श्री दत्त अवतार भाग ४

  • 10.6k
  • 1
  • 4k

श्री दत्त अवतार भाग ४ श्री दत्तात्रेय यांच्या अवतारांचे जन्म.त्यांचे वास्तव्य,त्यांची विश्रांती स्थाने त्यांची कार्ये आणि त्यासंबंधात असलेल्या विविध कथा यासाठी काही गावे ओळखली जातात . दत्तसंप्रदायात या गावांना अतिशय महत्व आहे . दत्तभक्त यातील प्रत्येक गावाला भेट द्यायची मनीषा बाळगून असतात . १)माहूर (नांदेड) महाराष्ट्र हे क्षेत्र सद्गुरु दत्तात्रेयांचे अवतार स्थान आहे. महासती अनुसयेच्या सत्व परिक्षेसाठी आलेल्या ब्रह्मा, विष्णू, आणि महेश यांनी संतुष्ट होऊन महासती अनुसया आणि अत्री ऋषी यांच्या विनंतीस मान देऊन याच ठिकाणी त्यांच्या पुत्राच्या रूपाने दत्त अवतार धारण केला. हे क्षेत्र फार प्राचीन आहे. ह्या क्षेत्रास दत्तात्रेयांचे विश्रांती स्थान सुध्दा म्हणतात. ह्या ठिकाणी रेणुका मातेचे मूळ