श्री दत्त अवतार भाग ३

  • 10.2k
  • 1
  • 4.9k

श्री दत्त अवतार भाग ३ तेव्हा ते तिघेजण (ब्रह्मा-विष्णु-महेश) म्हणाले "ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पहातो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो." अशी प्रतिज्ञा करून ते तिघे मिळून मृत्युलोकात यवयास निघाले. त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली. शुभ्र धोतर, अंगावर रेशमी उपरणे, यज्ञोपवीत आणि हातात कमंडलू अशा थाटांत ते तिघे अत्रिमुनींच्या आश्रमात आले. भर दुपारची वेळ ! ऊन मी म्हणत होते. अशा वेळीं आपल्या आश्रमांत आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसूयेने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले. त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले. त्यांना पाटावर बसवून जेवण वाढले. पण तिला अतिथी म्हणाले- "आम्हीलांबून आलो असुन, तुझे