग धरून होत.सर आमच्यावेळी पेक्षा जास्तच कडक होते.बहुतेक त्यांना मी माझी विद्यार्थी आहे.ओळखल नसावं???तसंच मुलांच्या लाईन मध्ये उभं केलं!!!😃

सर्व कार्यक्रम, ध्वजारोहण उत्तम झाला.आणि मी घरी जाताना माझी कोणती तर गोष्ट हरवली असं वाटून गेलं.म्हणुन मी ती हुडकायला सुरूवात केली!पण काही केलं तरी माझी चप्पल सापडेना 😭😭😭 खुप विचित्र प्रसंग आहे.सरांना सांगता पण येत नव्हतं.कारण मी माझी विद्यार्थी असून सुद्धा मुलांच्या ओळींमध्ये कसा!!!असा प्रश्न विचारला तर त्या क्षणावर पूर्ण पाणी जाणार!!!ते गुपितच राहायला हवे😉😉😉 म्हणून मी काही कुणाला विचारलं नाही.पण सर्व गावकरी आणि मुलें घरी जात होती.शेवटी सर ही जायच्या तयारीत दिसले.न राहवून त्यांनी मला विचारले,"अरे!तु अजून नाही गेलास?"
मी म्हटलो," सर हो जातोय सर!"
आता मात्र माझ्या चप्पलने मला रडायला आणले होते.आणि ती पण नवनवीत चप्पल आता मात्र मला काही करून हवी होते! डोळ्यासमोर सारखीच तीच पुढे येत होती.मी शाळेचा संपूर्ण परिसर पाहिला पण कुठे दिसेना!!!😭😭😭

शेवटी एक जागेवरती शांत बसलो.आणि मी असं करायला हवं होतं...!अन् मी तसं का ...केलं!!!तिथे चप्पल काढायची काय गरज होती का...?लय शहाणा झालास मुलांमध्ये जाऊन उभा राहिला!!!🙄🙄🙄🙄आता मात्र ती 'चप्पल' एका बाजूला आणि 'माझे ते निरागस🤭🤭🤭बालपण' समोर आली आले होते!आणि बिचारी एकट्या चप्पलीमुळे सर्व रामायण, महाभारत सोडून आता अलका कुबलचे सिनेमा पाहून जशा स्त्रीया रडतात (इथे फक्त स्त्रियांना उद्देशून नाही पण एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला चांगली ओळखते 😁!!! बरोबर ना)तसा काय माझाच अवतार झाला होता!!!

पुन्हा शांत बसलो!!!आणि एकदम हसू लागलो.कारण मी झोपेतून उठून माझी ती चप्पल साधी आहे.आणि ती चप्पल कितीतरी वेळा मी तिथे पाहिली होती!!!🤭🤭🤭🤭😂😂😂😃😃😃 हसून घेतलं कारण जिला मी शोधत होतो .ती माझी नव्हतीच!!! चप्पल बरं का???😃😃😃🤭आज नुसताच गैरसमज करून वेळ वाया घालविली आणि लवकरच जाग आली!!!😂आता पुन्हा झोपतो म्हणजे नवीन काहीतरी दिसेल!!!😁🤭
👻 👻 👻 वैगरे असेल तर आज मला झोप नको!!!कोण म्हणे अमावस्येचा दिवस आहे!!!
(काही समजलं तर नक्की सांगा!😂)
(अशी स्वप्न प्रत्येकाला पडतात.काहीजण खरंच दिवसात ही स्वप्ने पाहतात.विनोदाचा भाग जर आपण सोडला तर बरंच काही शिकायला मिळतं.फक्त आपण त्या दृष्टीने पाहत नाही.स्वप्ने आपल्याला जे आपल्याला करता येत नाही ते ही स्वप्नात करू शकतो.आणि याच स्वप्नातून बऱ्याच कवी,लेखक यांना त्यांच्या कल्पना,एखादा प्रसंग,एखादं पात्र किंवा कवीला एक चांगली कल्पना मिळून जाते.हेच तर गमक तर आहे.)

लेखक:-राहुल पिसाळ (रांच)