श्री दत्त अवतार भाग ७

  • 8.1k
  • 2
  • 2.8k

श्री दत्त अवतार भाग ७ २) परशुराम ऋषिश्रेष्ठ जमदग्नी आणि रेणुका यांचा पुत्र म्हणजे परशुराम. त्यांना एकूण चार पुत्र होते. परशुराम यांना विष्णूचा अवतार मानलेले आहे. जमदग्नी ऋषि हे अत्यंत कोपिष्ट होते. एकदा त्यांची पत्नी रेणुका पाणी आणण्यासाठी नदीवर गेली असता तिला उशीर झाला म्हणून ते अतिशय रागवले, त्यांनी आश्रमात असलेल्या आपल्या पुत्रांना आपल्या आईचा वध करायला सांगितले. पुत्रांनी मातृवधाला नकार दिला. थोड्या वेळाने बाहेर असलेला परशुराम आश्रमात आला तेव्हा जमदग्नी ऋषींनी त्याला आपल्या मातेचा वध करायची आज्ञा केली. त्याने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या परशुने आपल्या आईचे मस्तक धडावेगळे केले. ते पाहिल्यावर जमदग्नी ऋषींचा राग शांत झाला. त्यांनी परशुरामाला