श्री दत्त अवतार भाग ५

  • 10.3k
  • 1
  • 4.1k

श्री दत्त अवतार भाग ५ ९) माणिकनगर (बिदर )सोलापूर कर्नाटक हैद्राबाद बस मार्गावर हुमनाबाद या तालुक्याच्या ठिकाणा पासून १ कि.मी अंतरावर माणिक नगर हे क्षेत्र आहे. कर्नाटक राज्यात हे क्षेत्र येते. सकलमत संप्रदाय संस्थापक दत्तावतारी सिध्दपुरुष श्री माणिक प्रभूजी यांची ही कर्मभुमी आहे राम नवमीच्या दिवशी सद्गुरु दत्त प्रभुंनी बया बाईंना (माणिक प्रभूंची आई) दृष्टांत देऊन मी तुझ्या उदरी पुत्र रुपाने जन्म घेईल असा आशिर्वाद दिला. २२डिसेंबर १८१७ साली (मार्गशीर्ष शुध्द चतुर्दशी) दत्त जयंतीच्या दिवशी बसवकल्याण जवळील लाडवंती या गावी श्री माणिकप्रभूंचा जन्म झाला. माणिक नगर, बसवकल्याण, बिदर या परिसरा मध्ये प्रभुनीं अनेक अवतार लीला केल्या आहेत. त्यापैकी एक