श्री दत्त अवतार भाग ८

  • 10.2k
  • 2
  • 3.7k

श्री दत्त अवतार भाग ८ ५) कार्तवीर्य सहस्रार्जुन कृतयुगामध्ये कृतवीर्य या नावाचा एक महापराक्रमी राजा होऊन गेला. त्याच्या पत्नीचे नाव शीलधारा असे होते. कृतवीर्य हा अतिशय पराक्रमी राजा होता त्याला शंभर पुत्र झाले होते. परंतु एकदा काहीतरी गैरसमजुतीमधुन च्यवनऋषींनी त्याला शाप दिला आणि सर्व पुत्र भस्मसात झाले. महाराणी शीलधारा याज्ञवल्क त्रदृषींची पत्नी मैत्रेयी हिला शरण गेली. मैत्रेयी ही ब्रह्मवादिनी आणि ज्ञानी होती. मैत्रेयीने तिला श्रीदत्तात्रेयांची उपासना करायला सांगितली आणि पुत्रप्राप्तीचे व्रत करायला सांगितले. कृतवीर्य आणि महाराणी शीलाधरा यांनी मन:पूर्वक निष्ठेने ते व्रत केले. तेव्हा भगवान श्रीदत्तात्रेय संतुष्ट झाले. त्यांनी पराक्रमी आणि तेजस्वी पुत्र होईल असा आशिर्वाद दिला. हा मुलगा म्हणजेच