To Spy - 3

  • 15.9k
  • 1
  • 9k

"तुम्हाला माहितीये, आम्ही प्रश्न विचारायला तुमच्या समोर न बसता असे तुमच्या आजूबाजूला का बसलो आहोत ?" करणने बोलायला सुरुवात केली. "नाही. का ?" निधीलाही हे थोड वेगळ वाटलं होतं. " कारण आमच्या प्रश्नांची उत्तरे देताना तुमच्या मनावर कुठलंही दडपण येऊ नये. तुम्हाला अगदी आपल्या फ्रेंड्स सोबत बोलत असल्यासारखे फीलिंग यावं. आणि हो. ही आयडिया वीर ची होती. "अच्छा ?" मग विराट कडे पाहून निधी प्रेमाने म्हणाली. " सो स्वीट ऑफ यू वीर." विराटला ते ऐकून कसंसच झाल. म्हणजे आनंदाने. करणच्या घसा खाकरण्याने तो भानावर आला. "हो म्हणजे तो तर तुझा फ्रेंड आहेच, आपलीही मैत्री होईल हळूहळू." " हो नक्कीच. पण