श्री दत्त अवतार भाग १

  • 24.5k
  • 1
  • 12.2k

श्री दत्त अवतार भाग १ श्री दत्तावताराचे प्रयोजन श्री दत्तात्रेय ही देवता कशी आहे, तिचे स्वरुप काय आहे, तिचे कार्य काय आहे, हे देवता स्वरुप कशामुळे हृदयात साकारते, या देवतेच्या प्रसंन्नतेचा प्रसाद म्हणुन काय प्राप्त होते,याविषयी असे म्हणले जाते की ... आत्मानंदा कडे घेऊन जाणारा ॐकार जो जगाच्या उत्पत्ती-स्थिति-लय या चक्रातून सुटका करून घेण्यासाठी भक्तांच्या बुद्धीला प्रेरक आहे. तोच एकमात्र देव, भक्तांची सत्च्चिदानंद सुखाशी एकी घडविणारा दत्त आहे. हा अखंड निराकार आत्मस्वरुप आहे. भक्तांचा आधार आहे. आणि भक्तिने जाणला जातो. श्रीदत्त अवताराचा आणि श्रीदत्तात्रेय देवतेचा उद्भव, उगम आणि प्रवास अद्भुत आहे. पहिल्या स्वयंभु मनूपासून श्रीदत्तात्रेयांचा आविर्भावकाल असून