अहमस्मि योधः भाग - ८

  • 11.1k
  • 3.9k

समीर गाडीत जाऊन बसला. डोळे बंद केले..एक दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा गाडी सुरू केली. थोडं पुढे गेल्यावर सहजच त्याची नजर आरश्यावर पडली.. दृश्य धक्कादायक होतं..डोळ्यांवर विश्वास बसला नाही.खिडकीची काच खाली करून त्याने बाहेर डोकावून मागे पाहिलं.. त्या अज्जी तिथे नव्हत्या त्यांची झोपडी ही गायब..!! हे सगळं एकदम मायावी वाटत होता..आपण तिथे काहीवेळा पूर्वीच नाष्टा केला होता. आणि आता एकदम सगळंच अदृश्य..! हे सगळं कसं शक्य आहे असा विचार समीरच्या मनात आला..दिग्या आणि स्नेहा दोघं बोलण्यात व्यस्त होते. हे त्यांना कळण्याच्या आत समीरने गाडीचा वेग वाढवला आणि तिथून गाडी लवकर काढली. त्या लहान मुलाने दिलेला नकाशा त्यांने बघितला होता त्याच