वाढदिवसाची भेट

  • 5.8k
  • 1.3k

आज पुनम फारच अस्वस्थ होती. घरात तिच्या येरझाऱ्या वाढल्या होत्या. ऑफिसची वेळ संपून दोन तासाचा कालावधी संपला होता. वैभव एवढ्या वेळात घरी यायला हवा होता. पण अजुन आला नाही म्हणून तिला वैभव ची जरा जास्त काळजी वाटू लागली होती. तिची काळजी वाढण्याचे अजुन एक कारण म्हणजे त्याचा मोबाईल देखील लागत नव्हता. फोन लावले की, आपण डायल केलेला क्रमांक स्विच ऑफ आहे, कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे असे उत्तर मिळत होते त्यामुळे तिची अजुन काळजी वाढू लागली. सातचे आठ वाजले, आठचे नऊ वाजले आणि नऊचे अखेर रात्रीचे दहा वाजले होते. तिला आत्ता अजुन ज्यास्त काळजी वाटू लागली. काय झाले असेल ? फोन