खरी संपत्ती

  • 8.3k
  • 2k

खरी संपत्ती अमित हा बँकेत कारकून. त्‍याची पत्‍नी नयना प्राथमिक शाळेत शिक्षिका. दोघांनाही चांगला पगार होता. त्‍यांचं कुटुंब सुखी व समाधानी होतं, अमन व पूजा नावाची दोन गोंडस मुलं देवाने त्‍यांच्‍या पदरात दिली होती. त्‍यांच्‍या जीवनात कोणत्‍याच गोष्‍टीची वाणवा नव्‍हती,टुमदार घर,गाडी, कलर टीव्‍ही, फ्रीज आदी सा-याचैनीच्‍या वस्‍तू त्‍यांच्‍या घरात होत्‍या. जशी पगारात वाढ होऊ लागली. तशी चैनीच्‍या वस्‍तूंची गर्दी घरात वाढू लागली ; परंतु नयना ही वेगळ्या स्‍वभावाची होती. ती स्‍वार्थीपणाने विचार करणारी होती. त्‍यामुळे राजा-राणीच्‍या संसारात तिने सासू व सास-याला स्‍थानच दिले नाही. जेव्‍हा अमन जन्‍मला तेव्‍हा तिला एका बाईची गरज भासू लागली. त्‍यामुळे आता तरी ती आई-वडिलांना बोलविण्‍यास सांगेल हा अमितचा विचार पुरता फोल ठरला. अमनचा सांभाळ करण्‍यासाठी एका कामवाली बाईला महिना पाचशे रूपयांच्‍या