खरं दान

  • 9.5k
  • 3.5k

खरं दान 'सर' दुरुन शब्द ऐकायला आला.तसं भीमरावनं आपल्या अंधूक नजरेनं त्या मुलाकडं पाहिलं.तसं त्याला स्पष्ट दिसत नव्हतं.त्यातच जेव्हा तो जवळ आला.तेव्हा तो पायावर नतमस्तक झाला.तशी भीमरावची नजर त्या मुलाकडे गेली.तसा तो चेहरा ओळखीचा वाटला नाही. त्यानं त्या मुलाला विचारलं, "कोण तुम्ही?" "मी अभय.आपण मला शिकवलं." "शिकोलं! मी शिकोलं! बेटा,तुह्या गैरसमज झालेला दिसते.मी बाबा शेतकरी होतो.आतापर्यंत शेतीच केली मी.आन् आता मरताखेपी माह्या पोरीन शयरात आणलं.म्हणून मी आलो शहरात.पण तू म्हणतेस का मी तुले शिकोलं,तं मी तुले शिकवाले मास्तर नोयतो एकाद्या शाळेचा."