श्री दत्त अवतार भाग २

  • 13.7k
  • 1
  • 6.5k

श्री दत्त अवतार भाग २ श्री दत्तात्रय एक सर्वसमावेशक दैवत आहे. आकाश,भूतलावरील व्यवहार आणि वैराग्यदेही वर्तन अशा तीन्ही पातळ्यांवर दत्ताची श्रेष्ठता गाजते आहे. त्यांनी चोवीस गुरू केले म्हणतात. थोडक्यात, सृष्टीमध्ये जिथं चांगलं मिळालं, त्याचा दत्तांनी आदर केला. इतरांच्यातले चांगले गुण गुरूपदी मानल्यामुळे, दत्त स्वत:च परमगुरू झाले. स्वत:च्या अंगावर लोकांच्या लाजेपुरती लंगोटी, आणि समोरच्या लायक मागणार्‍याला, लंगोटीपासून थेट लक्षाधीश, कोट्याधीश यापर्यंत हवं ते मिळणार. स्वत:ला काहीच नको, याचं अक्षरश: मूर्तीमंत प्रतीक म्हणजे दत्त! अंगावर लंगोटीशिवाय चिरगुटही नाही. अशा निरिच्छपणानं इतरांची न्याय्य इच्छापूर्ती करता न येईल, तरच आश्चर्य. म्हणजेच त्रिमुखी दत्ताच्या पहिल्या दोन महामुखाएवढं, वर्तनाचं हे तिसरं महामुख महत्वाचं आहे, दत्ताजवळ